मुगट वार्ताहर
दि.२ रोजी मुदखेड तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी मुगट येथील ग्रामस्थांशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला विविध विषयांवर चर्चा केली.
नांदेड लोकसभेची पोट निवडणूक ही येणाऱ्या पुढील महिन्यात होणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांचे नाव जाहीर झाल आहे.
दिवाळीनंतर लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुका एकदाच घेण्याच्या तयारीत निवडणूक आयोग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे नांदेड येथील लोकसभेची पोटनिवडणूक लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला होता. लोकसभा मतदारसंघातील अनेक गावाला भेट देऊन पुन्हा एकदा मतदाराशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे काम ते करत आहेत.
महाविकास आघाडी कडून येणाऱ्या काळातील निवडणुकीना समोर जाण्यासाठी मोर्चे बांधणी करायला सुरुवात झाली आहे.
मुदखेड दौऱ्यावर असताना त्यांनी तालुक्यातील महत्त्वाचे मुगट या गावास भेट दिली व गावातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला व विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी पप्पू पाटील कोंडेकर, सुमित पाटील, नितीन पाटील, सरदार बलविंदरसिंग, बालाजी पाटील कल्याणे,(मा.सरपंच) साईनाथ पाटील कल्याणे,(मा.तंटामुक्ती अध्यक्ष) दादा पाटील कल्याणे,(ता. उपाध्यक्ष कांग्रेस कमिटी मुदखेड) वसंतराव कल्याणे,विलास कल्याणे, गोपीनाथराव मुंगल,(मा.संरपंच) माधवराव कल्याणे,(मा.चेअरमण) आशिष मुगटकर ( पत्रकार) गोविंदराव मुंगल(मा.पोलीस पाटील),रामराव मुंगल,हिरामण मुंगल, श्रीकांत मुंगल, शंकर मुंगल, प्रल्हाद कल्याणे, अनिल कल्याणे, शिवाजी गजले उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा