मुदखेड तालुका / प्रतिनिधी
गावातील वेशितील शिव मंदिर सांस्कृतिक सभागृहात या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख माता साहेब देवाजी गुरुद्वारा येथील संत हरजित सिंग, प्रमुख पाहुणे पंजाब येथील मनजीत सिंग, मनोज सिंग व सहकारी उपस्थित होते.
संत हरजित सिंग व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमेची पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अवधूत वाघमारे, विठ्ठल वाघमारे, पंजाब या ठिकाणाहून जयंती साठी विशेष आमंत्रित भक्त उपस्थित होते.
यावेळी विशेष साधसंगत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात माता साहेब गुरुद्वारा येथील कवी, कथाकार यांच्या वाणीतून संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती कथेच्या माध्यमातून उपस्थितांना सांगण्यात आली.
आयोजकांच्या वतीने या कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथी व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
अत्यंत भक्तिमय वातावरणात संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय आडेराव, पुरभाजी आडेराव, बालाजी आडेराव, परसराम आडेराव घनश्याम आडेराव , विष्णू आडेराव, साईनाथ आडेराव, राम आडेराव, गोविंदा आडेराव, सुरेश सोनटक्के, भगवान सोनटक्के, बालाजी सटवा आडेराव, रोहिदास आडेराव यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश आडेराव आभार संतोष आडेराव यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा