भाजपा शिक्षक आघाडीने राष्ट्राभिमान व विकासाची कास धरावी.

प्रदेश उपाध्यक्ष अँड.चैतन्यबापू देशमुख यांचे गौरौद्गार

संपादक आशिष मुगटकर


नांदेड जिल्हा परिषद 

   शिक्षक हा सामान्य नसून उद्याच्या भारताचे चिमुकले भविष्य घडविण्याचे भाग्य त्यांच्या हातात असते. भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा नांदेडने शिक्षकांच्या भरीव सहकार्याने पक्षाची ध्येयधोरणे शिक्षकांपर्यंत आणि पर्यायाने जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी अधिक श्रम घेवून राष्ट्राभिमान व विकासाची कास धरावी , असे गौरवोद्गार प्रदेश उपाध्यक्ष अँड.चैतन्यबापू देशमुख यांनी भाजपा शिक्षक आघाडीच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून काढले आहेत.



  
                                         
         दि.12 एप्रिल रोजी सेवाभावी संस्था विष्णुपूरी परिसर येथे अत्यंत भव्य पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप सोहळा तथा पदवीधर निवडणूक नोंदणी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस 178 शिक्षकांची उपस्थिती लाभली होती. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण हे होते,तर विशेष अतिथी वक्ते म्हणून डॉ प्रशम कोल्हे प्रदेश संयोजक तथा पुणे शिक्षक मतदार संघ नोंदणी प्रमुख , प्रा.संजय भातलंवडे संयोजक मराठवाडा, डॉ बालाजी गिरगावकर जिल्हा कोषाध्यक्ष भाजपा नांदेड, प्रा.राजेश कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी नांदेड दक्षिण, गणेश पाटील बेळीकर सहसंयोजक मराठवाडा, बि.ए.जाधव उत्तर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
     अध्यक्षीय समारोपात डॉ हंबर्डे यांनी भाजपा स्थापनेपासूनचा इतिहास, काश्मीरचे 370 कलम रद्द, डॉ शामाप्रसाद मुखरजी यांचे अतुलनीय बलिदानाविषयी रोमांचकारी मार्गदर्शन करुन शिक्षकांना प्रेरित केले. प्रमुख वक्ते डॉ प्रशम कोल्हे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पध्दतीने आकडेवारी, इसवी सनाचा दाखला देत मोदी व फडणवीस सरकारने शिक्षकांच्याच हिताची कामे केली , हे पटवून दिले. यासमयी उपस्थित अनेक शिक्षकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देवून त्यांच्या समस्यांचे निराकरण केले. यावेळी प्रा.संजय भातलंवडे यांनी पदवीधर नोंदणीचे महत्त्व विशद करुन प्रत्येक शिक्षकांस नोंदणी अर्जाचे वितरण केले. 

            एकूण तीस मंडळातील पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वितरण करण्यात आले.  या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व निवेदन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार जाधव यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीतानंतर सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

नांदेड भाजपा शिक्षक आघाडीच्यावतीने शिक्षक मेळाव्याचे आयोजन.

संपादक आशिष मुगटकर

नियुक्ती पत्र व पदवीधर निवडणूक नोंदणी आढावा घेतल्या जाणार 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी

    भाजपा शिक्षक आघाडी जिल्हा नादेडच्यावतीने रविवार दि.12 रोजी सहयोग सेवाभावी संस्था, विष्णुपूरी परिसर येथे सकाळी 11 वाजता भव्य शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ संतुकराव हंबर्डे जिल्हाध्यक्ष नांदेड दक्षिण ग्रामीण हे राहणार असून उद्घाटक म्हणून ऍड. चैतन्यबापू देशमुख प्रदेश भाजपा उपाध्यक्ष, संजय कौडगे उपाध्यक्ष प्रदेश भाजपा तर विशेष अतिथी अमरनाथ राजूरकर महानगराध्यक्ष नांदेड, किशोर देशमुख जिल्हाध्यक्ष उत्तर ग्रामीण यांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक म्हणून डॉ प्रशम कोल्हे प्रदेश संयोजक भाजपा शिक्षक आघाडी, प्रा.किरण पाटील शिक्षक नेते तथा प्रा.संजय भातलंवडे संयोजक मराठवाडा विभाग भाजपा शिक्षक आघाडी यांचे टीईटी, शिक्षकांवरील अतिरेकी कामाचा बोजा,विविध प्रलंबित प्रश्नावर सखोल व भरीव मार्गदर्शन लाभणार आहे.


                  याच कार्यकमात नांदेड जिल्ह्यातील भाजपा शिक्षक आघाडीच्या विविध पदाधिकारी नेमणूकीचे नियुक्ती पत्र वितरण केल्या जाणार आहे. यासमयी मान्यवर येवू घातलेल्या पदवीधर निवडणूक नोंदणीचा सुध्दा आढावा घेवून जास्तीत जास्त नोंदणी कशी करुन घेता येईल, यासंदर्भात योग्य सूचना व मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातून सोळा तालुके,  नवू मंडळे, महानगर, दक्षिण व उत्तर नांदेडमधील जवळपास तीनशे शिक्षक उपस्थित राहतील. अशा महत्वपूर्ण शिक्षक कार्यक्रमास जिल्ह्यातील जास्तीतजास्त शिक्षक बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा.राजेश कुलकर्णी जिल्हाध्यक्ष भाजपा शिक्षक आघाडी नांदेड दक्षिण, पंढरीनाथ काळे नांदेड महानगराध्यक्ष शिक्षक आघाडी, बि.ए.जाधव उत्तर आणि गणेश पाटील बेळीकर सहसंयोजक मराठवाडा विभाग यांनी केले आहे.




सरदार रामस्वरूप सिंह खालसा यांच्या धार्मिक पदयात्रेला सुरक्षा प्रदान करा ; शिवकांत शुक्ला (राष्ट्रीय अध्यक्ष) भारतीय गण वार्ता पार्टी भोपाल यांची मागणी.

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी / सरदार गुलाबसिंग महाराज 

             शिखधर्मीयाचे दहावे गुरु तथा खालसा पंथाचे पिता श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या नांदेड येथील पवित्र पावन या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी  भोपाळ वरून सरदार रामस्वरूप सिंह खालसा, आर. एस. सिंह खालसा भगवा पार्टीचे राष्ट्रीय संघटन महामंत्री असून दैनिक विश्वसत्ताचे ते संपादक आहेत.  खबर खालसा या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक सुध्दा आहेत.



दि. ६ एप्रिल पासून भोपाळ येथून महाराष्ट्रातील नांदेड येथे धार्मिक पदयात्रा करत येणार आहेत. पवित्र, पावन सचखंड हुजूर साहिब अबचलनगर नांदेडला भेट देणार आहेत.

 त्यांची ही पदयात्रा बेतुल, होशंगाबाद, अमरावती, हिंगोली, नांदेड अशी मार्गक्रमण करत येणार आहे. 

त्यांच्या या पदयात्रेला यात्रेला सुरक्षा प्रदान करण्याची मागणी भारतीय गण वार्ता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकांत शुक्ला यांनी एका पत्रकाद्वारे संबंधित जिल्हाधिकारी, तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.

लोकप्रिय बातम्या