दि.६ रोजी मुदखेड शहरात प्रथमच शासकीय सेवेमध्ये रुजु झालेल्या विद्यार्थीचा शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण देवदे यांच्या वतीने जाहीर सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगरअध्यक्ष राज बाहादूर कोत्तावार, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष बालाजी गाढे, तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख, शहर अध्यक्ष कैलाश गोडसे, मुजीब पठान, सुर्यकांत चौदंते, राजु चौंदते गजानंन संभोड,शिवाजी बिस्मीले, मारोती कमजळे, गिरीष कोत्तावार माजी सैनिक राजाराम हळदे,प्रभु घोंगडे.मारोती गुंठे ,चंद्रकांत तेलंगे ,साईनाथ राठोड.(सर्व माजी सैनिक ) सुरजी बिस्मीले,उपेंद्र देवदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
त्यांच्या कुटूंबामधील जेष्ठ, आई,वडील व इतर स्पर्धा परीक्षाची तयारी करत असलेले तरुन मंडळी व सत्कार मुर्ती पिंटू गुंठे, निलेश बिस्मीले, शिवगंगा बिस्मीले व इतर बावीस विद्यार्थी जे नव्याने शासकीय सेवेमध्ये रुजु झाले त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याचे आयोजन देवदे परीवार यांच्या वतीने शारदा पेट्रोल पंप मुदखेड येथे करण्यात आले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा