सृजनशिल शिक्षक राजेश कुलकर्णी यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे उद्याला आयोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

जिल्हा परिषद हायस्कुल विष्णुपुरी नांदेड येथील सृजनशिल व बहुश्रूत महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी हे आपल्या शिक्षण क्षेत्रातील 32 वर्षे प्रदीर्घ सेवेनंतर उद्या दिनांक 30 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. 

त्यांनी आपल्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक अभिनव, शैक्षणिक उपक्रम आपल्या शाळेत राबवून आपल्या शाळेची एक वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली आहे. शैक्षणिक, राष्ट्रीय, प्रशासनिक, सांस्कृतिक व सामाजिक ज्ञानदानाचे पवित्र कार्य निष्ठेने केले आहे. तालुका-जिल्हा व राज्य पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, संकल्प शिष्यवृत्ती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्ता विकास अभियान, उन्हाळी सुट्टीतील आनंदी शाळा, लक्षवेधी नमस्कार, ग्रामसंवाद अभियान, सायकांळी 7 ते 9 टि व्ही बंद अभियान, ज्ञानरचानावादी अध्यापन, डिजीटल स्कुल, अक्टीव्हीटी बेसङ् लर्निंग, स्वच्छ भारत अभियान, वाचन प्रेरणा दिन, हात धुवा अभियान, स्वच्छता संकुल वापर अभियान, वृक्षारोपन, जलपुर्नभरण अभियान, तंबाखु मुक्त शाळा क्रिडा व क्रिडागण विकास, एन.टी. एस. व एन. एम. एम. एस. परिक्षेतील तयारी, नवोदय विद्यालय गणित विषय अध्यापन, विविध संशोधन व सामाजिक जागृती विषयी वृत्तपत्र लेखन, आर.टी. ई. कायद्यानुसार शालेय परिसर निर्माण कार्य, मतदार जागृती अभियान, विविध निवडणुकीतील उत्कृष्ट कार्य, रन फॉर युनिटी स्पर्धा, मुख्यमंत्री-माझी शाळा अभियान, मिशन आपुलकी व मिशन गगनभरारी अंतर्गत शाळेस लोकसहभागातून तथा कारपोरेट कंपनीच्या विविध सि.एस.आर.फंडातून जवळपास साठ लक्ष रुपयांचा निधी मिळवून देण्यात मोलाचा वाटा तसेच विविध शासकिय व बिगर शासकिय कार्यक्रमाचे अभ्यासु व उत्कृष्ट सुत्र संचालन अशा विविध यशस्वी कार्याबद्दल त्यांना तालुका, जिल्हा व  2015-16 च्या महाराष्ट्र राज्य शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

  सृजनशील-बहुश्रुत शिक्षक राजेश कुलकर्णी हे दि.30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा सेवापूर्ती सोहळा अत्यंत दिमाखदार पध्दतीने जि.प.हा.विष्णुपूरी येथे दुपारी 1.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

        या सोहळ्यास नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे, डॉ सविता बिरगे-शिक्षणाधिकारी प्राथमिक, भार्गव विजयकुमार राजे-संचालक भार्गव करीअर अँकँडमी,नागराज बनसोडे-गटशिक्षणाधिकारी पं.स.नांदेड, नीलकंठ पाचंगे-जिल्हा कोषागार अधिकारी परभणी्, शिवाजीराव खुडे-माजी उपशिक्षणाधिकारी आणि बंडू आमदूरकर-उपशिक्षणाधिकारी राहणार आहेत. 

           या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन *विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे-अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, विष्णुपूरीच्या प्रथम नागरिक तथा सरपंच श्रीमती संध्या विलास हंबर्डे, साहेबराव हंबर्डे, विश्वनाथराव हंबर्डे,शंकरराव हंबर्डे-सचिव काळेश्वर संस्थान,मुख्याध्यापिका श्रीमती उज्ज्वला जाधव* आणि सर्व शिक्षकांनी केले आहे.

पंजाबचा स्वयंघोषित शिरोमणी समितीप्रमुख बलबीर सिंघ व त्यांच्या सहकार्यावर कारवाई करण्याची मागणी.

 संपादक आशिष मुगटकर



मुगट वार्ताहर 

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील गुरुद्वारा माता साहेब देवांची या धार्मिक स्थळावर येऊन स्वयंघोषित शिरोमणी समिती प्रमुख बलबीर सिंघ व त्यांचे सहकारी घातपात करण्याच्या उद्देशाने पुढील महिन्यातील दि. ८/१०/२४ रोजी नांदेड येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे विविध अग्नि शस्त्र असून त्याचे वैध , अवैध परवाने त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या ताफ्यात विविध शस्त्रधारी लोक असून त्यांच्यावर न्यायालयात विविध खोटे व बनावटीची दिवाणी व फौजदारी खटले दाखल आहेत. 

बुढादल चे 13 वे जत्थेदार बाबा संता सिंघजी यांच्या निधनानंतर १४ वे जत्थेदार बाबा सुरजित सिंघजी यांची जत्थेदार पदी धार्मिक विधी द्वारे निवड करण्यात आली होती पण पंजाब येथील बलबीर सिंघ हे शिरोमणी समिती सोबत राहून खोटी व बनावटीचे दस्तावेज तयार करून स्वतःला निहंगसिंघ बुढा दलाचे १४ वे वारस असल्याचे दाखवत आहे. त्यांच्या या ढोंगीपणामुळे या बुढादल मध्ये दोन गट अनेक वर्षापासून पडले आहे. या गटाने येथील आमच्या सहकार्यावर पंजाब, हरियाणा व इतर राज्यांमध्ये अनेक प्राणघातक हल्ले सुद्धा केले आहेत. सध्या त्यांचे काही सहकारी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट या ठिकाणी दुरुन पाळत ठेवून आहेत. दि.१४ ते १६ ऑक्टोंबर  रोजी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट येथे माता साहिब देवांजी यांच्या ३४३ वा जन्म शताब्दी सोहळा धार्मिक कार्यक्रम साजरा होणार आहे. या कार्यक्रमात धार्मिक स्थळावर त्यांच्याकडून मोठ्या घात पात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बलबीर सिंघ व त्यांचे सहकारी याना नांदेड जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात यावी व तसेच त्यांची कसून चौकशी करून त्यांचा चोखबंदोबस्त करावा. तसेच यापुर्वी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट या धार्मिक स्थळावर पोलीसांचा बंदोबस्त देण्यात यावा. 

      अशा मागणीचे निवेदन नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक      तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना गुरुद्वारा माता साहेब देवांजी येथील जत्थेदार बाबा तेजा सिंघजी गुरुद्वारा माता साहेब देवांजी बुढादल मुगट यांनी दिले आहे. 

यावेळी नांदेड येथील संत बाबा बलविंदर सिंघजी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, स. गुलाब सिंघ सरदार, स. मनप्रीत सिंघ कुंजीवाले, स. गुरमीत सिंघ बेदी, स. राजिन्दर सिंघ पुजारी, पत्रकार रविंदर सिंघ मोदी, अड. स. सुरिंदर सिंघ लोनीवाले, स. मनिंदर सिंघ रामगडीया, स. भारत सिंघ खालसा, विरा महाजन व स. गगनदीप सिंघ जहागीरदार हे उपस्थित होते.

विभागस्तर समिती कडुन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेसाठी विष्णुपुरी जि.प.शाळेची तपासणी

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनीधी

दि.१८ रोजी मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन घोषित डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशाला जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपूरी येथे विभागस्तरीय समितीने तपासणी केली.

 या समितीमध्ये *लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती, नांदेडचे  शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, नांदेड डायटचे प्राध्यापक एस.एस.साखरे* यांचा समावेश होता.           सर्वप्रथम समितीचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव व ग्राम विकास अधिकारी संजय कानोडे यांनी ग्रंथ भेट देवून केले. समितीने शाळेची काटेकोरपणे तपासणी केली.

    यामध्ये शालेय परिसरातील वृक्षारोपण,परसबाग, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, शालेय पोषण आहार स्वयंपाक खोली, विज्ञान-गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, सि.एस.आर.फंडातून प्राप्त झालेला शुध्द पेयजल प्रकल्प, पाऊसाद्वारे होणारा जल पुर्नभरण प्रकल्प, ज्या सोलार प्लान्टमुळे शाळेचे विद्युत बील शून्य झाले आहे,तो सोलार प्रकल्प, डिजिटल क्लासरुम,स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गातील तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष विद्यार्थी कसे करतात, याचे परीक्षण, मुला मुलींचे स्वच्छता गृह,शिक्षक-शिक्षिका-कर्मचारी स्टाफरुम, तक्रार पेटी,परीक्षा विभाग, कार्यालयीन दस्तावेज, प्रत्येक वर्गात विविध विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी केली.                        शाळेची परिपूर्ण तयारी पाहून समितीने समाधान व्यक्त केले. यासोबतच प्रत्येक झाडास क्यु आर कोड लावणे, सिक्स बंडल दस्तावेज, झाडांना शैक्षणिक साहित्याचे तोरणे बांधणे, स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढवणे, टाकावू पासून खत करण्याच्या प्रकल्पास अधिक परिणामकारक पध्दतीने तयार करणे अशा मौलिक सूचना समितीने केल्या.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, संतोष देशमुख,  कृष्णा बिरादार,आनंद वळगे, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, आर.जी.कुलकर्णी, तंत्रस्नेही शिक्षक दत्ता केंद्रे, कांचनमाला पटवे, सुनीता सोळंके, दिनेश अमिलकंठवार व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

मुदखेड शहरात प्रथमच गणपती विर्सजनात सेवानिवृत्त सैनिक पोलीस बंदोबस्तात सामील

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनीधी

 दि.१७ रोजी मुदखेड शहरात प्रथमच गणपती विसर्जनात सेवानिवृत्त माजी सैनीक बंदोबस्तासाठी सहभागी झाले होते.मुदखेडचे माजी सैनिक पोलीस बंदोबस्तासाठी आवर्जुन उपस्थीत होते. सर्व माजी सैनिकांनी पोलिसांना सहकार्य करण्यासाठी गणेश मिरवणुकीच्या कार्यक्रमात चोख बंदोबस्त केला आहे.

गणपती विसर्जन बंदोबस्तासाठी यावेळी सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा उपनगर अध्यक्ष लक्ष्मण देवदे जेष्ठ माजी सैनिक, प्रभु घोंगडे सुबेदार विकास, बलफेवाड तालुका अध्यक्ष, चंद्रकांत तेलंगे ,साहेबराव वेणे,देवराव चौधते,सुनील चौदंते,सुनील चव्हान मारोती गुंठे, शशीकांत मोडवान, देवीदास पवार व शहरातील सर्व माजी सैनिकांनी पोलिसांना सहकार्य व मुदखेड शहरात शांततेचे वातावरन रहावे म्हनुन पोलीस बांधव यांच्या खांद्याला खांदा लावून पोलीस बंदोबस्त कामी सैनिकांनी सहकार्य केल्या बाबद पोलीस व सर्व राजकीय पक्षाचे नेते यांनी समाधान व्यक्त केले आहे !

विष्णुपूरी शाळेत पार पडला डॉ. मंदार शिष्यवृत्ती व भार्गव पुरस्कार सोहळा

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी

            दि. १४ रोजी इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील १९९० च्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी, चार- पाच वर्षांपासूनचे काही जण त्याही पेक्षा आधीपासून मित्र, दहावीनंतर मात्र सर्वांचे मार्ग बदलले, पैकी एकजण केंद्राच्या सेवेत वैज्ञानिक तर दुसरा शिक्षणक्षेत्रात सेवाव्रती हे दोघेही आज यशवंत आणि किर्तीवंतही. डॉ. मंदार देशमुख व भार्गव राजे या दोघांच्या नावे शिक्षणक्षेत्रातील शिक्षण परायण विद्यार्थी आणि विद्यार्थी परायण प्रयोगशील शिक्षक यांना दरवर्षी एक याप्रमाणे गौरविण्याचे ठरवले. त्यातूनच नुकताच विष्णुपूरी  येथे एक देखणा आणि अनुकरणीय कार्यक्रम पार पडला. सिडको येथे अगोदर फक्त जिल्हा परिषदेची एकमेव शाळा होती. वास्तविक लोकसंख्याच मोजकी. पण, नंतर शारदा भवन शिक्षण संस्थेने इंदिरा गांधी हायस्कूल येथे स्थापन केली. या शाळेचे पहिले मुख्याध्यापक कै. मदनलाल शर्मा स्मृती संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे डॉ. मंदार विनायकराव देशमुख शिष्यवृत्ती नांदेड

जिल्ह्यातील होतकरु व विज्ञान विषयाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचे निश्चित केले. पाच हजार रुपये रोख, शाल, ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच मागील २ दशकांपासून नांदेड येथे शिक्षण सेवाव्रती म्हणून अखंड कार्यरत असलेल्या आणि ज्यांच्यामुळे आज शेकडो विद्यार्थी देश- विदेशात वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रात किर्ती मिळविलेल्या भार्गव राजे यांच्या नावे भार्गव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. रुपये ११ हजार रुपये रोख, ग्रंथभेट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. 

पहिला भार्गव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जि.प.हा.विष्णुपूरी येथील विज्ञान विषयाचे माध्यमिक शिक्षक शिवाजी विश्वनाथ वेदपाठक यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तर अनेक विज्ञान प्रतिकृती तयार करुन त्याचे प्रयोगाच्या माध्यमातून सादरीकरण करणाऱ्या श्रध्दा नागोराव पांचाळ या इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी डॉ. मंदार विनायकराव देशमुख या पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात आले.

                         शिक्षकदिनाच्या महिन्यात चौदा सप्टेंबरला जि.प.हा.विष्णुपूरी येथील शाळेत हा सोहळा पार पडला. यावेळी भार्गव राजे, डॉ. मंदार देशमुख, डॉ. श्रीकांत देशपांडे, गोविंद लाठकर, सतीश भेंडेकर, सौ. कविता जोशी, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव हे उपस्थित होते.

                       शाळेच्यावतीने सर्व मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे समर्पक प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार एम.ए.खदीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, संतोष देशमुख,कृष्णा बिरादार, मारोती काकडे, पंचफुला नाईनवाड, दिनेश अमिलकंठवार, जयश्री देवशेट्टे , सुनीता सोळंके, चंद्रकला इदलगावे,नागोराव येलके व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

कामळज ता मुदखेड येथे श्रीचक्रधर स्वामी व श्रीगोविंद प्रभू जन्मोत्सवा निमित्त भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका प्रतिनीधी

  महानुभाव पंथाचे संस्थापक परब्रम्ह परमेश्वर अवतार, जीवोद्धारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी 12व्या शतकात अवतार धारण करून महानुभाव पंथाची स्थापना केली समाजातील अनिष्ट,रूढी, प्रथा-परंपरा विरुद्ध, समाज सुधारणा करून स्त्री पुरुष समानतेचा मुलमंत्र देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीची जयंती व स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे अवलिया परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन  दि १६सप्टेंबर २०२४  रोज सोमवार  कामळज ता मुदखेड येथे मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे

     या महोत्सवाची सुरुवात दि ०९/०९/२०२४ सोमवार रोजी प्रात:काली कुलवंदनास मंगलस्नान , गीतापाठ पारायण, ध्वजारोहण, सभामंडप उदघाटन, अतिथी स्थानापन्न, स्वागत , दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, शुभेच्छापर वक्तव्य, भागवत कथेचा सुभारंभ प. पू. प.म श्री कथाव्यास संकेतमुनी बाबाजी महानुभाव मठाधिपती (आचार्य गोपीराज महानुभाव संस्थान शेळावे ता पारोळा जि जळगाव )

यांची सुश्राव्य संगीत भागवत कथा  दररोज ३ ते ५ या वेळेत  भागवत कथासप्ताह व  रात्री ९ ते ११ या वेळेत प पु प म श्री रमेशराज शास्त्री पातुरकर आमदाबाद जि पुणे,प पु प म श्री रमेशराज शास्त्री कपाटे बिजेगाव जि नांदेड.प पु प म श्री गिरीशराज शास्त्री उरळीकांचन जि पुणे,प पु प म श्री ऋषिराज बाबा शिंदेगाव जि नाशिक,तपस्विनी शितल बाई भोजने बरड शेवाळा ता हदगाव.प पु प म श्री जयेशमुनी मराठे गंगापूर जि नाशिक,प म श्री संकेत बाबाजी शेवाळे ता पारोळा जि जळगाव यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे.

 दि. १५सप्टेंबर २०२४ दुपारी ३ वाजता कुलवंदनाची रथयात्रा आचार्य संत महंताची भव्य शोभा  यात्रा संगीत सेवा रोकडेश्वर भजनी मंडळ माळकौठा व दिनांक १६ सप्टेंबर प्रात:काळी पाच वाजता कुलवंदनास सुगंध चंदन आधी मंगल स्नान ,८:०० ते ११:३० संत महिला गीतापाठ पारायण , ध्वजारोहण , सभामंडप  उद्घाटन अतिथी अध्यक्ष स्थानापन्न स्वागत दीप प्रज्वलन प्रास्ताविक धर्मसभा प्रबोधन प्रमुख अतिथी प पु प म श्री पारीमांडलये कुलभूषण आचार्य श्री मानेकर बाबाजी शास्त्री श्री दत्त मंदिर संस्थान सावदा जि जळगाव,प पु प म श्री उपाध्य कुलभूषण आचार्य श्री जावळे बाबाजी शास्त्री श्री कृष्ण ज्ञान मंदिर सावदा जि जळगाव यांच्या प्रमुख उपस्थित आणि प पू प म श्री खरवळकर बाबाजी जामोदेकर सिंधी ता उमरी जि नांदेड,प पु प म श्री हरबास बाबाजी शास्त्री कारंजेकर बिल्लाळी, ता मुखेड जि नांदेड,प पु प म श्री महंत गोमेराज बाबाजी कारंजेकर म्हसावद ता शहादा जि नंदुरबार,प पू प म श्री शहागडकर बाबाजी पैठणकर निवघाबाजार ता. हदगाव जि नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा समस्त संत महंत भिक्षुक वासनिक तपस्वीनी व पंथीय पंथीयत्तर बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महंत श्री अनंतव्यासबाबाजी जावळे संचालक श्री दत्त मंदिर कामळज हे करणार आहेत तरी परिसरातील सर्व धर्मप्रेमींनी उपस्थित राहून धर्मज्ञानाचा भागवत कथा, नामाकिंत किर्तनकाराच्या किर्तनाचा  व महाप्रसादाचा  लाभ घ्यावा.

 असे आवाहन आयोजक समस्त गावकरी मंडळ कामळज (बु) ता .मुदखेड जि.नांदेड येथील गावकऱ्यांच्या वतीने केले आहे

गणेश उत्सव शांततेत साजरे करा :- डॅनियन जाॅन बेन यांचे प्रतिपादन

मुदखेड तालुका प्रतिनीधी

गणेशोत्सवासह येणारे सन सामाजिक सलोखा आबादीत राहील आशा पध्दतीने साजरे व्हावे. उपविभागीय पोलीस अधिकारी डी.जाॅन बेन हे शांतता समिती  मुदखेडच्या  तहसील कार्यालय सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की... गावातील गल्ली रस्त्यांचा विचार करून मुर्ती असावी ,गुलाल ऐवजी फुलांचा वापर करण्यात यावे, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल. असे विविध देखावे तयार करण्यात येऊन कार्यक्रम साजरे करण्यात यावे. सविस्तर मार्गदर्शक सुचना दिल्या व श्री गणेश उत्सव आनंदात साजरा करा अशी शुभेच्छा व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी केलेतहसिलदार आनंद देऊळगांवकर मुख्याधिकारी शैलेश फडसे, ना. तह मारोती जगताप,  एल. एस. शिंदे उप कार्यकारी अभियंता,तालुका कॉंग्रेस अध्यक्ष  प्रताप देशमुख, माजी न. प. उपाध्यक्ष माजी सैनिक मराठवाडा     अध्यक्ष लक्ष्मण देवदे, मनोज कमटे,माजी नगराध्यक्ष  प्रतिनिधी माजी उपाध्यक्ष  शंकर  राठी, करिम  खान, मुजीब  पठाण, गणेश   मंडळ प्रमुख ऋषिकेश पाटील पारवेकर ,गिरीष कोतावार, सचिन  चंद्रे, आदीने विचार मांडले, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  प्रल्हाद मस्के यांनी केले.शहर कॉंग्रेस अध्यक्ष व आपले शहर आपला उत्सवाचे प्रमुख कैलास गोडसे, पोलीस उप निरिशक बी. आर. कांबळे यांनी विचार मांडले.

 माजी सैनिक संघटना उत्सवात सहकार्य करून पोलीस मित्र म्हणून जबाबदारी घेण्यास तयार आहोत अशी भुमिका माजी सैनिक अध्यक्ष देवदे यांनी मांडली. मागील अकरा वर्षा पासुन चालु असलेली स्पर्धा या वर्षात चालु असेल हे माजी नगरसेवक गोडसे यांनी जाहिर केले.युवा अध्यक्ष मुजीब पठाण, पत्रकार अतिक अहेमद, पत्रकार सिद्धार्थ चौदंते, अब्दुल रजाक, साहेबराव गागलवाड,अमोल टेकले, अभियंता अनंत कुलकर्णी, मंडळ अधिकारी पठाण, किशोर पाटील, ग्रामीण भागातील पोलीस पाटील, व महिला पोलिस पाटील, मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी कार्यक्रमात स्वर्गीय खासदार कै वसंतराव चव्हाण यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली देण्यात आली आहे.

राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षक 5 सप्टेंबर शिक्षक हा दिन काळा दिन साजरा करणार..

 संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

 महाराष्ट्र राज्यात अंशतः अनुदानित शिक्षक वारंवार आंदोलन करूनही शासनाने खोटी अश्वासने या व्यक्तीरिक्त शिक्षकांच्या पदरी काहीच मिळत नाही व हक्काचा १००% पगार मिळत नसल्याने राज्यभर गेली दिडमहिनाभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय समोर लाक्षणिक धरणे आंदोलन, पाथरी, धाराशिव येथे अन्नत्याग आंदोलन केले त्यावेळेस शिक्षणमंत्र्यांनी फक्त अस्वासन दिले ते अश्वासन पूर्तीसाठी शिक्षक समन्वय संघाचे १६ ऑगस्ट पासुन आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुरू आहे.

     त्याच प्रमाणेकोल्हापूर येथे मागील अकरा दिवसापासून अन्नत्याग करणारा संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या उपोषण स्थळी गंभीर परिस्थिती पाहता आणि कोल्हापूर मधील घडामोडी पाहता महाराष्ट्रातील ६३ हजार शिक्षकांनो आता अंतिम तीव्र लढा करत ५ सप्टेंबर  काळा दिन साजरा करणार.

 काळा दिन हाच आपल्या आयुष्यात आता हक्काची पगार नक्की घेऊन येईल, तो दिन आपला खरा शिक्षक दिन असेल असे नांदेड जिल्हा समन्वयक प्रा.कैलास खानसोळे यांनी सांगितले

लोकप्रिय बातम्या