अखेर नगरपरिषदेच्या लेखी पत्रा नंतर शेतकऱ्याचे आमरण उपोषण आंदोलन मागे

शेतकऱ्यांला पाजले नगरअध्यक्षाने नारळ पाणी

उपोषण मागे:- जागा मावेजा मिळण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन नगर अध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी शेतकरी एडके यांना नारळपाणी पाजवून उपोषण मागे घेण्यात आले .


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

अखेर मुदखेड नगरपरिषदेने नगररचना नांदेड विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्या सुचनेनुसार जागामावेजा साठी शासनाकडे पाठपुरावा करु यासाठी  शिवाजी रामा ऐडके यांना लेखी पत्र दिले त्या नंतर दोन दिवसीय चाललेले आमरण उपोषण मागे घेतले यावेळी पत्रात उपरोक्त पत्रान्वये वरिल पाठवलेला अभिप्राय मिळताच  न.प.मुदखेड मार्फत शेतक-याच्या मागणीनुसर शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. आशी हामी न.प.चे सि.ओ. रामराजे कापरे यांनी लेखी पत्र देवुन शेतक-याला दिली आहे. जागामावेजा मिळण्यासाठी सुरु असलेले आमरण उपोषण आंदोलन नगर अध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार यांनी शेतकरी एडके यांना नारळपाणी पाजवून उपोषण मागे घेण्यात आले आहे.

यावेळी भाजप दीव्यांग मराठवाडा अध्यक्ष प्रविण गायकवाड, भाजपा विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर यांनी सी.ओ.रामराजे कापरे याच्यांशी चर्चा करुन याप्रकरणी लक्ष घालून शेतक-याला जागा  मावेजा मिळण्यासाठी चा प्रस्ताव नगरपरिषदेने लवकर पाटवून शाषनस्तरावरुन पाठपुरावा करुन मावेजा लवकरात लवकर मिळवुन दयावा याबाबत मध्यस्थी करत लेखी पत्र घेऊन शेतक-याचे उपोषण सोडवले आहे.

यावेळी नगरअध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, काँग्रेस शहर अध्यक्ष माधव पाटिल कदम, दीव्यांग मराठवाडा अध्यक्ष प्रविण गायकवाड, भोकर विधानसभा अध्यक्ष निलेश देशमुख बारडकर, भाजप ता.अध्यक्ष शंकर मुतकलवार, पप्पु सोनटक्के सी.ओ.रामराजे कापरे,नगरसेवक करिमखाँन साब,सलाम सर,गोविंद गोपनपल्ले, मुन्ना चांडक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दिवशी येथील बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी द्या

शिवसेना कार्यकर्ते बारड सर्कल कडून पोलीस निरीक्षक बारड  यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी.


बारड/प्रतिनिधी

बारड : दिवशी बु.ता.भोकर येथील आदिवासी मन्नेरवारलु समाजातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार खून करणाऱ्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्या. या मागणीचे निवेदन शिवसेना कार्यकर्ते सर्कल प्रमुख विजय देशमुख यांनी बारड पोलीस ठाण्याचे  प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.नांदगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे 

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महाभयंकर घटनेचा निषेध युवा संघटना,विविध पक्ष कार्यकर्त्यांन कडून निषेध नोंदवण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख विजय देशमुख, ग्रा पं सदस्य प्रतिनिधी शरद कवळे ,युवा कार्यकर्ते सचिन बने, पवन टिप्परसे, दिनेश गुंडे, मनसे सर्कल प्रमुख रूपेश वाघमारे, योगेश सुर्यवंशी, माधव बने,गजानन देशमुख, संभाजी पानबुडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

मुदखेड महाराष्ट्र कामगार केंद्रात जेष्ठ नागरिक शंकरराव पिन्नलवार यांच्या हस्ते ध्वजारोहण

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड /शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

मुदखेड शहरातील महादेव गल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र याठिकाणी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला असून ज्येष्ठ नागरिक शंकराव पिन्नलवार यांच्या हस्ते सकाळी ७:४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले आहे.

येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात महिलांसाठी शिवण क्लासेस तसेच लहान मुलांची बालवाडी  कामगार कल्याण केंद्र चे उपसंचालिका सौ. संध्या आडगावकर , केंद्राचे संचालक व्ही बी मेडके, लहान मुलाची शिक्षिका अरुणा महिनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र चालत आहे.

कोरोना चे नियम पाळत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी जेष्ठ नागरिक शंकरराव पिन्नलवार, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे आनिरुद्र स्वामी, बालवाडी  कामगार कल्याण केंद्र चे उपसंचालिका सौ. संध्या आडगावकर , केंद्राचे संचालक व्ही. बी. मेडके,  शिक्षिका अरुणा महिनाळे, कर्मचारी एम. एस. राजभोज यांच्यासह आदी उपस्थित होते.

मुदखेड शहरातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा

            संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

मुदखेड शहरातील मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेच्या क्वार्टर गार्डला आज अभिवादनानंतर  २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ध्वजारोहण, केंद्रीय प्रशिक्षण संस्थेचे कमांडंट लीलाधर महरणीया  शुभेच्छा दिल्या, राज्यघटनेचे महत्त्व सर्वांना माहिती करून दिली आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशात सर्व अधिक पदके देऊन सन्मानित केल्याची माहिती दिली

केंद्रीय प्रशिक्षण दलाला सर्वाधिक पदके देण्यात आली ज्यात कीर्ती चक्र ०४, पीपीएमजी ०१, पीएमजी ६८ अशी मेडल सरकार ने दिली  अशी पुरस्कृत माहिती दिली.


पुढे म्हणत, देशातील विविध राज्यांत तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि प्रजासत्ताक दिनी कीर्ती चक्र, पीपीएमजी, पीएमजी पदके प्रदान केलेल्या केंद्रीय अर्धसैनिक दलातील शूर अधिकारी आणि जवानांची नावे वाचून दाखविली

यासह, प्रशिक्षण संबंधित उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०१९-२०२० या वर्षात या संस्थेत तैनात असलेले कमांडंट बी वीर राजू, उप-कमांडंट कपिल बेनीवाल आणि उपनिरीक्षक जीडी नरखेडे दत्तात्रय यांना गृहमंत्री उत्कृष्ट प्रशिक्षण पदके प्रदान करण्यात आली असल्याची माहिती आणि शुभेच्छा दिल्या व पदक मिळवल्या बदल अभिनंदन केले

वरील कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, इतर सैनिक व प्रशिक्षणार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आल्या.

काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार यांच्या पॅनलने मारली बाजी१३ पैकी १२ उमेदवार विजयी

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीख अहेमद

मुदखेड तालुक्यातील निवघा ग्रामपंचायत कडे  तालुक्याचे लक्ष लागून होते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे निष्ठावंत कार्यकर्ते उध्दवराव पवार असल्याने निवघा ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरली होती  उत्कृष्ट कार्याच्या जोरावर तालुकाध्यक्ष  उद्धवराव पवार निवघेकर यांच्या नेतृत्वाखाली  लढविण्यात आलेल्या  निवघा ग्रामपंचायत निवडणूकीत जय हनुमान ग्रामविकास पॕनल,ने बाजी मारली असून १३पैकी १२,जागेवर बहूमत मिळवून निवघा ग्रामपंचायत निवडणूकीत  विजयी मिळवला आहे.

निवघा येथे जय हनुमान ग्रामविकास पँनल विरुध्द जय हनुमान लोकशाही बचाव पॅनला पराभव झाला आहे.  काँग्रेसचे मुदखेड तालुका अध्यक्ष उद्धव पवार निवेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली काँग्रेस गटाच्या पँनल ने घवघवीत यश संपादन केले आहे त्यामध्ये विजयी उमेदवार वार्ड क्र१)एडके मनिषा संभाजी ३००,पवार लक्ष्मीबाई उध्दवराव  २९१,वार्ड क्र.२)पवार रंगराव किशनराव  २१२,पांचाळ देविदास रामजी २२६,वार्ड क्र. ३)कांचनगिरे देविदास माणिकराव ३४२,थोरात गोदावरी दत्ता  ३२५,वार्ड क्र.४)वाघमारे सुनिल यादव  ३८२,आऊलवाड गुणाजी देवबा ३५३,पवार उज्जवलाबाई व्यंकटराव ३०२,एकूण तेरा पैकी बारा उमेदवार विजयी झाले तर वार्ड क्र.३ मधील पराभूत उमेदवार पोफळे आशाताई शंकर यांना ३०९ मते मिळाली आहेत.यावेळी विजयी गटाने बहुमत मिळाल्याने विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांनी हक्काची पगार मिळण्यासाठी २९ जानेवारीला आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन

  आझाद मैदानावरील राज्यव्यापी आंदोलनात सहभागी व्हावे. प्रा.कैलाश द.खानसोळे

नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील गेली वीस वर्षांपासून होत असलेली पुरोगामी महाराष्ट्रातील विना अनुदानित हेळसांड थांबवा. दि १३ सप्टेंबर२०१९ नुसार घोषित अनुदान मंजूर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कॉलेजचा २०%व टप्पा वाढ शाळांचा ४०%चा निधी वितरणाचा आदेश मा मंत्री महोदयांनी सभागृहात वारंवार अश्वासित केल्यानुसार याच महिन्यात तात्काळ पगार वितरणाचा आदेश काढून पगार सुरू करावे.

 मागील वर्षी दि २४फेब्रुवारी२०रोजी ला आर्थिक अधिवेशनात मा. अर्थमंत्री महोदयांनी पुरवणी मंजूर केली, तद्नंतर कोविडमुळे निधी वितरण केले नाही.बाकी कुणाचेच महाराष्ट्रात वेतन रोखले नाही पण आमचे मंजूर वेतन रोखून ठेवले.त्रुटी समिती नेमली, त्यानंतर १४/१०/२०च्या कॅबिनेटने १नोव्हेंबर२०२० पासून अनुदान देऊ केले त्यानुसार तपासून घोषित केलेले शाळा,कॉलेज पुन्हा तपासणी लावून आपण बरोबर एक वर्ष बीनपगारी शिक्षकांना झुलवत ठेवल,आधीच सर्व शाळा कॉलेज ह्या तपासून घोषित झालेल्या आहेत, व त्याच अनुदान सभागृहात मंजूर आहे,तथा २०%वेतन  घेत असलेल्या शाळा पण चालू आहेत व त्यांचं पण ४०%अनुदान मंजूर आहे तसा जीआर मध्ये निधीचे टोकण अर्थ विभागाकडून टाकलेलं असतांना..


कुठल्याही शाळा कॉलेजवर अन्याय होऊ न देता तात्काळ निधी वितरणाचा आदेश काढण्यासाठी तथा अघोषित शाळा कॉलेज निधीसह घोषित करण्यासाठी वरील मागण्यांसंदर्भात शासनाकडून गेली एक वर्षापासून आश्वासन व दिरंगाई शिवाय काहीच मिळत नसल्याने, विना अनुदानित शिक्षक हवालदिल झाला असून लोकडाऊन मध्ये २७ शिक्षक हृदयविकाराने व आत्महत्या करून मरण पावले आहेत तरी या निर्दयी शासनाने न्याय दिला नाही नुसतं अर्थखात शिक्षण खात्याकडे व शिक्षक खात अर्थखात्याकडे बोट दाखवून वेळ मारून नेण्याचे काम करत आहे यासाठी नाईलाजास्तव कंटाळून पूर्ण महाराष्ट्रातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शिक्षक दि २७ जानेवारी पासून शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आझाद मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन, आमरण उपोषण करीत आहोत व न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाहीत यासाठी नांदेड जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक घोषित, अघोषित व अंशतः अनुदानित शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित राहून झोपीचं सोंग करनाऱ्या शासनाला जबाब मागन्यासाठी शाळा बंद करून आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन लातुर विभागीय कार्याध्यक्ष प्रा कैलास खानसोळे यांनी केले

स्वामी विवेकानंद शिक्षण प्रासारक मंडळ,बारड येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा

संपादक आशिष मुगटकर

 मुदखेड तालुका प्रतिनिधी

       मुुुदखेड ताालुक्यातील बारड  येथील    स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व स्वा.से.राजाराम बापू माध्य.शाळा बारड यांच्या वतीने २६ जानेवारी ७२ वा भारतीय गणतंत्र दिवस कोविड नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य,हेमंत इंगळे व प्रमुख पाहुणे मु. अ. रामकिशन चुब्बेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख, उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन , सचिव रामेश्वर कोरबनवाड , संचालिका सौ.छायाताई संजयराव देशमुख यांच्या सह सर्व संचालक मंडळ, गावातील ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्याल यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आकांशा मुदखेड व सानिका दाडे यांनी केले तर आभार प्रा. एन. एल.सावंत यांनी व्यक्त केले.



गावातील गुणवंत विद्यार्थीनीच्या हस्ते ग्रामपंचायतचे ध्वजारोहण

 बारड ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम 

ध्वजारोहण:- गुणवंत विद्यार्थीनी कु.स्वेता देशमुख ग्रामपंचायत कार्यालय बारड येथे ध्वजारोहण करताना.

नांदेड विशेष प्रतिनिधी/ मनोज कमटे

मुदखेड तालुक्यातील बारड येथे अभिनव उपक्रम घेतले जातात, २६   जानेवारी रोजी  माध्यमिक शालांत बोर्ड परीक्षा  प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण  झालेली कु. स्वेता सुरेशराव देशमुख या गुणवंत विद्यार्थ्यांनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. सरपंच निवड झाली नाही . प्रशासक कैलास गायकवाड व ग्राम विकास अधिकारी अनुप श्रीवास्तव  यांनी स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण न करता गावातील इयत्ता दहावीला सर्वाधिक गुण घेऊन उत्तीर्ण  विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान दिला. 

या दिवशी  प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विविध विकास  कामाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळेस जिल्हापरिषद हायस्कुल शाळेमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम वाचनालयाचे उदघाटन उपसरपंच  बाळासाहेब देशमुख बारडकर व  राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वाकडे गुरूजी  यांच्या हस्ते करण्यात.

 जिल्हा परिषद कन्या शाळा येथील विद्यार्थीसाठी  जलशुद्धीकरण यंत्राची सुरूसुरूवात   जेष्ठ नागरिक पंडितराव देशमुख, मझहर शेख, दौलत शेख यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद कन्या शाळा येथील खोली  बांधकामचे उदघाटन  सदस्य प्रभाकर आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील मुलांना क्रिकेट नेट प्रॅक्टिस करिता क्रिकेट पिच तयार करण्यात आले याचे देखील उदघाटन करण्यात आले.

 या वेळेस विलासराव देशमुख, माणिकराव लोमटे, दिगंबर टिपरसे, कैलास फुलकुंठवार, किशन देशमुख,अवधूत सिरगिरे, प्रदीप देशमुख, प्रभाकर भीमेवार, मोहन सुर्यलाड, गजानन कत्रे, शरद कवळे, शिवाजी बुरुडे, वसंत लालमे, जेष्ठ नागरिक रघुनाथराव देशमुख, शिवाजीराव देशमुख, किशोर देशमुख, शामराव देशमुख, यशवंत पवार, बाबुराव लोमटे, संदीप पानबुडे  तलाठी अंजली बार्शीकर  आदींची उपस्थिती होती.

बारड-भोकर राष्ट्रीय महामार्गावरील नाली कामाचे पितळ उघडे

    दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीला मोठे भगदाड कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी          

  संपादक आशिष मुगटकर 

नालीचे काम निकृष्ट :- बारड येथे होत असलेल्या नाली बांधकामला दोनच दिवसात भगदाड पडलेले पाहताना बारडचे गावकरी.

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीख अहेमद

बारड-भोकर राष्ट्रीय महामार्ग वरील नाली बांधकामाचे पितळ उघडे पडले असून बारड बस स्टँड परिसरात असलेल्या मुख्य मार्केट समोरील दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नाली काम निकृष्ट झाल्याने नाली वरील स्लँपला मोठे भगदाड पडल्याने काम मोठ्या प्रमाणात निकृष्ट केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत निकृष्ट कामाची पाहणी करून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यातील दोषी अधिकारी व कंट्रक्शन वर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे

गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग वरील कामे संथ गतीने सुरू असून अत्यंत निकृष्ट पणे कामे होत आहेत बारड परिसरात रस्त्यावरील दोन किलोमीटरचे नाली कामे सुरू असून नाली कामावर अल्प गजाळी सिमेंटचा वापर कमी करून पाण्याची क्युरिंग न करता बोगस पणे नाली काम सुरू असल्याने या कामावर लगेच तडे पडत असल्याचे दिसून येत आहे तर रंगीत अधिकाऱ्याला  पाठीशी घेत  या निकृष्ट कामाची बिले पण लगेच सादर करण्यात येत असल्याचे समजले आहे.

तर चक्क बस स्थानक परिसरातील बाजार पेठेत दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीवरिल स्लँपला मोठे भगदाड पडल्याने कामावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी अरुंद रस्ता तसेच निकृष्ट होणाऱ्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन याबाबत तक्रार व्यक्त केली होती त्यांच्या सुचनेनुसार त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला भेट देऊन काम दर्जेदार तसेच ग्रामस्थाच्या म्हणण्यानुसार करणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु संबंधित अधिकारी आणि कंट्रक्शन यामध्ये साटेलोटे असल्याचे बोलले जात असून निकृष्ट कामाकडे काना डोळा करण्यात येत असून पुढे पाठ मागे सपाट म्हणण्याची वेळ राष्ट्रीय महामार्गावरिल होणाऱ्या नाली कामाबाबत म्हणण्याची वेळ आली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाबाबत काँग्रेस जिल्हा कर सल्लागार उत्तमराव लोमटे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग आठवले,यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केलेल्या निकृष्ठ कामाची तक्रार केली असुन कोटी रुपये खर्च करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील कामावर शासनाच्या तिजोरीतील कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत परंतु या ठिकाणी बोगस रित्या काम करून अक्षरशा शासनाच्या दर्जेदार कामाला शह देत कोटी रुपयांची कामे बोगस रित्या होत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या बोगस कामाची चौकशी करून संबंधित कंट्रक्शन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. निकृष्ट होत असलेल्या कामाबाबत तसेच बोगस रित्या सुरु असलेल्या कामावर संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

मुगट येथे हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती साजरी

  जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला मुगट सर्कल पासून सुरुवात.



मुगट/वार्ताहार

 मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि‌. २३रोजी हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या९५व्या जयंती निमित्य भोकर विधानसभेतील मुदखेड तालुक्यातील  मुगट सर्कल  पासून शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला  सुरुवात करण्यात आली आहे.

मुगट येथील मुख्य रस्त्यावर गावातील युवा सेना व शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती बरोबरच शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुद्धा सुरुवात करण्यात आली.

 या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पा.तिडके बोंढारकर, भोकर विधानसभा शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, सिताराम महाराज, मोतीगीर महाराज यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.


यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी जमलेल्या युवा सैनिकांना मार्गदर्शन केले.शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पा. तिडके व नेते बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला या वेळी सुरुवात करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला मुगट व परिसरातून आलेल्या युवा शिवसेनी का कडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून सायंकाळ पर्यंत 1000 च्या वर शिवसेना सभासद नोंदणी या ठिकाणी झाली असे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना भोकर विधानसभा प्रमुख विश्वंभर पाटील पवार निवघेकर, मुदखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे, मा.तालुका प्रमुख माणिक लोमटे, मुदखेड पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर, मुदखेड शहर प्रमुख सचिन माने- सचिन चंद्रे माजी शहरप्रमुख अविनाश झमगडे, संजय पा. गाडे, भीमराव पा. कल्याणे, माधवराव पा. कल्याणे, धाराजी पा. पवार , दादा पाटील, रामजी पा.कल्याणे,उप तालुका प्रमुख , गोविंदराव शिंदे, गुलाबराव देशमुख, आनंदराव देवापूरकर, उत्तम खवास, बालाजी पा. शिंदे, शिवसेना शाखाप्रमुख मंचीकराव पा.कल्याणे, शिवसेना तालुका संघटक विलास पा. कल्याणे, रमेश पा.कल्याणे, गणपतराव पा. कल्याणे, शामराव पा.कल्याणे, प्रशांत पा. कल्याणे, विकास पा. कल्याणे, एकनाथ पा.कल्याणे, सतीश पा. कल्याणे, राम पा.कल्याणे, मयुर पा. कल्याणे, शिवानंद कल्याणे,माधव पा. कल्याणे,शुभम,पा.कल्याणे, तुकाराम हाटकर, धनंजय जोशी, ज्ञानेश्वर गजेले, तसेच अनेक गावातील व परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 संपादक आशिष मुगटकर

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

 मुदखेड येथील स्व.बाळासाहेब.ठाकरे चौक नांदेड रोड मुदखेड  येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते स्व.बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुदखेड तालुक्यातील अनेक शिवसेनीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 भोकर विधान सभा शिवसेना नेते बाळासाहेब_देशमुख_बारडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी ता.प्रमुख संजय पा.कुरे,शिवसेना शहरप्रमुख सचिन चंद्रे,शिवसेना शहरप्रमुख सचिन पा. माने,विश्वंभर पा.पवार,सुधाकर सूर्यवंशी,सुरेश शेटे,साहेबराव चव्हाण,लक्ष्मणराव देवदे,प्रवीण गायकवाड,माधव कदम,कैलास गोडसे, संजय आऊलवार, मुन्ना चांडक,गोविंद गोपणपल्ले, उप ता.प्रमुख,उत्तम पा.खवास,गुलाबराव देशमुख,आनंदराव जाधव,गोविंद शिंदे,परिक्षीत मुंगल,संजय सोनटक्के,शंकर सेठ राठी,संदीप पा.गाढे,संजू पा.गाढे, नितीन गोडसे,माणिक लोमटे,गजानन कत्रे,दिपक पाटील, अविनाश झमकडे, विजय होळकर,गंगाधर मगरे,रमेश बोडके,बालाजी शिंदे,व्यंकटी धडे,संतोष बोडके,अभिजित नातेवाड,शुभम बोडके,गजानन कमले,गिरीश कोत्तावार, सोनू आरेपल्लु,प्रकाश सूर्यवंशी,रामेश्वर लोकरे,शिवा तरोडेकर,प्रकाश बल्फेवाड, नीळकंठ पडोळे,बालाजी बिंनगे यांची यावेळी उपस्थिती होती.

नांदेड विद्यापिठाच्या समोर नसोसवायफ उद्यापासून बेमुदत अमरण उपोषण

पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी बेमुदत अमरण उपोषण





नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी

नांदेड नॅशनल एससी एसटी ओबीसी स्टुडन्ट अँड युथ फ्रंट मागील अनेक दिवसापासून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मधील संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा वाढवण्याची मागणी विद्यापीठाच्या कुलगुरू यांच्या कडे अनेक दिवसापासून करत आहे पण विद्यापीठ प्रशासन व कुलगुरू या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने दि.२३जानेवारी पासून विद्यापीठाच्या गेटसमोर नसोसवायएफ बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली जानार आहे.

शैक्षणिक वर्ष २०१९-२०कोव्हिड -१९च्या लॉकडाऊनमध्ये गेले आहे. पण या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी मोठ्या पदवीउत्तीर्ण झाले आहेत.दरवर्षीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्या प्रमाणापेक्षा पदवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे. तसेच या प्रमाणापेक्षा पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा खूपच कमी आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे राज्यातील नांदेड,परभणी,हिंगोली ,लातूर या दुष्काळी व अविकसित जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी स्थापित केले होते.

या चारही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची पहिलीच आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यात कोविड-१९च्या लोकडाऊनमध्ये हि परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.अशा वेळी हे विद्यार्थी राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी अर्ज करू शकत नाहीत आणि विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व संकुलामध्ये पदवीत्तरअभ्यासक्रमाच्या जागा या अतिशय अल्प असल्याने त्यांना प्रवेश मिळू शकत नाही. संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडे विद्यार्थी व पालक हे जागा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती होत आहे या संदर्भात नसोसवायएफच्या शिष्टमंडळाने  विद्यापीठाच्या  कुलगुरू माननीय डॉ.उद्धव भोसले यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे चर्चा केली पण कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा.कुलगुरु ना मा.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या सोबत संवाद करून  विद्यापीठातील विद्यार्थ्यांची परिस्थिती अवगत करून  देण्या संदर्भात विंनती केली होती .पण माननीय कुलगुरूंनी या सूचने कडे हि  दुर्लक्ष केले आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे.पण हाच विद्यार्थी आज उच्य शिक्षणापासून वंचित राहत आहे. जागा वाढवण्याच्या संदर्भातील निर्णयातून विद्यापीठाचे व राज्य सरकारचे कुठलेही आर्थिक नुकसान होणार नाही .उलट विद्यापीठाला यातून आर्थिक मदतच होईल.तसेच विद्यापीठाचा उद्देश सफल होईल .पण या सगळ्या बाबीकडे   कुलगुरू डॉ.उद्धव भोसले नियमावर बोट ठेऊन  दुर्लक्ष करत आहेत. पण ऐरवी महाराष्ट्रात विद्यापीठ कायद्याचे नियम  धाब्यावर ठेवून निर्णय घेतले आहेत.हे विसरता कामा नये, या आधी नियमांचे उल्लंघन करून माननीय कुलगुरुनी पदवीत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढवल्या  होत्या.मागील दोन वर्षापासून २०टक्के पेक्षा अधिक जागा कुठलेही विद्यार्थी संघटनेची मागणी नसताना कुलगुरूंनी वाढवली आहे.

 मग याच शैक्षणिक वर्षात या नियमावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून का वंचित ठेवले जात आहे असा सवाल संघटनेचा कुलगुरूंना आहे.दिनांक २३ तारखेपासून विद्यापीठ गेट समोर सुरू होणाऱ्या आमरण उपोषणाचे नेतृत्व संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.डी. हर्षवर्धन हे स्वतः  करणार आहेत.जोपर्यंत जागा वाढणार नाहीत  तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील. या शैक्षणिक वर्षात मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना  न्याय देण्यासाठी नसोसवायफ सक्रिय आहे .तसेच संघटनेकडून  प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्यार्थी व  पालकांना  आवाहन करण्यात येते की ,मोठ्या संख्येने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २३जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाच्या गेटसमोर उपस्थित रहावे. 

अशी माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते प्रा.सतीश वागरे व जिल्हा प्रवक्ता संशोधक विद्यार्थी मनोहर सोनकांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

मुगट येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेची सांगता

 संपादक आशिष मुगटकर


मुगट वार्ताहार

मुगट येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत आत्माराम महाराज बोधी मठाच्या समोर संत मारुती महाराज दस्तापुरकर यांच्या कृपाशीर्वादाने व मठाधिपती सिताराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवताचार्य वैराग्यमूर्ती वैजनाथ महाराज कागदे यांच्या  वाणीतून भागवत कथा सांगण्यात आली तर ब्रह्ममूर्ती विजयानंद सुपेकर महाराज यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.

दि. १३ पासून या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण १० ते १२ गाथा, भजन दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.


 या हरि कीर्तनासाठी यावेळी हरिभक्त पारायण ह.भ.प बालाजी महाराज,ह.भ.प विलास महाराज,ह.भ.प संतोष पुरी महाराज, प.पू प्रभाकर बाबा,ह.भ.प काशिनाथ महाराज, ह.भ.प दशरथ महाराज, ह.भ.प मधुकर महाराज, ह.भ.प चंद्रकांत महाराज, ह.भ.प काळबा महाराज यांची कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १९ रोजी गावात या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वाजत गाजत पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. गावातील हरिनामाच्या गजरात अनेक रस्ते दुमदुमून गेले होते. या सोहळ्यासाठी अनेक गावातील महिला मंडळींची संख्या अधिक होती. दि. २० रोजी या अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता सकाळी दहीहंडी फोडून करण्यात आली.


मुगट ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलच्या दणदणीत विजय.

 आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सभापती पॅनलचा दारुण पराभव!!

मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुगट येथील दि.१५रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज दि.१८रोजी लागला आहे.ग्रामविकास पॅनलचे१५पैकी  यावेळी ९उमेदवार विजय झाल्यामुळे ग्रामपंचायची एकहाती सत्ता त्यांच्या  हाती आली आहे.
पॅनल प्रमुख संचालक भिमराव पाटील कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली  ९उमेदवारांचा दणदणीत विजय झाले असून आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सभापती यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दारून पराभव स्वीकारावा लागला आहे.
यावेळीच्या निवडणुकीत गावात तीन पॅनल निवडणूकी साठी उभे राहिले होते.त्यात संचालक भिमराव पाटील कल्याणे यांचे ग्रामविकास पॅनल, माजी सभापती शोभाताई मुंगल यांचे शेतकरी विकास पॅनल तर भाजपचे युवा कार्यकर्ते विलासराव कल्याणे यांचे आत्माराम महाराज ग्रामविकास पॅनल यांचा समावेश होता.
यावेळी या निवडणुकीत १५ जागेसाठी गावातील ४५उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यात अपक्ष उमेदवार ३ तर इतर तीन पॅनल चे १५,१५,१२ ची संख्या होती.
यापूर्वी ग्रामपंचायत ची सत्ता ही ग्रामविकास पॅनल च्या हाती होती.गावातील लोकांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतची सत्ता त्यांच्या हाती देऊन गावचा सर्वांगीन विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे.
तर आत्माराम महाराज ग्रामविकास पॅनल चे पॅनल प्रमुख विलासराव कल्याणे,सौ. सुमनबाई कल्याणे, वैभव गजेले, तसेच  शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या सौ.रेखा हाटकर,संभाजी तुप्पेकर,सौ.पल्लवी हाटकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयी उमेदवारांनी गावातील धार्मिक स्थळांना भेटी देऊन विजयी उत्सव साजरा केला






"मातृभूमी न्युज " कडून सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!



मुगट प्रा.आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला सुरुवात

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि. १६ रोजी मा.मुख्य. कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे) यांची यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाला सुरुवात करन्यात आली.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हा परिषद उपाध्यक्षा पद् मा रेड्डी, कृषी व पशुसंवर्धन  सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा परिषद सदस्य अरुणा कल्याणे, तहसीलदार दिनेश झांपले,नायब तहसिलदार संजय नागमवाड, संचालक भिमराव कल्याणे,सभापती बालाजी सुर्यतळे,बीडीओ जाधव, डॉ. बालाजी शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. विद्या झिने ( एडीएचओ), डॉ. राजेंद्र पवार (तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड) डॉ. संजय कासराळीकर(वैद्यकीय अधिकारी मुगट),डॉ.सरस्वती बेन्दगुडे, डॉ.अश्लेशा जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुगट प्रा.आरोग्य केंद्राकडून आलेल्या मान्य वरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, कृषी व पशुसंवर्धन सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कोरोना लसीकरणाचा पहिला डोस आरोग्य कर्मचारी मो.खैसर यांना देण्यात आला.यावेळी मुख्यकार्यकारि अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कोरोनाच्या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी सज्ज झाले आहेत.

कोरोना लसीकरणाच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये कोरोना काळात काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी कार्यकर्ती, तसेच फंट लाईन कोवीड वारियर्स यांचा समावेश असणार आहे.


या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तीन टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ.अश्लेशा जाधव, डॉ.सरस्वती बेन्दगुडे, सुरेखा गाडेकर(एनएम), राजकुमार साळवे(एमए), कराडे यु.बी (एमपीडब्ल्यू) ,पुष्पराज राठोड (एमपीडब्ल्यू) ,मो.खैसर (एमपी डब्ल्यू) ,अरुणा कुरुडे (एएनएम), रेखा हाटकर (आशा कार्यकर्ती),पी.डी शेंबेटवाड (पोलीस कर्मचारी) इत्यादी कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, सहायीका, एएनएम, एम पीडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा, औषधी निरीक्षक अधिकारी, व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

कपिल लोखंडे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव पदी निवड

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष  रोहन गुप्ता यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मिडीया

विभागात प्रदेश कार्यकारिणीच्या विविध  नियुक्त्या घोषीत करण्यात आल्या आहेत.

त्यात नांदेड जिल्ह्यातील मुदखेडच्या कॉग्रेसच्या अभ्यासू व भोकर विधानसभा सोशल मिडीया अध्यक्ष कपील लोखंडे यांची महाराष्ट्र राज्य कौग्रेस प्रदेश कार्यकारीनी सचीव पदी  अशोकराव चव्हाण सुचनेनुसार निवड करण्यात आली. यां निवडणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मुदखेडच्या सक्रीय कार्यकरत्यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली.

 कपिल लोखंडे  यांची महाराष्ट्र प्रेदश काँग्रेस सोशल मीडिया सचिव पदी निवड झाल्या बदल व पक्षाने मुदखेड शहरातील  दोन जणांना प्रदेश पातळीवर  प्रतिनिधित्व दिले या बद्ल दोघांचे अभिनंदन व अशोकराव चव्हाण यांच आभार व्यक्त केले जात आहे.

मुगट प्रा.आरोग्य केंद्रात होणार कोवीड-१९ लसीकरण केंद्राचे उद् घाटन व शुभारंभ

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दि.१६ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब डॉ. विपिन इटणकर यांच्या हस्ते कोवीड-१९ लसीकरण केंद्राची उद् घाटन व शुभारंभ संपन्न होणार आहे. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर (घुगे) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या उद् घाटन कार्यक्रमास मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच  डॉ. बालाजी शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. विद्या झिने (एडीएचओ), डॉ. राजेंद्र पवार (तालुका आरोग्य अधिकारी मुदखेड) डॉ. संजय कासराळीकर(वैद्यकीय अधिकारी मुगट),डॉ.सरस्वती बेन्दगुडे, डॉ.अश्लेशा जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक, सहायीका, एएनएम, एम पीडब्ल्यू, वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा, औषधी निरीक्षक अधिकारी, व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार असून कोविड-१९च्या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी सज्ज झाले आहे.
लसीकरणाच्या ह्या पहिल्या टप्प्यामध्ये कोवीड-१९ मध्ये काम केलेल्या वैद्यकीय अधिकारी,आरोग्य कर्मचारी,पोलीस कर्मचारी,आशा कार्यकर्ती,अंगणवाडी कार्यकर्ती, तसेच फंट लाईन कोवीड वारियर्स यांचा समावेश असणार आहे.
या लसीकरणासाठी मुगट प्राथमिक आरोग्य केंद्राकडून तीन टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कासराळीकर, डॉ.अश्लेशा जाधव, डॉ.सरस्वती बेन्दगुडे, सुरेखा गाडेकर(एनएम), राजकुमार साळवे(एमए), कराडे यु.बी (एमपीडब्ल्यू) ,पुष्पराज राठोड (एमपीडब्ल्यू) ,मो.खैसर (एमपी डब्ल्यू) ,अरुणा कुरुडे (एएनएम), रेखा हाटकर (आशा कार्यकर्ती),पी.डी शेंबेटवाड (पोलीस कर्मचारी) इत्यादी कर्मचाऱ्यांच्या समावेश करण्यात आला आहे.

गावाच्या विकासासाठी मला विजयी करा-रामेश्वर कल्याणे

 


माझ्या मतदार बंधु/ भगिनींनो

आज आपल्या गावात अनेक वर्षांपासून काही समस्या कायमच आहेत, गावाचा विकास खुंटला आहे. गावातील सर्व सामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय योजना यांची माहिती सुद्धा नाही.शेतीसाठी योग्य रस्ते नाहीत.गावातील तरुणांच्या हाती काम नाही.आजही घराघरात नळाचे पाणी नाही.घरकुला पासून अनेक लोक वंचित आहेत.हे सर्व चित्र बदललं पाहिजे. सामान्यांच्या, तळागाळातील लोकांच्या अडीअडचणी दूर करून गावच्या विकासासाठी सर्वतोपरी काम करण्याचे ठरवले आहे.फक्त गरज आहे आपल्या इच्छा शक्तीची.

आपल्या गावाचा विकास करण्यासाठी मी तत्पर आहे .आपन मला मतदान करून गावाची सेवा करण्याची संधी द्यावी.

 नक्कीच आपन माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.


 तर मग येणाऱ्या १५ तारखेला आपण माझ्या कढई या निशाणी समोर वर बटन दाबून वार्ड क्रमांक 3 मधून  विजयी करा.

ग्राम विकास पॅनल ला भरघोस मतांनी विजयी करा- भिमराव पा.कल्याणे.

 गावचा सर्वांगीन विकास हाच आमचा ध्यास


मुगट गावातील मतदार बंधु/ भगिनींनो

आपण जी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती ती यशस्वीपणे पेलण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आपल्या गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे करण्यात आली आहेत. व अनेक कामे चालू आहेत. 

आपण सर्वांनी माझ्या पॅनल वर विश्वास टाकून भरघोस मतांनी विजयी केले.गावाचा विकास चालू आहे. हीच वाटचाल पुढे चालू राहण्यासाठी व आपल्या गावाचा सर्वांगीन विकासाच्या ध्यासचा विडा उचलला आहे.

आपल्या गावाचा सर्वांगीन विकास हाच आमचा ध्यास पुर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा माझ्या पॅनल वर विश्वास टाकून ग्रामविकास पॅनलला प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.


दि.१५रोजी आपन सर्वांनी माझ्या ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराच्या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करावे.


श्री.आत्माराम महाराज ग्राम विकास पॅनलला विजयी करा-विलासराव कल्याणे


 मुगट मधील माझ्या मतदार बंधु/ भगिनींनो

श्री आत्माराम महाराज ग्रामविकास पॅनल च्या माध्यमातून गावच्या हितासाठी व विकासासाठी सर्व गावातील बांधवांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत निवडणूक २०२१ लढवत आहोत. माझ्या पॅनेलच्या सर्व उमेदवारावर आपले मतदान रुपी आशीर्वाद द्यावेत व प्रचंड बहुमतानी विजयी करावे. 

आपल्या गावात अनेक वर्षांपासून अनेक समस्या आजही कायम आहेत. गावात पाणी, वीज, रस्ते हे प्रश्न आजही तसेच दररोज आपल्याला भेडसावत आहेत.हे सर्व बदलण्यासाठी व गावचा विकास करण्यासाठी आपल्याकडे एकच पर्याय म्हणजे श्री आत्माराम महाराज ग्राम विकास पॅनेलच्या  प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन गावच्या हिताची व विकासाची कामे केली जातील .


आपन सर्वांनी येणाऱ्या १५ तारखेला श्री आत्माराम महाराज ग्राम विकास पॅनल च्या सर्व उमेदवाराच्या चिन्हा समोरील  बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. 

रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार भविष्यात गाड्यांचे परिचालन : - विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र सिंह

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

मुदखेड रेल्वे स्थानकातील ऑल इंडियन एससी अँड एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी दिंनाक १० जानेवारी रोजी सकाळी ठीक ११ वाजता नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र सिंह यांचा आगमन झाले.

हे कार्यालय रेल्वे स्थानकाच्या  क्रमांक ४ जवळ बांधले गेले आणि उद्घाटन नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपेंद्र सिंह यांच्या हस्ते झाले.

मुदखेड रेल्वे स्थानकात गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे विभागात कार्यरत एससी आणि एसटी कर्मचार्‍यांनी नांदेड रेल्वे विभागात एससी आणि एसटी कर्मचार्‍यांची कार्यालये सुरू करावी अशी मागणी केली आहे. अध्यक्षीय भाषणात नांदेड विभागीय रेल्वे विभागाचे व्यवस्थापक उपेंद्र सिंह म्हणाले की, रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे कर्मचायांच्या मुलांसाठी उद्यानासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी योग्य ती पावले लवकरच उचलली जाईल. गेल्या १० महिन्यांत कोरोना विषाणूचा उद्रेकामुळे

 देशात  रेल्वे वाहतूक रद्द करण्यात आली आहे पण रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार रेल्वे गाड्या चालवण्यात  येतील केवळ एकाच विभागात ट्रेनची हालचाल होत नसल्यामुळे गाड्या त्याच दिशेने धावल्या जातील. जेव्हा तुम्हाला ट्रेनचे तिकीट घ्यायचे असेल, तेव्हा व्यवस्थापकाने सांगितले की तुम्हाला तिकिट देण्यात येण्यापूर्वी चार तास आणि ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवासाच्या चार्टच्या चार तास आधी तयार करावे लागेल त्यामुळे वास्तविक पाहता रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा देण्यात येत आहे शहरातील मागील काही वर्षांपासून भुयारी मार्ग संबंधी स्थानिक नागरिकांनी  रखडलेला प्रश्न माझ्या ज्ञानात आणून दिला रखडलेल्या प्रश्ना संबंधी संबंधित अधिकारी आणि यांच्याशी चर्चा करून योग्य ती सकारात्मक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईन अशी ग्वाही या वेळी उपेंद्र सिंह यांनी दिली अतिरिक्त डीआरएमचे नागभूषण राव, बांधकाम विभागाचे शिवाराम, पी. रवी कुमार, विभागीय अध्यक्ष ए. एनर्नीफिम, पी. पेरुमल, अ. आर. राजेश खेखर यांच्यासमवेत अनेक कर्मचारी युनियन अधिकारी, माजी नगराध्यक्ष देवीदास चौकसे, नगरसेवक कमलेश चौकसे, स्थानिक लोक आणि बरेच लोक उपस्थित होते. बालाजी थोरात यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमादरम्यान नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपेंद्र सिंह यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

मुदखेड एस.बी.आय. बँकेत एकच काउंटरवर चालतो कारभार

 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे मुदखेडच्या एस बी‌आय. शाखेला कॅशियर मिळेना.


मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

वरिष्ठ अधिकार्‍यांचे दुर्लक्ष मुदखेड शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत एकाच कॅश काउंटर मुळे ग्राहकांना तासन्तास लाईनमध्ये उभा राहावे लागत आहे यामुळे अनेक बॅंकेचे खातेदार तसेच वृद्धांना ज्येष्ठ नागरिकांना महीलाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मुदखेड हे तालुक्याचं ठिकाण असून या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस बल तसेच रेल्वे जंक्शन यांच्यासह शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांची तसेच सामान्य नागरिकांची बँक खाते मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी केवळ एकाच अकाउंटवर या बँकेचा कारभार चालत असल्यामुळे महिलांना तसेच रांगेत उभा टाकलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

मुदखेड एसबीआय बँकेत एकूण चार कौंटर असून दोन कंट्रोलवर चेक व इतर काम चालत आहेत परंतु कॉन्टॅक्ट नंबर चार हे रिकामा असून या ठिकाणी त्याच घेण्यासाठी रशियाची कमतरता भासली आहे. 

बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मुदखेड एसबीआय शाखेत एकूण सात कर्मचारी असून यात एकच कॅशियर असल्यामुळे आम्हाला सुद्धा याचा त्रास होत आहे अनेक ग्राहकांच्या तक्रारी वरून आणि वरिष्ठांना कॅशियर ची मागणी केली आहे परंतु वरिष्ठ टाकून कॅशियर मिळत नाही अशी तोंडी प्रतिक्रिया बँकेचे मॅनेजर ज्ञानेश प्रसाद यांनी दिली आहे.

बिनविरोध निवडणूकीस अडथळा करणारे घरीच बसणार

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी    

मुदखेड तालुक्यातील माळकौठा गावाच्या विकासासाठी आम्ही आमच्या विचारांने ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केला पण काहीनी यात अडथळा निर्माण  करत पॅनल उभे केले.  त्यांना या पुढे घरीच बसवणार अशी भूमिका असंख्य गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

गावातील आराध्य दैवत श्री रोकडेशवर हनुमान मंदिरात डिसेंबर २०२० मध्ये माळकौठा ता मुदखेड ग्रामपंचायत च्या ९ जागेसाठी सर्व संमतीने उमेदवार द्यायचे म्हणून विशेष बैठक झाली. सहा जागा बिनविरोध ची तयारी पूर्ण झाली पण एक दोन जागेवर दोन पेक्षा अधिक उमेदवार देण्याची वेगवेगळ्या चाली खेळत अडथळा निर्माण झाला. तालुक्यात आदर्श निर्माण करण्यासाठी युवक संघटक    शहाजी व्यंकटराव जाधव यांनी तयारी केली अन् आजोबा पासून ग्रामपंचायत चे सदस्य पद असतानां बिनविरोध सदस्य साठी  आपले नाव दिले नाही हे विशेष ठरले. 

पंचायत समितीच्या सभापती चे प्रतिनिधी लोकडुजी गोणेवाड, तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सरपंच प्रभाकर कोटगिरे, युवक काँग्रेसचे नेते बालाजी माणिकराव जाधव , रूग्ण सेवेचे माधव पाटील शिंदे, देवबा जी हनमंते, शौकत महेबूबसाब यांच्या सह सहाशे लोकांनी बिनविरोध निवड करण्यासाठी प्रयत्न केला. 

सध्या माळकौठा क्षेत्रात दारू चे प्रमाण वाढले आहे. या तुन गावात एकोपा ठेवून विकास करण्याचे स्वप्न  भंगण्याचे कारण होवु नये अशी चिंता  ज्येष्ठ व नवीन दिशा घेऊननिघाले त्यांनी व्यक्त केली आहे.

मुगट ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देवा दारी

 (नारळ फोडून केला प्रचाराचा श्रीगणेशा)



मुगट/ प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूक २०२१ जसजशी जवळ येत आहे तसा तसा या निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चांगलाच दिसून येत आहे. मुगट येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल उतरले आहेत. त्यात दोन पॅनल काँग्रेसच्या गटाचे तर एक पॅनल भाजपाच्या युवा चेहऱ्याचे आहे. काँग्रेसच्या मुगटच्या माझी सभापती सौ. शोभाताई मुंगल यांचे पती श्री गोपीनाथराव मुंगल हे शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आहेत तर नांदेड जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे यांचे पती श्री भीमराव कल्याणे हे ग्राम विकास पॅनलचे प्रमुख आहेत. गावातील भाजपाचा युवा चेहरा श्री. विलासराव कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली श्री. आत्माराम महाराज ग्राम विकास पॅनल तयार करण्यात आले आहे. तर अनेक वार्डात अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावून पाहणार  आहेत. 
वार्ड क्रं.३ मधील अपक्ष उमेदवार रामेश्वर कल्याणे या युवा चेहऱ्याला मतदारांचा कौल अधिक दिसून येत आहे.
गावं निवडणूकीच्या रंगात चांगले रंगत आहे. गावात रात्रीला अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे.निवडणूकीचा अधिक फायदा गावातील तळीरामांना अधिक दिसून येत आहे. तळीरामाना आता गावात चांगले दिवस झाले आहे.
गावातील पॅनल कडून ढोल ताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन दाखवत प्रचाराचा श्रीगणेशा गावातील अनेक मंदिरांना नारळ फोडून प्रचार सुरू करण्यात आला आहे.
 उमेदवार आपल्या वार्डातील मतदारांच्या घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली आहे.मतदारांना अनेक आश्वासने दिली जात आहे.
या निवडणुकीत गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच पुन्हा एकदा आमने-सामने निवडणूकीच्या फडात उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या दोन्ही गटाने पॅनल उभे केले तरी सुद्धा गावातील ही निवडणुक भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे.

मुदखेड तालुक्यात राजकीय पक्षांच्या अजब कार्यकर्त्यांचा गजब प्रताप कॉंग्रेस सोबत भाजपाचा घरोबा?

 भोकर विधानसभा मतदारसंघातिल तालुक्यातील चित्र


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक राजकिय पक्षाला तळाच्या कार्यकर्त्या पर्यंत पोहचून पक्षाची जाळ मुळ खोलवर रोवन्याची नामी संधी असते.ही संधी म्हणून स्वीकारण्याचे धाडस जे पक्ष संघटन करते त्या संघटनेस उद्याचे राजकिय भविष्य असते हे त्रिकाल बाधित सत्य आहे.हे सत्य जे संघटन समजून घेऊन  आपली विवरचना करेल तेच संघटन उद्याच्या काळी यशवंत ठरेल असेच म्हणावे लागेल.

हा खटाटोप करण्यामागे शुद्ध हेतू हाच की,देशाच्या पातळीवर कॉंग्रेस मुक्त भारताच्या दिशेने भाजपाचे नेतृत्व पराकोटीची मेहनत करत आहे.तर भोकर विधानसभा मतदार संघातिल मुदखेड तालुक्यात मात्र या उलट चित्र सद्याच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जाहीरपणे पहावयास मिळत आहे.

काही लोक स्वत:ला समाज माध्यमांवर स्वंघोषीत भावी आमदार म्हणून घेण्यात येरवी मश्गुल झालेले सर्वश्रूत आहेत.मात्र १५हजार लोक वस्तीच्या गावात,स्वत:कडे भोकर  विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आहे.हे विसरुन होम स्पिचवर आपल्या पक्षाची धुरा सांभाळणे उचित असताना जाहिर पणे पक्ष विरोधी बिगुल वाजवताना दिसून येत आहेत.

 मुदखेड तालुक्यात बारड, मुगट, माळकौठा, निवघा, रोहिपिंपळगाव, डोनगाव,मेंडका,शेंबोली या ग्रामपंचायती उद्याच्या राजकीय आखाड्याच्या शिल्पकार ठरतात.या पैकी बारड ही जवळपास पंधरा हजार लोक वस्तीचे गाव सर्वात जास्त सतरा सदस्य आसलेली ग्रामपंचायत याच ठिकाणी देशात ३०३खासदार राज्यात १०५आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपा विधानसभा अध्यक्षाच्या होम स्पिचवर भाजपा स्वत:चे पॅनल तयार करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.येवढ्यावरच  न थांबता बंधु प्रेमापोटी कॉंग्रेसच्या पॅनलची धुरा जाहिरपणे खांद्यावर घेण्याची किमया देखील केली आहे.जी व्यक्ती ग्रामपंचायतीचे पॅनल करु शकत नाही.त्या व्यक्तीस भोकर विधानसभचे नेतृत्व कसे पेलावेल?हा प्रश्न जानत्यांना निरुत्तरीत करणाराच नाही का? बाकी गावं यास अपवाद कसे?हा भाजपाच्या अजब कार्यकर्त्यांचा गजब प्रताप आहे असे म्हंटले तर नवल कसले?

मुदखेड येथील रेल्वे अंडर ब्रिज चा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आ.अमर राजूकर यांची ग्वाही

शहरात घरकुल योजनेतून३८लाख४०हजार रुपयाचे लाभार्थ्यांना वितरण 

मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद

मुदखेड येथील रेल्वे अंडर ब्रीज चा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने जागा मावेजा साठी १ कोटी ८४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. अमर राजूरकर यांनी नगरपरिषद येथे धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केली आहे.यावेळी शहरातील घरकुल योजनेचे ३८लाख४०हजार रुपयाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रमुख मुदखेड काँग्रेस शहराध्यक्ष माधव पाटील कदम, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, मुख्याधिकारी रामराजे कापरे ,लक्ष्मण देवदे, संदीप सोनकांबळे करीम खानसाब,बबलू सेठ किराणावाले,विशाल चौदंते, किशोर पारवेकर, संजय आऊलवाड,चांदू चमकूरे,श्याम चंद्रे,रावसाहेब चौदंते, इम्रान मच्छीवाले, उत्तम चव्हाण, जयप्रकाश चौदंते,

पत्रकार संजय कोलते, पत्रकार गंगाधर पाटील डांगे, काँग्रेस अल्प संख्याक विभागाचे साजिद कुरेशी, संचालक मुन्ना चौधरी,रफीक मासालेवाले, इक्बाल कुरेशी, लेखापाल रामेश्वर वाघमारे, नगर अभियंता मोरे, सिद्दीकी, नितीन चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे राजूरकर म्हणाले शहरातील पाणी पुरवठा आराखड्यासाठी ४३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील बुद्धविहाराचे काम मार्गी लागले असून १ कोटी रुपयांच्या निधीत विहार उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील अंतर्गत विकासासाठी  १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत खासदार च्या हाती काही नसून निधी देण्याचा पावर नसल्याने मुदखेड वाल्याचा फुकटच्या चहा पीत आहेत हे काही देऊ शकत नाहीत असा खरपूस समाचार भाजप खासदारावर यावेळी राजूरकर यांनी घेतला आहे तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील ५२१ घरकुल साठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे शहरातील नवीन वस्ती मध्ये विकास कामे करण्याची गरज असल्याने त्यानुसार कार्यकर्त्यांनी शहरातील नवीन वस्त्यांच्या विकासासाठी कार्यशील राहावे तर अधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरून शहरातील विकास कामासाठी अडवणाऱ्या वर घाबरून नजाता विकासासाठी प्राधान्य द्यावे असे यावेळी सांगितले.

शहरातील गरजू व जास्तीत जास्त लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेत एकजुटीने काम करत असून शहरात जास्तीत जास्त विकास कामाला प्राधान्य देत असल्याची माहिती यावेळी शहराध्यक्ष माधव कदम यांनी यावेळी सांगितले आहे

तर प्रास्ताविकात नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जागीरदार यांनी नगरपालिका अंतर्गत विकास कामे सांगितले असून ५२१ घरकुल ची मंजुरी शासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी प्रयत्न करत असून शहर विकासासाठी निधीची कुठलीच कमतरता नसून प्रभागात विविध विकास कामे करण्यात येत आहेत सहा महिन्यात उर्वरित सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्र संचालन संजय कोलते यांनी तर उपस्थित नागरिकांना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वचन संकल्प पाठन नगर पालिकेचे लेखापाल रामेश्वर वाघमारे यांनी केले.

लोकप्रिय बातम्या