मुदखेड तालुका प्रतिनीधी
महानुभाव पंथाचे संस्थापक परब्रम्ह परमेश्वर अवतार, जीवोद्धारक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी 12व्या शतकात अवतार धारण करून महानुभाव पंथाची स्थापना केली समाजातील अनिष्ट,रूढी, प्रथा-परंपरा विरुद्ध, समाज सुधारणा करून स्त्री पुरुष समानतेचा मुलमंत्र देणाऱ्या सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामीची जयंती व स्वच्छतेचा मूलमंत्र देणारे अवलिया परमेश्वर अवतार श्री गोविंद प्रभूंचा अवतार दिन दि १६सप्टेंबर २०२४ रोज सोमवार कामळज ता मुदखेड येथे मोठया उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे
या महोत्सवाची सुरुवात दि ०९/०९/२०२४ सोमवार रोजी प्रात:काली कुलवंदनास मंगलस्नान , गीतापाठ पारायण, ध्वजारोहण, सभामंडप उदघाटन, अतिथी स्थानापन्न, स्वागत , दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, शुभेच्छापर वक्तव्य, भागवत कथेचा सुभारंभ प. पू. प.म श्री कथाव्यास संकेतमुनी बाबाजी महानुभाव मठाधिपती (आचार्य गोपीराज महानुभाव संस्थान शेळावे ता पारोळा जि जळगाव )
यांची सुश्राव्य संगीत भागवत कथा दररोज ३ ते ५ या वेळेत भागवत कथासप्ताह व रात्री ९ ते ११ या वेळेत प पु प म श्री रमेशराज शास्त्री पातुरकर आमदाबाद जि पुणे,प पु प म श्री रमेशराज शास्त्री कपाटे बिजेगाव जि नांदेड.प पु प म श्री गिरीशराज शास्त्री उरळीकांचन जि पुणे,प पु प म श्री ऋषिराज बाबा शिंदेगाव जि नाशिक,तपस्विनी शितल बाई भोजने बरड शेवाळा ता हदगाव.प पु प म श्री जयेशमुनी मराठे गंगापूर जि नाशिक,प म श्री संकेत बाबाजी शेवाळे ता पारोळा जि जळगाव यांची कीर्तन सेवा आयोजित केली आहे.
दि. १५सप्टेंबर २०२४ दुपारी ३ वाजता कुलवंदनाची रथयात्रा आचार्य संत महंताची भव्य शोभा यात्रा संगीत सेवा रोकडेश्वर भजनी मंडळ माळकौठा व दिनांक १६ सप्टेंबर प्रात:काळी पाच वाजता कुलवंदनास सुगंध चंदन आधी मंगल स्नान ,८:०० ते ११:३० संत महिला गीतापाठ पारायण , ध्वजारोहण , सभामंडप उद्घाटन अतिथी अध्यक्ष स्थानापन्न स्वागत दीप प्रज्वलन प्रास्ताविक धर्मसभा प्रबोधन प्रमुख अतिथी प पु प म श्री पारीमांडलये कुलभूषण आचार्य श्री मानेकर बाबाजी शास्त्री श्री दत्त मंदिर संस्थान सावदा जि जळगाव,प पु प म श्री उपाध्य कुलभूषण आचार्य श्री जावळे बाबाजी शास्त्री श्री कृष्ण ज्ञान मंदिर सावदा जि जळगाव यांच्या प्रमुख उपस्थित आणि प पू प म श्री खरवळकर बाबाजी जामोदेकर सिंधी ता उमरी जि नांदेड,प पु प म श्री हरबास बाबाजी शास्त्री कारंजेकर बिल्लाळी, ता मुखेड जि नांदेड,प पु प म श्री महंत गोमेराज बाबाजी कारंजेकर म्हसावद ता शहादा जि नंदुरबार,प पू प म श्री शहागडकर बाबाजी पैठणकर निवघाबाजार ता. हदगाव जि नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा समस्त संत महंत भिक्षुक वासनिक तपस्वीनी व पंथीय पंथीयत्तर बंधू भगिनी उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महंत श्री अनंतव्यासबाबाजी जावळे संचालक श्री दत्त मंदिर कामळज हे करणार आहेत तरी परिसरातील सर्व धर्मप्रेमींनी उपस्थित राहून धर्मज्ञानाचा भागवत कथा, नामाकिंत किर्तनकाराच्या किर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.
असे आवाहन आयोजक समस्त गावकरी मंडळ कामळज (बु) ता .मुदखेड जि.नांदेड येथील गावकऱ्यांच्या वतीने केले आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा