मुगट वार्ताहार
मुगट येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील संत आत्माराम महाराज बोधी मठाच्या समोर संत मारुती महाराज दस्तापुरकर यांच्या कृपाशीर्वादाने व मठाधिपती सिताराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवताचार्य वैराग्यमूर्ती वैजनाथ महाराज कागदे यांच्या वाणीतून भागवत कथा सांगण्यात आली तर ब्रह्ममूर्ती विजयानंद सुपेकर महाराज यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.
दि. १३ पासून या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करण्यात आली होती. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन ६ ते १० ज्ञानेश्वरी पारायण १० ते १२ गाथा, भजन दुपारी २ ते ५ भागवत कथा, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८ ते १० हरि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
या हरि कीर्तनासाठी यावेळी हरिभक्त पारायण ह.भ.प बालाजी महाराज,ह.भ.प विलास महाराज,ह.भ.प संतोष पुरी महाराज, प.पू प्रभाकर बाबा,ह.भ.प काशिनाथ महाराज, ह.भ.प दशरथ महाराज, ह.भ.प मधुकर महाराज, ह.भ.प चंद्रकांत महाराज, ह.भ.प काळबा महाराज यांची कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दि. १९ रोजी गावात या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वाजत गाजत पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. गावातील हरिनामाच्या गजरात अनेक रस्ते दुमदुमून गेले होते. या सोहळ्यासाठी अनेक गावातील महिला मंडळींची संख्या अधिक होती. दि. २० रोजी या अखंड हरिनाम सप्ताह ची सांगता सकाळी दहीहंडी फोडून करण्यात आली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा