शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आज जमा होणार किसान सन्मान योजनेच्या १३ व्या हप्त्याचे पैसे!

 मुख्य संपादक आशिष मुगटकर


दिल्ली वृत्त 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी जारी केला जाणार आहे. कर्नाटकमधील बेळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान किसान सन्मान योजनेच्या १३ व्या टप्प्यातील १६ हजार कोटींच्या अनुदानाचे वितरण केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोरोना संकटात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू झाली असून आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा झाले आहेत. १३ व्या हप्त्यातील १६ हजार कोटींच्या वितरणाचा प्रारंभ बेळगावातून होणार आहे. देशभरातील आठ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम थेट जमा केली जाईल. पीएम किसान सन्मान योजनेचा हा १३ वा हप्ता आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना सुरू करण्यात आली होती. कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. दर चार महिन्याला एकदा अशा तीन हप्त्यात हा निधी दिला जातो. बारा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. तेरावा हप्त्याचे १६ हजार कोटी रूपये जमा करण्याच्या योजनेचा बेळगावातून प्रारंभ होणार आहे.

युक्रेनप्रश्नी शांतता प्रक्रियेत योगदानास भारत तयार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नवी दिल्ली  

रशिया-युक्रेन संघर्षांवर संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून तोडगा काढण्याची गरज असून, कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास भारत तयार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ यांना दिली.

प्रदूषणमुक्त ऊर्जा, व्यापार, संरक्षण आणि नवीन तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली.

जर्मनीचे चॅन्सेलर शोल्झ हे शनिवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. यावेळी झालेल्या उभयपक्षी चर्चेत रशिया-युक्रेन संघर्ष, 'डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन', 'फिनटेक', माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार आदी मुद्यांवर भर देण्यात आला. शोल्झ यांच्याबरोबरील बैठकीनंतर एका संयुक्त निवेदनात पंतप्रधान मोदींनी नमूद केले, या समस्यांचे निराकरण केवळ संयुक्त प्रयत्नांनीच शक्य आहे आणि 'जी-२०' च्या अध्यक्षपदी असतानाही भारत या दिशेने प्रयत्न करत आहे. ''युक्रेनमधील घडामोडी सुरू झाल्यापासून भारताने हा संघर्ष संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा आग्रह धरला आहे. भारत कोणत्याही शांतता प्रक्रियेत योगदान देण्यास तयार आहे.''

अशिया, आफ्रिका आणि अमेरिका खंडातील देशांवर युक्रेन संघर्षांचा नकारात्मक प्रभाव पडू नये, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या युद्धामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांची पायाभूत सुविधा व उर्जा यंत्रणा नष्ट झाली आहे. आपण हिंसाचार करून (देशांच्या) सीमा बदलू शकत नाही, असे शोल्झ यांनी निवेदनात म्हटले आहे.

काँग्रेसची कार्यसमिती निवडणुकीविनाच; गांधी निष्ठावंतांचे वर्चस्व सिद्ध

 मुख्य संपादक आशिष मुगटकर



नवी दिल्ली 

फक्त आमच्याच पक्षात लोकशाही असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत असले तरी, पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील सर्वोच्च समिती असलेल्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक न घेण्याचा निर्णय शुक्रवारी रायपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. या निर्णयामुळे गांधी निष्ठावानांचे पक्षावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले.

काँग्रेसच्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला रायपूरमध्ये शुक्रवारी सुरुवात झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीतील उपस्थित ४५ सदस्यांनी एकमताने कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सुकाणू समितीचे सदस्य असूनही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे तिघेही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. कोणत्याही दबावाविना सुकाणू समितीमध्ये चर्चा केली जावी व निर्णय घेतला जावा, यासाठी गांधी कुटुंबियातील एकही सदस्य बैठकीला न आल्याचे सांगितले जात होते. पण, कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीपासून पक्षाला परावृत्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने हे तिघे बैठकीमध्ये सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसच्या पक्षघटनेमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. घटनेतील १६ अनुच्छेद आणि त्यातील ३२ नियमांमधील बदलांना मंजुरी दिली जाणार आहे. या बदलांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील पक्ष कार्यकर्त्यांना कार्यकारिणी समितीमध्ये स्थान देण्यात येणार आहे. समिती सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली तर या समाजघटकांना कसे सामावून घेणार, असा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीत राखीव जागा ठेवून विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले जाते, हीच पद्धत काँग्रेसलाही अवलंबावी लागली असती. त्यामुळे पक्षाने कार्यकारिणी समितीच्या सदस्य निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे देण्याचा निर्णय घेतला.

'आमच्या पक्षामध्ये सगळय़ांना बोलू दिले जाते. त्यामुळे सुकाणू समितीच्या ४५ सदस्यांनी आपापली मते मांडली. निवडणुकीचे काय परिणाम होतील यावरही अनेक सदस्यांनी मते मांडली. कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीबाबत मतमतांतरे होती पण, अखेर सर्वानुमते निर्णय घेतला गेला. सदस्यांनी सहमती दर्शवताना दोन हात वर केले, यावरून निर्णयप्रक्रियेमागील तीव्र भावना समजू शकेल', असे जयराम रमेश म्हणाले.

पक्षाच्या घटनेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे माजी पक्षाध्यक्ष व काँग्रेसचे माजी पंतप्रधान यांनाही कार्यकारिणीचे सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच, मनमोहन सिंग हेही कार्यकारिणीचे सदस्य असतील. निवडणूक होणार नसल्यामुळे सर्व २५ सदस्यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष खरगे करतील. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गांधीतर नेत्याकडे देण्यात आले असले तरी, कार्यकारिणी समितीवर मात्र गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे अंतर्गत लोकशाहीच्या दाव्याला गालबोट लागू शकते. 

घटनेतील दुरुस्त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. राजकीय, आर्थिक, परराष्ट्र संबंध, सामाजिक न्याय, शेती आणि युवा, शिक्षण, रोजगार या सहा विषयांवरील ठरावही निश्चित केले जातील व त्यावर शनिवारी खुली चर्चा केली जाईल. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण होईल. त्यानंतर माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करतील. रविवारी सकाळी साडेदहा वाजता राहुल गांधींचे भाषण होणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्वाळा; २१ मार्चपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत

 संपादक आशिष मुगटकर



मुंबई 

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टातली केस पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे

१२ आमदार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्वाळा दिला दिला आहे. २१ मार्चपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाहीत. असं कोर्टाने सुनावणीत म्हटलं आहे. 

२४ फेब्रुवारी म्हणजे आज या याचिकेवर सुनावणी होणार होती पण आता पुढची सुनावणी २१ मार्चला होणार आहे. तोपर्यंत कोर्टाचा स्थगिती आदेशही लागू राहणार आहे.

महाराष्ट्राचं विधिमंडळ हे दोन सभागृहांचं आहे. आपल्या राज्याच्या वरिष्ठ सभागृहाला विधानपरिषद म्हणून ओळखलं जातं. राज्यातील विधानपरिषदेची एकूण सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. त्यापैकी १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानंतर करतात.

मात्र, महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून रखडला आहे. राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या संदर्भातील याचिकेवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. दरम्यान हे प्रकरण पुन्हा लांबणीवर पडलं आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं नोव्हेंबर २०२० मध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना १२ सदस्यांनी नावं विधानपरिषदेवर नामनिर्देशित करण्यासाठी पाठवली होती. मात्र, राज्यपालांनी ती मंजूर केली नव्हती.

मुंबई हायकोर्टात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात अपिल केलं आहे. त्या अपिलावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीत देखील दिला होता. तो आजही दिला आहे.

उद्धव ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या यादीच्या प्रश्नावरील अपिल आधीच प्रलंबित असताना आता नवी यादी पाठवली जाण्याची शक्यता असल्याचे अपिलकर्त्यांनी निदर्शनास आणल्याने सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता. एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झाल्यावर ती यादी परत मागवण्यात आली होती.

दरम्यान, मविआने बारा आमदारांचे जे पत्र राज्यपालांना दिले होते. ते पद्धतशीर नव्हते. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले. "तिन्ही पक्षाचे नेते राज्यापालांना भेटायला गेले होते.

त्यानंतर अशा प्रकारे धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाहीत. योग्य फॉरमॅटमध्ये पत्र पाठवा, असे राज्यपालांनी तिन्ही पक्षाच्या नेत्यांना सांगितले होते. मात्र उद्धव ठाकरेंचा यामध्ये इगो होता. त्यामुळे त्यांनी पत्राचा फॉरमॅट बदलला नव्हता," असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज जयंती उत्साहात साजरी

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

गावातील वेशितील शिव मंदिर सांस्कृतिक सभागृहात या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख माता साहेब देवाजी गुरुद्वारा येथील संत हरजित सिंग, प्रमुख पाहुणे पंजाब येथील मनजीत सिंग, मनोज सिंग व सहकारी उपस्थित होते.

संत हरजित सिंग व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमेची पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत वाघमारे, विठ्ठल वाघमारे, पंजाब या ठिकाणाहून जयंती साठी विशेष आमंत्रित भक्त उपस्थित होते.

यावेळी विशेष साधसंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माता साहेब गुरुद्वारा येथील कवी, कथाकार यांच्या वाणीतून संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती कथेच्या माध्यमातून उपस्थितांना सांगण्यात आली.

आयोजकांच्या वतीने या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथी व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

अत्यंत भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आडेराव, पुरभाजी आडेराव, बालाजी आडेराव, परसराम आडेराव घनश्याम आडेराव , विष्णू आडेराव, साईनाथ आडेराव, राम आडेराव, गोविंदा आडेराव, सुरेश सोनटक्के, भगवान सोनटक्के, बालाजी सटवा आडेराव, रोहिदास आडेराव यांनी परिश्रम घेतले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश आडेराव आभार संतोष आडेराव यांनी केले.

स्त्रियांना आरक्षणा बरोबरच सुरक्षेची गरज - अर्चना हौसरे

संपादक आशिष मुगटकर




मुदखेड तालुका / प्रतिनिधी 

येथील प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालय वाई येथे संस्थेच्या वतीने वार्षिक श्नेह संमेलनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे होते,तर प्रमुख अतिथी म्हणून मौजे वाई च्या सरपंच शोभा ढगे,पार्डी वैजापूर च्या सरपंच अर्चना हौसरे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवा निवृत्त व्यवस्थापक प्रल्हाद वाघमारे,कृ.ऊ.बा.स.मु. संचालक मधुकर हौसरे,वाई च्या उपसरपंच शिला कसबे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष भगवान हाणवते,माजी अध्यक्ष मारुती गायकवाड, मुख्याद्यापक निर्मला आडे राठोड,अरुणा गायकवाड स.शी.आषा सोनटक्के,से.स.सो. वाई चे संचालक साहेबराव पाटील वडजे, ग्रामपंचायत सदस्य विलास गायकवाड, गोविंराव पाटील पवार, विमा प्रतिनिधी वसंत पाटील कवळे, सुनील वाघमारे,वैभव टेन्ट अँड डेकोरेटर्सचे प्रो प्रायटर सुरेश वाघमारे,भुजंग वडजे यांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी राजे भोसले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून धूप व दीपाचे प्रज्वलन करून मान्यवारांच्या सत्काराने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सरपंच अर्चना हौसरे म्हणाल्या की, सद्याच्या युगात महिलांना आरक्षण आहे पण सुरक्षितता नाही. म्हणूनच कधी निर्भया तर कधी श्रेया अस्या प्रकारच्या क्रूर हत्याकांडाचीं मालिका तयार होत आहे. हे थांबावायचे असेल तर मॉ जिजाऊचें संस्कार प्रत्येक आईने आपल्या पाल्याना द्यायला हवेत तरच समाजात बाल शिवाबा तयार होतील आणि शिवाजी महाराजांच्या काळात महिलांना आरक्षण नसले तरी संरक्षण होते तसे संरक्षण करणारे शिवबा तयार करायचे असतील तर आई वडिलांच्या संस्कारा बरोबरच शालेय संस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहेत.त्या करिता प्रज्ञा दर्शन शिक्षण संस्था संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यालयाने जी सैक्षणिक चळवळ सुरु केली आहे.या चळवळीत आपण सर्वांनी तन मन धनाने सहभाग नोंदऊन संस्कारमय समाज निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तरच आरक्षणा बरोबरच स्त्रियांचे संरक्षण होईल असे मार्मिक विचार व्यक्त केले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा देतांना महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी तत्कालीन परिस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना तन मन धन ओवाळून परदेशी शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली.तो आदर्श डोळ्यापुढे ठेऊन संस्थेने डोंगराळ ग्रामीण विद्यार्थ्यांना एकाच छताखाली पहिली ते बारावी पर्यंतचे चांगले शिक्षण माफकरित्या उपलब्ध करून देण्याचा मानस ठेवला आहे.हा मानस पूर्ण करण्यासाठी गावकर्यांनी पुढे येऊन संस्थेस मदत करावी असे आवाहन केले.

या नंतर शालेय विद्यार्थ्यांनी विविध प्रकारे संगीताच्या निनादात आपापल्या विविध कला गुणांचे उत्कृष्ट असे सादरीकरण केले हा कार्यक्रम यशस्वीते करिता मुख्याध्यापक निर्मला आडे राठोड, स.शी. आशा सोनटक्के, लिपिक राहुल सोनकांबळे,सेवक दत्ता बहादुरे आदींनी परिश्रम घेतले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुदखेड तालुका अध्यक्षपदी केशव पाटील मुंगल ईजळीकर यांची निवड.

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका/प्रतिनिधी 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुदखेड तालुका अध्यक्ष पदी तालुक्यातील ईजळी गावचे भूमिपुत्र होतकरू तरुण केशव पाटील मुंगल यांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. 

 नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात धनंजय सूर्यवंशी यांनी केशव पाटील मुंगल यांच्यावर सदरील जबाबदारी सोपवली. केशव पाटील मुंगल यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये मुदखेड तालुका अध्यक्ष या पदावर निवड केल्या बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री. धनंजय सूर्यवंशी यांचे आभार व्यक्त केले. 



 देशाचे नेते आदरणीय डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय अजितदादा पवार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून या देशातील बुद्ध शाहू फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी एकनिष्ठ राहून शेतकरी कष्टकरी गोरगरीब वर्गातील युवकांसाठी तथा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी साठी सदैव कटिबद्ध राहील. पक्षश्रेष्ठी, मार्गदर्शक पदाधिकारी, सर्व माजी आणि विद्यमान कार्यकर्ते, आणि माझ्या सर्व सोबत्यांच्या  सदैव ऋणात राहीन असे मत व्यक्त केले. 

 युवकांचे लाडके जिल्हा अध्यक्ष मा.श्री धनंजय सुर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून ग्रामिण नांदेड जिल्हा सचिव पदी, राजेश नारायणराव खंदारे यांची निवड करण्यात आली. या वेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील टेकाळे,युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.रवि पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब सोनकांबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री. अंबादास पाटील, तसेच युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील धुमाळ,भोकर विधानसभा अध्यक्ष अत्माराव कपाटे साहेब, जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील व गजानन पाटील जोगदंड, मुदखेड माजी तालुका अध्यक्ष टिपरसे साहेब, युसुफ कुरेशी मुदखेडकर, तसेच मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री बालाजी गोपिनाथराव बळे, मुदखेड शहर उपाध्यक्ष शेख मुखिद, शेख जानिमीया, शहर उपाध्यक्ष, पपु भाऊ बळे, गोविंद वाघमारे, एस. के. अहमद भाई, पिराजी बळे, पवन पंजाबराव पाटील, रामेश्वर किशनराव मुंगल, मुना सूर्यभान मुंगल, कवीराज मुंगल, बापुराव गंगाधर मुंगल, प्रदीप अर्जुन पाटील, गुलाब नामदेवराव पाटील, गजानन वामनराव पाटील, अमोल सुर्यशराव मुंगल, दत्ता पाटील कळणे, चक्रधर शिवाजी मुंगल, उद्धव थोरात खांबाळकर, ऋषिकेश अर्मता ढगे, भायेस्वर व्यांकटराव मुंगल, विजय चक्रधर मुंगल, परसराम पद्माकर पाटील, अजय सुधाकर मुंगल, चक्रधर मारोतराव मुंगल, अमोल दलित हाटकर, कपिल सोपानराव हाटकर, गौतम सुभाषराव हाटकर, गजानन जाधव ईजळिकर, प्रताप किशनराव शिंदे, कामाजी भगवानराव मुंगल, हरिपाळ, नागोराव मुंगल, योगेश अपाराव मुंगल, ऋषीकेश चांदी हिने, वैभव प्रभाकर मुंगल, सचिन अशोकराव मुंगल, जि. एच. पांचाळ मुगटकर, वैभव गजीले मुगटकर, विलास घोरपे मुगटकर, ओम पाटील निवघेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकप्रिय बातम्या