मुगट वार्ताहर
दि.२३रोजी मुगट येथील मुख्य रस्त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.पारंपारिक ढोल ताशा पथकाच्या गजरात,वाजत गाजत ही भव्य दिव्य जयंती डिझेल मुक्त वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी संतश्री आत्माराम महाराज बोधीमंठाचे मठाधिपती सितारामजी महाराज यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच मठाधिपती मोतीगीर महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने गावातील शिवप्रेमीची उपस्थिती होती.शिवजयंती मंडळा कडून प्रथम ढोल ताशा पथकाला जयंती निमित्ताने पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळी सहा वाजता गावातील मुख्य रस्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात, उत्साह पुर्ण वातावरणात ही जयंती मिरवणूक काढण्यात आली.गावात प्रथमच ढोल ताशा पथक आल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्यांनी गर्दी केली होती.
सद्या जयंती म्हटले की डिजे हा आलाच.परंतु याच डिजे मुळे तरुणांमध्ये वाद होऊन ते विकोपाला जात आहेत.त्यामुळे जयंती मंडळाने गावात जयंती शांततेत, उत्साहात साजरी करण्यासाठी ढोल पथकाला पाचारण करण्यात आले होते.कुठला ही अवाढव्य खर्च न करता जयंती उत्साहात व डिजे मुक्त वातावरणात संपन्न झाली.
त्यामुळे जयंती मंडळाचे गावात सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.
यावेळी दादाराव मुंगल,मुर्ताजी मुंगल, अनिल कल्याणे, मनोज भांगे,राजु मुंगल,राजु कल्याणे, अंकुश मुंगल, आनंदा मुंगल, गोविंद मुंगल, आदींनी जयंती साजरी करण्यासाठी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा