मुदखेड तालुका युवासेना अध्यक्षपदी उत्तमराव खवास यांची निवड.

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनीधी

मुदखेड तालक्यातील धनज येथील माजी सरपंच,तथा  चेअरमन उत्तमराव आनंदराव खवास यांची एकनाथ शिंदे गटाच्या मुदखेड तालुका युवा सेनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

युवा सेना जिल्हा प्रमुख विकास देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.युवासेना कार्य अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या विनंती नुसार यांची निवड करण्यात आली आहे. 

याप्रसंगी तालुका अध्यक्ष संजय कुरे,अमोल माने,अमोल तुप्पेकर,सुनिल खवास,अश्विन राठोड,राजेश महाशेट्टे यांची यावेळी उपस्थिती होती.

प्रत्येक प्रशिक्षण कक्षात जिल्हाधिकारी यांनी जावुन घेतला प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव

नांदेड जिल्हा प्रतिनीधी

    लोकसभा पोट निवडणूक तथा ०८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज दि.२७ रोजी इतर मतदान अधिकारी यांचे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी प्रशिक्षण कक्षाच्यावतीने एकूण दहा कक्षात पिपिटीद्वारे मर्यादित गटास परिणामकारक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. 

याचा प्रत्यक्ष अनुभव अभिजीत राऊत, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी घेतला. प्रत्येक कक्षात जावून स्वतः प्रशिक्षणार्थी होवून राऊत यांनी प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्यामुळे इतर प्रशिक्षणार्थींचा उत्साह द्विगुणित झाला. प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनरला कांही शंका विचारुन शंकेचे समाधान करुन घेतले.

    यावेळी राऊत याच्यासह डॉ सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी, नांदेड दक्षिण, तहसीलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू,प्रशिक्षण टिममधील संजय भालके,मुख्याध्यापक सुनील दाचावार, प्रा.राजेश कुलकर्णी, हनुमंत राठोड, पेशकार राजकुमार कोटुरवार  यांची उपस्थिती होती.

नांदेड दक्षिण प्रथम निवडणुक प्रशिक्षण तयारी पूर्ण

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधि 

    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक तथा लोकसभा पोट निवडणूक २०२४ च्या नांदेड दक्षिण ०८७ प्रथम प्रशिक्षण आज दि.२६ रोजी नागार्जुना पब्लिक स्कूल,कौठा,नांदेड होणार आहे. या प्रशिक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे. सदरील तयारीचे अवलोकन करण्यासाठी डॉ सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी,०८७ नांदेड दक्षिण तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड , प्रविण पांडे,तहसीलदार, नांदेड, नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार निवडणूक विभाग,नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवाड व रविंद्र राठोड यांनी प्रत्यक्ष येवून पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. 

 प्रथम प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी असे दोन्ही एकूण  ८८४ जणांचे प्रशिक्षण होणार आहे. सदरील तयारी पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण टिमचे पेशकार राजकुमार कोटुरवार, रुस्तुम आडे, संजय भालके, राजेश कुलकर्णी,बालासाहेब कच्छवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

०८७ नांदेड दक्षिणच्या आढावा बैठकीस अनुपस्थितांवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु

 संपादक आशिष मुगटकर 

नांदेड प्रतिनीधी
----------------------------------
    विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोट निवडणूकीसाठी ०८७ नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ रोजी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक अनुषंगिक कामाचा आढावा घेतांना यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी गांभीर्य लक्षात न घेता अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. विशेषतः जी.एस.टी.विभाग,  बि.एल.ओ. तथा पर्यवेक्षक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने निदर्शनास आली. 

अशा सर्व अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील कलम  १३४ मध्ये असलेल्या तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु करण्याचे सक्त निर्देश डॉ खल्लाळ यांनी दिले. 

यामुळे अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बैठकीस तहसीलदार प्रविण पांडे , नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार हे उपस्थित होते.

अतुल कुलकर्णी यांची बालभारती गणित विषय पाठयपुस्तक समीक्षकपदी निवड

संपादक आशिष मुगटकर

कळमनुरी तालुका प्रतिनीधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेगाव, केंद्र जवळा पांचाळ, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील गणित व विज्ञान विषय शिक्षक अतुल कुलकर्णी यांची निवड बालभारती गणित विषय पाठयपुस्तक समीक्षकपदी झाली आहे. 

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ वर आधारित इयत्ता १ लीच्या गणित पाठयपुस्तक निंर्मितीचे काम बालभारती पाठयपुस्तक मंडळाने हाती घेतले आहे. या पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्याचे समीक्षण होणे अनिवार्य आहे. याकरिता अतुल कुलकर्णी यांची गणित पाठयपुस्तक समीक्षक म्हणून निवड झाली आहे. अतुल कुलकर्णी यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत डायट नांदेड येथे गणित विषय सहाय्यक म्हणून ५ वर्षे सेवा दिली आहे तसेच विविध राष्ट्रस्तरीय  आणि राज्यस्तरीय गणित कार्यशाळांमध्ये सुलभक म्हणून आणि विविध गणित प्रशिक्षण संच निर्मितीमध्ये कार्य केले आहे.

या निवडीसाठी विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

भाजपाचे सदभावना सामाजिक विशेष संपर्क अभियान सुरु, जिल्हा संयोजक पदी नेते प्रवीण गायकवाड

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड दि.१५ .भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्ह्याचे महामंत्री नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर सदभावना विशेष संपर्क अभियानाच्या जिल्हा संयोजक पदाचा अतिरिक्त भार प्रदेश भाजपाने सोपवीला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सद्या मराठवाड्यात सामाजिक वातावरण राजकीय दृष्ट्या दूषित झाले असून त्याचा फेक नरेंटिव्ह पसरून लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती, ही बाब लक्षात घेऊन सूक्ष्म मागास संघटन बांधणीच्या दृष्टीने भाजपाने आपला राजकीय मोर्चा वळवीला आहे,या अभियानात भाजपाचे प्रत्येक विधानसभा निहाय्य प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाच्या भेटी घेऊन पक्षाचे ध्येय धोरणे आणि समाज उपयोगी सरकारी योजणांची आठवण बुथ पातळी पर्यंत करून देणार आहेत.

अस्या महत्वपूर्ण अभियानाच्या नांदेड उत्तर जिल्ह्याची प्रमुख जबाबदारी भाजपातील अडीच दशकाचा प्रदीर्घ असा संघटनात्मक अनुभव असलेले नेते प्रवीण गायकवाड यांच्याकडे सोपविली आहे.

या अभियान प्रमुखांच्या संपूर्ण मराठवाड्याच्या निवडी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावणकुळे यांनी घोषित केल्या असून, नांदेड दक्षिण जिल्हा संयोजक पदी दिवंगत माजी आ.गंगारामजी ठक्करवाड, नांदेड महानगर जिल्हा अमोल कदम,छत्रपती संभाजी नगर उत्तर जिल्हा ज्ञानेश्वर मोटे,छ.सं.न.दक्षिण जिल्हा एल.जी. गायकवाड,महानगर जिल्हा जालिंदर शेंडगे,जालना ग्रा. देविदास  कुचे,महानगर शिवाजी जाधव,बिड जिल्हा सर्जेराव तांदळे,धाराशिव जिल्हा दीपक अलोरे,लातूर महानगर दिग्विजय काठवते,लातूर जिल्हा भारत चामे,परभणी ग्रा. शिवाजी मोहोळ, परभणी महानगर भीमराव वायवळ,हिंगोली जिल्हा खोब्राजी नरवडे यांच्यावर गोषित जबाबदारी देण्यात आल्याचे भाजपा प्रदेश सचिव बंजारा क्रांतिद लाचे संस्थापकीय अध्यक्ष देविदास राठोड यांनी कळविले आहे.

धन-धन मातासाहेब देवांजी यांच्या ३४३ व्या जन्मोत्सवाचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड तालुका प्रतिनिधी / सरदार गुलाबसिंग

 मुगट परिसरातील सतीयुगी तपस्थान धनधन माता साहेब देवांजी यांच्या नावाचा ऐतिहासिक गुरुद्वारा आहे. खालसा पंथाच्या पूजनीय माता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या ३४३ व्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्त सचखंड हुजुर साहिब नांदेड चे पूजनीय मानयोग जत्थेदार साहेब, समूह पंच प्यारे साहेब, सर्व निहंग सिंग, जत्थेबंदी, दलपंत, संत महापुरुष तसेच नानक नाम लेवा समूह यांच्या सहयोगातुन हा ३४३ वा जन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा करण्यात येत आहे. 

        माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालनार असुन दि‌ १४ पासून या जन्म सोहळ्याला सुरुवात होणार असून शेवट दि.१६ रोजी होणार आहे. दि.१४ रोजी या जन्मोत्सव सोहळ्याला सकाळी सुरवात होणार आहे. 

          श्री अखंड पाठ साहेबजी यांच्या वाचनाला सुरुवात होणार आहे. सकाळी ९ नंतर भजन, कीर्तन, साकी कथाकार, प्रवचनकार हे उपस्थित असणार असून दिवानसाब मध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि.१५ रोजी सकाळी ९ ते २ पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिवान साब मध्ये असणार आहे. दुपारी ३वा. घोडदौड, घोडा सवारी, कसरती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ रोजी श्री अखंड पाठ साहेबजीच्या समाप्तीनंतर उपस्थित उपसंत, संत महापुरुष दल पंथ, जत्थे बंदी यांचा सत्कार सोहळा होणार आहे. दुपार २ वा. श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या छत्रछायेखाली गुरुद्वारा माता साहेब देवाची इथून नगर कीर्तनाला सुरुवात होणार आहे. हे नगर कीर्तन गुरुद्वारा हिरा घाट साहेब मार्गे ब्राह्मणवाडा, गुरुद्वारा गुरुद्वारा माल टेकडी साहेब या मार्गे तक्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुव्दारा नांदेड या ठिकाणी जाऊन या नगर कीर्तनाची समाप्ती होणार आहे . 

    या धन धन माता साहेब देवाजी यांच्या धार्मिक जन्मोत्सव सोहळ्यामध्ये परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन माताजीचा आशीर्वाद घ्यावा. 

           असे आवाहन जत्थेदार बाबा तेजासिंग निहंग सिंगजी बुडादल (गुरुद्वारा माता साहेब देवाजी मुगट),संत बाबा बलविंदर सिंगजी (कार सेवा नांदेड), संत बाबा नरेदर सिंगजी (कार सेवा नांदेड) यांनी केली आहे.


शासकीय सेवेमध्ये रुजु झालेल्या विद्यार्थीचा सत्कार सोहळा संपन्न

संपादक आशिष मुगटकर

 मुदखेड तालुका प्रतिनीधी

 दि.६ रोजी मुदखेड शहरात प्रथमच शासकीय सेवेमध्ये रुजु झालेल्या विद्यार्थीचा  शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगरअध्यक्ष राज बाहादूर कोत्तावार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी गाढे, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, शहर अध्यक्ष कैलाश गोडसे, मुजीब पठान, सुर्यकांत चौदंते, राजु चौंदते गजानंन संभोड,शिवाजी बिस्मीले, मारोती कमजळे, गिरीष कोत्तावार माजी सैनिक राजाराम हळदे,प्रभु घोंगडे.मारोती गुंठे ,चंद्रकांत तेलंगे ,साईनाथ राठोड.(सर्व माजी सैनिक ) सुरजी बिस्मीले,उपेंद्र देवदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

 त्यांच्या कुटूंबामधील जेष्ठ, आई,वडील व इतर स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेले तरुन मंडळी व सत्कार मुर्ती पिंटू गुंठे, निलेश बिस्मीले, शिवगंगा बिस्मीले व इतर बावीस विद्यार्थी जे नव्याने शासकीय सेवेमध्ये रुजु झाले त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याचे आयोजन  देवदे परीवार यांच्या वतीने  शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे करण्यात आले होते.



प्रा. रवींद्र चव्हाण यांनी मुगट येथील ग्रामस्थांशी साधला संवाद

 संपादक आशिष मुगटकर

मुगट येथिल ग्रामस्थांशी संवाद साधताना लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण सोबत पप्पू पाटील कोंडेकर व सहकारी.

मुगट वार्ताहर

               दि.२ रोजी मुदखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी मुगट येथील ग्रामस्थांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला विविध विषयांवर चर्चा केली.

नांदेड लोकसभेची पोट निवडणूक ही येणाऱ्या पुढील महिन्यात होणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांचे नाव जाहीर झाल आहे. 

                  दिवाळीनंतर लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका एकदाच घेण्याच्या तयारीत निवडणूक आयोग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड येथील लोकसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत.         यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता. लोकसभा मतदारसंघातील अनेक गावाला भेट देऊन पुन्हा एकदा मतदाराशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे काम ते करत आहेत.

 महाविकास आघाडी कडून येणाऱ्या काळातील निवडणुकीना समोर जाण्यासाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे. 

    मुदखेड दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील महत्त्वाचे मुगट या गावास भेट दिली व गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला व विविध विषयांवर चर्चा केली.

                 यावेळी पप्पू पाटील कोंडेकर, सुमित पाटील, नितीन पाटील, सरदार बलविंदरसिंग, बालाजी पाटील कल्याणे,(मा.सरपंच) साईनाथ पाटील कल्याणे,(मा.तंटामुक्ती अध्यक्ष) दादा पाटील कल्याणे,(ता. उपाध्यक्ष कांग्रेस कमिटी मुदखेड) वसंतराव कल्याणे,विलास कल्याणे, गोपीनाथराव मुंगल,(मा.संरपंच) माधवराव कल्याणे,(मा.चेअरमण) आशिष मुगटकर ( पत्रकार) गोविंदराव मुंगल(मा.पोलीस पाटील),रामराव मुंगल,हिरामण मुंगल, श्रीकांत मुंगल, शंकर मुंगल, प्रल्हाद कल्याणे, अनिल कल्याणे, शिवाजी गजले उपस्थिती होती.

लोकप्रिय बातम्या