आजी-माजी सरपंच, उपसरपंच, सभापती पॅनलचा दारुण पराभव!!
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुगट येथील दि.१५रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज दि.१८रोजी लागला आहे.ग्रामविकास पॅनलचे१५पैकी यावेळी ९उमेदवार विजय झाल्यामुळे ग्रामपंचायची एकहाती सत्ता त्यांच्या हाती आली आहे.
पॅनल प्रमुख संचालक भिमराव पाटील कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली ९उमेदवारांचा दणदणीत विजय झाले असून आजी, माजी सरपंच, उपसरपंच, सभापती यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दारून पराभव स्वीकारावा लागला आहे.
यावेळीच्या निवडणुकीत गावात तीन पॅनल निवडणूकी साठी उभे राहिले होते.त्यात संचालक भिमराव पाटील कल्याणे यांचे ग्रामविकास पॅनल, माजी सभापती शोभाताई मुंगल यांचे शेतकरी विकास पॅनल तर भाजपचे युवा कार्यकर्ते विलासराव कल्याणे यांचे आत्माराम महाराज ग्रामविकास पॅनल यांचा समावेश होता.
यावेळी या निवडणुकीत १५ जागेसाठी गावातील ४५उमेदवार रिंगणात उतरले होते.त्यात अपक्ष उमेदवार ३ तर इतर तीन पॅनल चे १५,१५,१२ ची संख्या होती.
यापूर्वी ग्रामपंचायत ची सत्ता ही ग्रामविकास पॅनल च्या हाती होती.गावातील लोकांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतची सत्ता त्यांच्या हाती देऊन गावचा सर्वांगीन विकास करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली आहे.
तर आत्माराम महाराज ग्रामविकास पॅनल चे पॅनल प्रमुख विलासराव कल्याणे,सौ. सुमनबाई कल्याणे, वैभव गजेले, तसेच शेतकरी ग्रामविकास पॅनल च्या सौ.रेखा हाटकर,संभाजी तुप्पेकर,सौ.पल्लवी हाटकर हे उमेदवार विजयी झाले आहेत.
"मातृभूमी न्युज " कडून सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!







कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा