नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दिः २५ मार्च मंगळवार रोजी नांदेड जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सामुहिक आत्महदन, अंगाला दुखापत करने अथवा स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांच्या सतर्कतेमुळ अनर्थ टळला जिल्हाभरातून जवळपास 400 चे आसपास शिक्षक जमले व उन्हान दुपारी एक वाजता शासनाच्या विरुद्ध घोषना देत बोबां बोंब करुण आपला आक्रोश व्यक्त केला जात असतांनाच महिला शिक्षिका प्रा संगीता राठोड यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांनी ताब्यात घेऊन सर्वाना वजीराबाद पोलीस ठाण्यात बसविण्यात आले
१४ ऑक्टोंबर२०२४ च्या शासन निर्णयातील पदांना पुरवणी अर्थसंकल्प २०२४, पुरवणी मागण्या२०२५ व अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये निधीची तरतूद न केल्याच्या संदर्भात. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास मा.जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सविनय निवेदन सादर करण्यात येते की तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मंत्रिमंडळांनी दि.१० ऑक्टोंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेने दि.१४ ऑक्टोंबर २०२४ चा शासन निर्णय काढला यासाठी सातत्याने राज्यात तसेच आझाद मैदान मुंबई येथे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने महाएल्गार आंदोलन करण्यात आले होते, या आंदोलनाची फलनिष्पत्ती म्हणून शासन निर्णयातील एकूण पात्र ५२ हजार पदांना शासन निर्णयात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या हेडनिहाय अनिवार्य खर्च म्हणून नागपूर येथील डिसेंबर २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात तरतूद होणे अपेक्षित होते परंतु शिक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्री उपलब्ध न झाल्याने या विषयाची पुरवणी मागणी मंजूर झाली नाही असे असंवैधानिक उत्तर राज्यातील शिक्षकांना देण्यात आले परंतु समाज घडवणाऱ्या या शिक्षकांनी मोठ्या मनाने "चला पुढे जाऊया" या संकल्पनेतून निदान अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये सादर झालेल्या पुरवणी मागण्या किंवा पूर्ण अर्थसंकल्पात तरतूद होईल अशी भाबडी अपेक्षा सरकारकडे ठेवली तसेच राज्यात सरकार विरोधात कुठेही आंदोलन उभे केले नाही परंतु पुरवणी मागण्या व पूर्ण अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये या शासन निर्णयातील पदांना टप्पा वाढीसाठी अपेक्षित तरतूद या शासनाने न केल्याने राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला व त्यातूनच परवा राज्यातील बीड येथील धनजंय नागरगोजे सर यांनी गळफास लावून आत्महत्या केली तर आणखीन अन्य ४ बांधवांचा नैराश्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला हे झालेले मृत्यू नैसर्गिक नसून सदरील शिक्षकांची हत्या ही शासनाने केलेली आहे शासन एकीकडे मंत्रिमंडळात निर्णय घेऊन त्यांचा शासन निर्णय काढत असेल व त्यास निधी मंजूर करत नसेल तर हे बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे त्यामुळे राज्यातील तमाम ५२ हजार शिक्षकांची शुद्ध फसवणूक आहे अशी भावना आम्हा शिक्षक बांधवात निर्माण झाल्याने आता या राज्य सरकारवर कुठलाही विश्वास आमचा उरलेला नाही आमची मागणी ही अत्यंत जुनी २० वर्षापासून ची ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुजनांची असून या मागणीसाठी अत्यंत तोकडी रक्कम म्हणजे फक्त ८२६ कोटी रुपयांची असताना तसेच शेकडो आंदोलने,लाठीमार,तुरुंगवास ह्या शिक्षकांनी सोसलेला असताना शासन जर दिवसाढवळ्या बुद्धिजीवी शिक्षकांची अशी शुद्ध फसवणूक करत असेल तर आमच्या समोर आता जिवंतपणी मेल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय आम्हाला शिल्लक दिसत नसल्याने आम्ही दि. २५ मार्च २०२५ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालया आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण पोलीसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला खरा पण यापूढे जर वाढीव टप्पा अनुदान नाही मिळाल्यास पुन्हासामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा उपस्थित शिक्षकांनी दिला
यावेळी जिल्हयातील चारशेच्या व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा