धन-धन मातासाहेब देवांजी यांच्या ३४३ व्या जन्मोत्सवाचे आयोजन.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड तालुका प्रतिनिधी / सरदार गुलाबसिंग

 मुगट परिसरातील सतीयुगी तपस्थान धनधन माता साहेब देवांजी यांच्या नावाचा ऐतिहासिक गुरुद्वारा आहे. खालसा पंथाच्या पूजनीय माता म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या ३४३ व्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तक्त सचखंड हुजुर साहिब नांदेड चे पूजनीय मानयोग जत्थेदार साहेब, समूह पंच प्यारे साहेब, सर्व निहंग सिंग, जत्थेबंदी, दलपंत, संत महापुरुष तसेच नानक नाम लेवा समूह यांच्या सहयोगातुन हा ३४३ वा जन्मोत्सव सोहळा उत्सहात साजरा करण्यात येत आहे. 

        माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालनार असुन दि‌ १४ पासून या जन्म सोहळ्याला सुरुवात होणार असून शेवट दि.१६ रोजी होणार आहे. दि.१४ रोजी या जन्मोत्सव सोहळ्याला सकाळी सुरवात होणार आहे. 

          श्री अखंड पाठ साहेबजी यांच्या वाचनाला सुरुवात होणार आहे. सकाळी ९ नंतर भजन, कीर्तन, साकी कथाकार, प्रवचनकार हे उपस्थित असणार असून दिवानसाब मध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि.१५ रोजी सकाळी ९ ते २ पर्यंत धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दिवान साब मध्ये असणार आहे. दुपारी ३वा. घोडदौड, घोडा सवारी, कसरती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.१६ रोजी श्री अखंड पाठ साहेबजीच्या समाप्तीनंतर उपस्थित उपसंत, संत महापुरुष दल पंथ, जत्थे बंदी यांचा सत्कार सोहळा होणार आहे. दुपार २ वा. श्री गुरु ग्रंथ साहेबजी महाराज यांच्या छत्रछायेखाली गुरुद्वारा माता साहेब देवाची इथून नगर कीर्तनाला सुरुवात होणार आहे. हे नगर कीर्तन गुरुद्वारा हिरा घाट साहेब मार्गे ब्राह्मणवाडा, गुरुद्वारा गुरुद्वारा माल टेकडी साहेब या मार्गे तक्त सचखंड श्री हुजूर साहेब गुरुव्दारा नांदेड या ठिकाणी जाऊन या नगर कीर्तनाची समाप्ती होणार आहे . 

    या धन धन माता साहेब देवाजी यांच्या धार्मिक जन्मोत्सव सोहळ्यामध्ये परिसरातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन माताजीचा आशीर्वाद घ्यावा. 

           असे आवाहन जत्थेदार बाबा तेजासिंग निहंग सिंगजी बुडादल (गुरुद्वारा माता साहेब देवाजी मुगट),संत बाबा बलविंदर सिंगजी (कार सेवा नांदेड), संत बाबा नरेदर सिंगजी (कार सेवा नांदेड) यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या