फुकटच्या सरकारी योजना बंद करा, खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे मुख्य सचिवांचे आदेश

 संपादक आशिष मुगटकर

मातृभूमी न्युज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासारख्या लोकानुयायी योजनांमुळे सरकारी तिजोरीवरील बोजा वाढल्याने राज्य सरकारने सर्वच स्तरावर काटकसरीचे धोरण स्वीकारलेले दिसते. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विभागाला दिलेल्या नियतव्ययाच्या प्रमाणात किती पट वाढ होणार आहे, हे नमूद केल्याशिवाय मंत्रिमंडळासमोर नवे प्रस्ताव सादर करण्यात येऊ नयेत, अशी सक्त ताकीद मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सर्व विभागांना दिली आहे.

याशिवाय अनुत्पादक खर्च मर्यादित ठेवण्यासह फुकटच्या सरकारी योजना बंद करण्याच्या अथवा त्यांचे एकत्रीकरण करण्याच्या सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. (stop free government schemes, chief secretary orders to control expenditure)

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2025- 26 या वर्षीचा 45 हजार कोटींच्या महसूली तुटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षात राज्य सरकारला खर्चासाठी 7 लाख 20 कोटी उपलब्ध आहेत. महसुली जमेचा विचार करता यंदा 45 हजार 891 कोटी तूट अंदाजित असून 1 लाख 36 हजार 235 कोटी राजकोषित तूट येणार आहे. राज्याची ही बिकट परिस्थिती पाहता खर्च आटोक्यात आणण्यासाठी काटकसरीचे विविध मार्ग योजण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

महसुली जमेच्या 58 टक्के तरतूद ही अनिवार्य खर्चासाठी खर्ची पडत असून तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करुन हा खर्च मर्यादित ठेवा. विभागांनी प्रस्ताव सादर करताना योजनांवर झालेला खर्च, दिलेल्या प्रशासकीय मान्यता तसेच उपलब्ध नियतव्यय आणि दायित्व याबाबत तपशील द्यावा. नव्या प्रस्तावामुळे विभागाच्या नियतव्ययमध्ये किती पट वाढ होणार आहे, याची माहिती मंत्रिमंडळ टिपण्णीमध्ये देण्याची सूचना मुख्य सचिवांनी परिपत्रकात केली आहे.

अनुत्पादक खर्च कमी करा. योजनांचे एकत्रीकरण करा. उत्पादक भांडवली खर्च वाढवा तसेच फुकटच्या योजना बंद करा. अनिवार्य खर्चाबाबत वित्त विभागाचे तसेच कार्यक्रम खर्चाबाबत वित्त आणि नियोजन विभागाचे अभिप्राय असल्याशिवाय मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात येऊ नयेत. मंत्रिमंडळाने योजनेच्या आर्थिक भारामध्ये बदल सुचवल्यास शासन निर्णय निर्गमित करण्यापूर्वी वित्त आणि नियोजन विभागाची पूर्वसंमती घ्यावी, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थीनीचे यश

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

खेल व युवा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने यावर्षी घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय युवा संसद या  राष्ट्रव्यापी कार्यक्रमात  निवड झाली. महाराष्ट्रातून विविध विद्यापीठातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.

 या स्पर्धेतून पुढे राष्ट्रीय स्तरावर निवड केली जाणार आहे. त्याकरिता इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील बीएससी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु ऐश्वर्या नांदेडकर या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवन येथे संपन्न  झालेल्या राज्यघटना हक्क कर्तव्य आणि प्रगती या विषयावर आपले परखड मते मांडून उपस्थित आमची मने जिंकली आहेत.

त्याबद्दल  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दुर्गेश रवंदे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ भागवत पस्तापुरे विशाल मस्के व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे या यशाबद्दल कौतुक केले

युवा संसद कार्यक्रमात पार्थ रवंदे चा सहभाग

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

युवा मंत्रालय भारत सरकार च्या वतीने दरवर्षी युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यासाठी देशभरातील विद्यापीठातून निवडक युवकांना राज्य स्तरावर मांडणी करण्याची संधी मिळत असते.

 नांदेड येथील श्री गुरू गोविंद सिंहजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी पार्थ दुर्गेश रवंदे याने स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड चे प्रतिनिधित्व करत मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भारतीय राज्यघटना: हक्क, कर्तव्य आणि प्रगती या विषयावर सादरीकरण केले. ज्यास उपस्थितांनी चांगला प्रतिसाद दिला. 


त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नांदेड जिल्हयातील अंशतः अनुदानित शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामूहिक आत्मदहन

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

दिः २५ मार्च मंगळवार रोजी नांदेड जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामुहिक आत्महदन, अंगाला दुखापत करने अथवा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांच्या सतर्कतेमुळ अनर्थ टळला जिल्हाभरातून जवळपास 400 चे आसपास शिक्षक जमले व उन्हान दुपारी एक वाजता शासनाच्या विरुद्ध घोषना देत बोबां बोंब करुण आपला आक्रोश व्यक्त केला जात असतांनाच महिला शिक्षिका प्रा संगीता राठोड यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांनी ताब्यात घेऊन सर्वाना वजीराबाद पोलीस ठाण्यात बसविण्यात आले 

१४ ऑक्टोंबर२०२४ च्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प २०२४, पुरवणी मागण्या२०२५ व अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद न केल्याच्या संदर्भात. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास मा.जिल्हाधिकारी यांच्यामार्फत  सविनय निवेदन सादर करण्यात येते की तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रिमंडळांनी दि.१० ऑक्टोंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेने दि.१४ ऑक्टोंबर २०२४ चा शासन निर्णय काढला यासाठी सातत्याने राज्यात तसेच आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून शासन निर्णयातील एकूण पात्र ५२ हजार पदांना शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या हेडनिहाय अनिवार्य खर्च म्हणून नागपूर येथील डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद होणे अपेक्षित होते परंतु शिक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्री उपलब्ध न झाल्याने या विषयाची पुरवणी मागणी मंजूर झाली नाही असे असंवैधानिक उत्तर राज्यातील शिक्षकांना देण्यात आले परंतु समाज घडवणाऱ्या या शिक्षकांनी मोठ्या मनाने "चला पुढे जाऊया" या संकल्पनेतून निदान अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्या किंवा पूर्ण अर्थसंकल्पात तरतूद होईल अशी भाबडी अपेक्षा सरकारकडे ठेवली तसेच राज्यात सरकार विरोधात कुठेही आंदोलन उभे केले नाही परंतु पुरवणी मागण्या व पूर्ण अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या शासन निर्णयातील पदांना टप्पा वाढीसाठी अपेक्षित तरतूद या शासनाने न केल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व त्यातूनच परवा राज्यातील बीड येथील धनजंय नागरगोजे सर यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर आणखीन अन्य ४ बांधवांचा नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला हे झालेले मृत्यू नैसर्गिक नसून सदरील शिक्षकांची हत्या ही शासनाने केलेली आहे शासन एकीकडे मंत्रिमंडळात निर्णय घेऊन त्यांचा शासन निर्णय काढत असेल व त्यास निधी मंजूर करत नसेल तर हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे त्यामुळे राज्यातील तमाम ५२ हजार शिक्षकांची शुद्ध फसवणूक आहे अशी भावना आम्हा शिक्षक बांधवात निर्माण झाल्याने आता या राज्य सरकारवर कुठलाही विश्वास आमचा उरलेला नाही आमची मागणी ही अत्यंत जुनी २० वर्षापासून ची ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांची असून या मागणीसाठी अत्यंत तोकडी  रक्कम म्हणजे फक्त ८२६ कोटी रुपयांची असताना तसेच शेकडो आंदोलने,लाठीमार,तुरुंगवास ह्या शिक्षकांनी सोसलेला असताना शासन जर दिवसाढवळ्या बुद्धिजीवी शिक्षकांची अशी शुद्ध  फसवणूक करत असेल तर आमच्या समोर आता जिवंतपणी मेल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आम्हाला शिल्लक दिसत नसल्याने आम्ही दि. २५ मार्च २०२५ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालया आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला खरा पण यापूढे जर वाढीव टप्पा अनुदान नाही मिळाल्यास पुन्हासामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा उपस्थित शिक्षकांनी दिला

            यावेळी जिल्हयातील चारशेच्या व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.



.

मुगटला डिजे मुक्त वातावरणात छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्साहात साजरी.

 संपादक आशिष मुगटकर

मुगट वार्ताहर 

दि.२३रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या गजरात,वाजत गाजत ही भव्य दिव्य जयंती डिझेल मुक्त वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.

सकाळी संतश्री आत्माराम महाराज बोधीमंठाचे मठाधिपती सितारामजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच मठाधिपती मोतीगीर महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने गावातील शिवप्रेमीची उपस्थिती होती.शिवजयंती मंडळा कडून प्रथम ढोल ताशा पथकाला जयंती निमित्ताने पाचारण करण्यात आले होते.


सायंकाळी सहा वाजता गावातील मुख्य रस्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, उत्साह पुर्ण वातावरणात ही जयंती मिरवणूक काढण्यात आली.गावात प्रथमच ढोल ताशा पथक आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यांनी गर्दी केली होती.

सद्या जयंती म्हटले की डिजे हा आलाच.परंतु याच डिजे मुळे तरुणांमध्ये वाद होऊन ते विकोपाला जात आहेत.त्यामुळे  जयंती मंडळाने गावात जयंती शांततेत, उत्साहात साजरी करण्यासाठी ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते.कुठला ही अवाढव्य खर्च न करता जयंती उत्साहात व डिजे मुक्त वातावरणात संपन्न झाली.

त्यामुळे जयंती मंडळाचे गावात सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.

यावेळी दादाराव मुंगल,मुर्ताजी मुंगल, अनिल कल्याणे, मनोज भांगे,राजु मुंगल,राजु कल्याणे, अंकुश मुंगल, आनंदा मुंगल, गोविंद मुंगल, आदींनी जयंती साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.

रमजान ईद शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनास सहकार्य करावे - पोलीस निरिक्षक वसंत सप्रे

मुदखेड तालुका प्रतिनिधी अतिख अहेमद 

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना शेवटच्या आठवड्यात असून रमजान ची ईद ईद-उल -फित्र संभवता ३१ मार्च किंवा १ एप्रिल साजरी होण्याची शक्यता आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने दि. २३ मार्च सकाळी १२ वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


 या बैठकीत शहरातील सर्व मुस्लिम समाजातील नागरिक सह राजकारणी आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होती  पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी वसंत सप्रे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधन करताना सांगितले की मागच्या काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत सहकार्य अपेक्षाप्रमाणे  केले असून आगामी काळातील होऊ घातलेल्या ईदचा सन सुद्धा शांततेत साजरी करत पोलीस प्रशासनात सहकार्य करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक यावेळी केले.
याप्रसंगी माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब,काझी मोहल्ला मशीद कमिटी चे अध्यक्ष बाबू खान पठाण,मदीना मस्जिद कमिटी चे उपाध्यक्ष शौकत खान पठाण, नयूम सेठ बागवान, जामा मस्जिद कमिटी चे अध्यक्ष मोहम्मद रफिक भाई,माजी नगर सेवक प्रतिनिधी अब्दुल सलाम, तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष मोहम्मद गौस अब्दूल नबी ,मौलाना अशफाक मोमीन,काँग्रेस शहर सचिव अतीख अहेमद,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मुजीब पठाण,राष्ट्रवादी  काँग्रेसचे शहर अध्यक्ष मोहम्मद बुरहान, ए आई एम आय एम चे शहर अध्यक्ष मोहम्मद हुसैन, वसीम अब्बासी,जमील खान पठाण,अकबर किराणा,सईद भाई फुलारी,मोहम्मद गौस, रशीद खीचडिवाले, मोहम्मद अझहर, पत्रकार 

मोहम्मद हकीम खानदान,  पत्रकार हफीझ कुरेशी आदींनी आप आपल्या विनंती करत ईद साजरी करताना इतर संबंधित विभागांशी समन्वय करत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सूचना मांडल्या.

शांतता बैतकीचे आयोजन पोलीस विभागातील  जिल्हा विशेष शाखेचे प्रमुख हेड कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी केले

जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल कदम साहेब यांची उद्या मुदखेडला भेट

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय तर्फे मिळणाऱ्या विविध सुविधाचा लाभ घेण्यासाठी आपल्या मुदखेड तालुक्यात जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन विठ्ठल कदम साहेब दि.१८/०३/२०२५ रोजी मंगळवारी सैनिक कार्यालय मुदखेडला भेट देणार आहेत.

 त्यात विविध योजनांची माहिती व त्यात येणाऱ्या अडचणी याविषयी माजी सैनिकांना संवाद साधणार आहेत. योजना व त्यातील अडचणी खालील प्रमाणे

१.कल्याणकारी योजना.२. DSW ऑनलाईन लाईन रजिट्रेशन.३. स्पृश संबंधित अडचणी.४. पेन्शन संबंधित समाश्या.५. नावात बदल करायचा असेल.६. जन्म तारखेत बदल करायचा असेल.७. घर पट्टी माफ करणे.

आणखी काही तक्रारी असतील तर आपण सर्व मूळ कागद पत्रा सोबत हजर राहावे. येताना खालील कागद पत्र सोबत घेऊन यावेत.१.फोटो ,२.आधार कार्ड, ३.पॅन कार्ड ४. डिस्चार्ज बुकची सर्व पाने ५. PPO (पेन्शन पेमेंट ऑर्डर)  ६. ECHS कार्ड ७. पेन्शन बँक पास बुक चे पहिले  पान.

तरी सर्व सेवानिवृत सैनिक,सैनिक विधवा व कुटूंबामधील पेन्शन धारक व्यक्ती यांनी दि.१८ रोजी मंगळवारी सकाळी १०:०० वाजता सैनिक कार्यालय मुदखेड ( HP पेट्रोल पंपाच्या बाजुला) उपस्थीत रहावे धन्यवाद.

फक्त खालील विभागातील पेन्शण धारक व सैनिक विधवा यांच्या साठी आर्मी,नेव्ही, एयरफोर्स, यांच्या साठीच वरील कँम्प ठेवण्यात आला आहे. 

अशी माहिती सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष तथा मा.उपनगराध्यक्ष मुदखेड, श्री.लक्ष्मणराव देवदे यांनी दिली.

जाहिरात 



कर्ज बाजरी शेतकऱ्यांचे बँक खाते व्होल्ड केल्याने व्यथित होऊन केली आत्महत्या

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

दि.११ रोजी मुदखेड तालुक्यातील मौजे वाई येथील रावसाहेब मानिका ढगे  या शेतकऱ्यांने सततची नापीकी व बँकेने खाते व्होल्ड केल्यामुळे स्वतःची जीवन यात्रा संपवून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे आहे.

रावसाहेब पिता मानिका ढगे रा. वाई ता. मुदखेड जि. नांदेड हे आपल्या कोरडवाहू शेतीवर आपला उदरनिर्वाह करीत असत.सतत होणारी नापिकी या मुळे बँक व खाजगी सावकारांच्या कर्ज पाशात अडकल्याने निरंतर होणारी कुचंबना यामुळे आधीच व्यतिथ झाले होते, त्यातच वडिलोपार्जित घर मोडकळीस झाल्याने कुटुंब उघड्यावर आले म्हणून राहण्यापुरते बांधकाम करण्यासाठी काम हाती घेतले होते. आर्थिक दुस्ट चक्रामुळे बांधकाम उरकता उरकत नव्हते, त्यातच थकीत कर्ज झाल्याने बँकेने खाते व्होल्ड केले, यामुळे खाजगी गृह कर्ज देणाऱ्या खाजगी कंपनीने कर्ज नाकारले, तुटपुंज्या रोज मजुरीतून जमावलेली पुंजी संपून गेली, वेळेवर कोणतेच कामे होत नव्हती.यातच शासनाचे पंतप्रधान सन्मान निधी व दुष्काळ या सारखे मिळणारे अनुदान बँक खाते व्होल्ड झाल्याने अडकून पडले.

यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांने अखेर आर्थिक विवचनेतून व निराशेतून अखेर टोकाची भूमिका घेऊन घराच्या बांधकामास अनलेल्या नारळी दोर बांधून दि.१० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी १०:३० च्या दरम्यान स्वतःच्या अर्धवट बांधकाम झालेल्या स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करुन आपली जीवन यात्रा संपविली. 

त्यांच्या पश्चात आई सुभद्राबाई माणिक ढगे, पत्नी सत्वशीलाबाई रावसाहेब ढगे, मुलगा माणिक रावसाहेब ढगे, मुलगी मीनाबाई गंगाधर पंडागळे असा परिवार असून, मुदखेड येथील पोलीस स्थानकात आकस्मित मृत्युंची नोंद घेण्यात आली असून, ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे दि. ११ मार्च २०२५ रोजी शव विच्छेदन झाल्यानंतर मौजे वाई येथे साश्रू नयनाने नातेवाईक व गावाकऱ्यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, पंच क्रोशीत शोक कळा पसरली आहे.

लोकप्रिय बातम्या