मुदखेड तालुक्यात वजनमाप तपासणी मोहीम राबवणार

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

मौल्यवान वस्तू व्यवहारात नियमाची कडक अंमलबजावणी    मुदखेड तहसील मध्ये दिनांक २७  डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करणयात आला .कार्यकमा च्या अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार संजय नागमवाड हे होते. 

प्रस्तावना कक्षाचे महेश गाजुलवाड यांनी मांडली .या प्रसंगी ग्राहक संरक्षण समिती चे मनोज कमटे व माजी उप प्राचार्य सरलाताई भुतडा यांनी आपले विचार मांडले. मौल्यवान सोने चांदी आदी  वस्तू व्यवहारात 

 ग्राहकांची फसवणूक होवु नये या साठी च्या  नियमांची कडक अंमलबजावणी करावी अशी भुमीका ठरवली. आठवडी बाजार सह मार्केट मधील विक्री दुकानात शासनाने वजन माप योग्य आहेत का  ? तसेच दाळ आदी अन्न धान्ये शुद्ध आहेत का  ? या कडे शासकीय यंत्रणा चे सतत लक्ष पाहिजे अशी मागणी आली. मुदखेड तालुका पुरवठा विभाग प्रमुख नायब तहसीलदार जोगदंड यांनी ग्राहक हित साठी व संरक्षण साठी तळमळीने कार्य करणारे यांच्या मागणी कडे शासकीय यंत्रणा लक्ष देते.वरिष्ठ पातळीवर आज च्या कार्यक्रम चा अहवाल पाठवु आणि ग्राहक हित ठेवले जाईल असे स्पष्ट केले. आभार मानले. 

मंडळ अधिकारी कऱ्हाळे पाटील, बारडचे लाठकर , पुयड पाटील मुगटकर , तलाठी मगरे , हैबते मॅडम आदी उपस्थित होते.

पांढरवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राम गवंडेवाड विजयी

 संपादक आशिष मुगटकर


बारड / प्रतिनिधी

पांढरवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विधानसभा युवक काँग्रेसचे सरचिटणीस राम गवंडेवाड विजयी झाले असल्याने सताधारि अल्पमतात आल्याने धक्का बसला असुन पांढरवाडी ग्रामपंचायत सतेची समीकरण बदलणार आहेत.

पांढरवाडी ग्रामपंचायत निवडणूक एक वर्षा पुर्वी घेण्यात आली होती अटीतटीच्या निवडणुकीत खांडरे, यरमाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामविकास पँनल ने सात पैकी चार जागा जिंकून बहुमत मिळवले होते त्यानंतर उपसरपंच पोत्तन्ना चितलवाड यांच्या अपघाती निधनाने जागा रिक्त झाली होती.


त्यामुळे दोन्ही गटाकडे तीन तीन ग्रा. पं.सदस्य संख्या समान झाली असल्याने प्रभाग तीन च्या पोटनिवडणुकी कडे ग्रामस्थांनचे लक्ष लागले होते या निवडणुकीत श्री अपरंपार ग्रामविकास पँनल कडून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे समर्थक युवक काँग्रेस विधानसभा सरचिटणीस राम गवंडेवाड उभे होते तर शेतकरी ग्राम विकास पँनल कडून राजेश चितलवाड उभे होते निवडणुकीत पंचायत समिती उपसभापती आनंदराव गादीलवाड माजी सरपंच रामेश्वर जंगीलवाड यांच्या नेतृत्वाखाली अपरंपार ग्रामविकास पँनलचे उमेदवार राम गवंडेवाड ४७ मताने विजयी झाले आहेत

ग्रामपंचायत निवडणुकीत यापूर्वी राम गवंडेवाड यांच्या पत्नी वनमाला गवंडेवाड विजयी झाल्या होत्या ग्रामस्थांनी पती पत्नी दोघांना ही लोकसेवेसाठी संधी दिली आहे अपंरमपार ग्रामविकास पँनल कडे बहूमत असल्याने राम गवंडेवाड यांना उपसरपंच पदाची संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे

पोट निवडणुकीत विजयासाठी उपसभापती आनंदराव गादीलवाड, माजी सरपंच रामेश्वर जंगीलवाड,बाबुराव शिंगेवाड, किसनराव क्यातमाड,बाबुराव गादीलवाड,दत्ता नागदरे,अवदूत शिंगेवाड,श्याम गवंडेवाड,प्रसाद शिंगेवाड, लक्ष्मण नव्हाटे, ज्ञानेश्वर धोंडगे, आनंद यरमाड,रामा लाडाजी, पंडित कल्याणकर, गोविंद कंधारे, उस्मान शेख,बालाजी नागदरे, आदीने परिश्रम घेतले.

वासरी येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर महसुलची धाड

 घटना स्थळी चार ब्रास वाळू एक बोट सापडली...

संपादक आशिष मुगटकर

मुगट येथील गोदावरीच्या पात्रात सापडलेले तराफे पकडून जाळुन नष्ट करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,नायब तहसीलदार संजय नागमवाड, मंडळ अधिकारी बालाजी कुऱ्हाडे, तलाठी देशपांडे ,मगरे, पठाण, व इतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.

मुगट वार्ताहार 

मुगट पासुन जवळ असलेल्या वासरी येथे महसुल प्रशासनाने  दि.२० रोजी रात्री ११च्या सुमारास केलेल्या धडक कारवाईत चार ब्रास वाळू,एक बोट,दोन व्यक्ती ना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे वाळुमाफिया सावध झाले आहेत.

वासरी येथील शेतकरी धर्माजी जळबा खानसोळे रा.वासरी यांच्या गोदावरी काठी असलेल्या गट.क्र.४२१ या शेताजवळील  नदी पात्रातुन बोटीच्या साह्याने नदी पात्रातुन अवैधरित्या चोरट्या मार्गाने उपसा करीत असल्याची माहिती तलाठी प्रवीण हाडे यांना मिळाली होती. उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र खंदारे ,मंडळ अधिकारी बालाजी कुऱ्हाडे,हयुम पठाण,तलाठी मारोती मगर,नरेंद्र मुडगुलवाड,व स्वता तलाठी प्रवीण हाडे हे सर्वजण मिळुन रात्री ११:०० वा.छापा मारला असता घटनास्थळी एकुण चार व्यक्ती होते.त्यातील दोघानी जागेवरुन पळ काढला पण त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात यश आले.

गणेश मारोती खानसोळे रा.वासरी,कमलेश लालसिंग रा.हाथीगाव. उत्तर प्रदेश अशी  त्यांची नावे आहेत.या दोघांना पळुन गेलेल्याची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे सांगीतली. त्यात प्रल्हाद गोविंदराव लष्करे रा.वासरी,माधव श्रीराम खानसोळे,रा.वासरी हे दोघाचा समावेश आहे.

गणेश खानसोळे यांना विचारणा केली असता त्यांनी प्रल्हाद लष्करे यांच्या सांगण्यावरून हे उत्खनन करत असल्याचे सांगितले.घटनास्थळी एक बोट व चार ब्रास वाळू गोदावरी पत्रातुन आढली आहे. या घटनेचा सविस्तर पंचनामा करुन घटनास्थळी मिळालेली बोटला परवाना धारक जिलेटिनच्या साह्याने नष्ट करण्याची कारवाई सुरू आहे.

अनाधिकृतरित्या गौण खनिजा (वाळू ) उपसा बोटीच्या साह्याने करुन चोरून विक्री करणाच्या उद्देशाने चार ब्रास वाळू किंमत १८०००/- ची काढली असुन त्यांच्या विरुध्द पर्यावरण संरक्षण अधिनयम १९८६ व चे कलम ६ व १५ व कलम १८८,३७९ भा.द.वि.व कलम ४८ महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम अन्वये मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जि.प.हा.विष्णुपूरी शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन.

 जि.प.हा.विष्णुपूरी शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न.

 संपादक आशिष मुगटकर



नांदेड जिल्हा / प्रतिनिधी

दि.१८ रोजी जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेत अत्यंत उत्साहाने आझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्याध्यापक मा.एन.एन.दिग्रसकर  तर प्रमुख अतिथी म्हणून मा.उदय हंबर्डे हे होते.तसेच मा.शैलजा बुरसे,मा.देवशेट्टे,मा.वैशाली कुलकर्णी, मा.पटवे,मा.जयश्री शिंदे, मा.उज्ज्वला जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,विकास दिग्रसकर,मा.पंचफुला नाईनवाड,पद्माकर देशमुख व सर्व शिक्षक उपस्थित होते.



      याप्रसंगी मा.मु.अ.यांचे स्वागत उदय हंबर्डे यांनी पुष्पगुच्छ देवून केले. हंबर्डे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनातून आझादी का अमृत महोत्सव विषयी प्रकाश टाकला व स्पर्धेचे विषय,नियम याबाबी स्पष्ट केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार शैलजा बुरसे यांनी व्यक्त केले.



 या स्पर्धेत शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.राष्टगाणाने सांगता करण्यात आली.

पद्मविभूषण माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

तालुकाध्यक्ष श्री. शिवानंद पाटील शिप्परकर यांची माहीती

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड तालुका / प्रतिनिधी

दि.१२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्ष अध्यक्ष व पद्मविभूषण श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या  व्या वाढदिवसानिमित्त मुदखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते माजी मंत्री श्री. कमलकिशोर कदम साहेब व जिल्हाध्यक्ष श्री. हरिहरराव भोसीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुदखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व पद्मभूषण श्री. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निवघा येथे व्हर्च्युअल  रॅलीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. शिवानंद पाटील शिप्परकर यांनी केले तर उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून पवार साहेबांना शुभेच्छा दिल्या व्हर्च्युअल रॅलीला नागरीकांसह मोठ्या प्रमाणात युवकांची उपस्थिति होती.

तसेच ग्रामीण रुग्णालयात दि. ११ रोजी येथील रुग्णांना  पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते महंमद बुरहान यांच्यावतीने फळे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्षा सौ. पूजाताई माधव व्यवहारे यांनी बारड ग्रामीण रुग्णालयात दि. १२ डिसेंबर रोजी येथील रुग्णांना फळे वाटप केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. शिवानंद पाटील शिप्परकर, मुदखेड व बारड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर अतुल कदम साहेब, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष संतोष दर्शनवाड,शिवाजी पवार निवघेकर,माधव पाटील व्यवहारे, शंकर खवास, मोहम्मद अली,सादीक शेख बारडकर, मोहम्मद खाजा, सत्यनारायण वाघमारे, राम नारायण गुंजकर, पद्माकर बोकेफोड, प्रशांत मुंगल, शेख सादिक. शेख अहमद सौदागर सह मुदखेड ग्रामीण रुग्णालय डॉक्टर अतुल कदम, शबाना सिस्टर, पंकज ब्रदर, प्रकाश कर्मचारी व बारड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर कदम येथील सर्व कर्मचारी यासह  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुदखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.





बारड येथुन केंद्र सरकारच्या महागाई विरोधात जनजागरण अभियानाची जोरदार सुरुवात

संपादक आशिष मुगटकर

     


बारड / प्रतिनिधी

 दि.११ रोजी केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात जनजागरण अभियानाची व सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात बारड येथे करण्यात आली.

     त्याप्रसंगी मुदखेड तालुका  जनजागरण प्रभारी तिरुपती पा. कोंढेकर, नांदेड जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष रोहिदास जाधव, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर, मुगट जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भीमराव पा. कल्याने, मुदखेड पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव गादीलवाड, भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मारोती किरकण, मुदखेड शहराध्यक्ष माधवराव कदम, प्रमुख वक्ते बालाजीराव गाढे, महाराष्ट्र ओबीसी सेलचे सरचिटणीस लक्ष्मणराव जाधव, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील वैजापूरकर, दत्तराव अवातिरक, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामराव खांडरे डोणगावकर, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संदीप पवार, विलासराव गव्हाणे माजी सरपंच, जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, माजी उपसभापती सुनीलराव देशमुख,  किशोरराव देशमुख, प्रतापराव देशमुख, बारड जि.प. सदस्या प्रतिनिधी संतोष वारकड, प्रभाकर भीमेवार, दिलीपराव कोरे,संजयराव मुलंगे, पत्रकार नामदेव बिचेवार, नरसिंग आठवले, अशोकराव देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश शिंदे, बंटी कांबळे, भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष धबडगे, राजेंद्र खटिंग, अशोकराव मुंगल, संभाजी लोकरे, दादाराव पुयड,  दत्तराव हामदे, विश्वंभर पुयड, श्रीनिवास महादवाड, बारड गणातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.



     यावेळी केंद्र सरकारच्या महागाईविरोधात प्रमुख मान्यवर मंडळीने मार्गदर्शन केले.

 कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर देशमुख व आभार प्रदर्शन प्रतापराव देशमुख, सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले.

लूंबिनी विहार मुदखेड येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महिलांची आदरांजली!

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड तालुका / प्रतिनिधी

 दि.६ रोजी मुदखेड येथील लूंबिनी नगर स्थित लूंबिनी बौध्द विहारात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरी निर्वाण दिनाच्या निमित्ताने येथील महिलांनी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

या वेळी भाजपच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस केतकी चौधरी,बहुजन वंचित आघाडीच्या जिजाबाई चौदंते,अशाताई चौदंते, सरपंच अर्चना हौसरे,गंगासागर बाई चौदंते,अरुणा प्रवीण गायकवाड,प्रियंका कमलेश चौदंते,स्नेहा चौदंते,तक्षशीला चौदंते, सोनी जोंधळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी केतकी चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितलं की,६ डिसेंबर हा दिवस म्हणजे सबंद मानव जातीला दुःखात लोटाणारा दिवस आहे. या दिवशी आपण एका रत्नाला मुकलो आहोत. म्हणून या दिवशी आपण महापरिनिर्वाण दिवस पाळतो असे सांगितले.

या वेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून दीप आणि धूप प्रज्वलीत करून समुदाईक रित्या त्रिसरण  पंचशील ग्रहण करण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन मिनिटाची मौनांजली वाहून, अमर रहे!अमर रहे!!डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!च्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




लोकप्रिय बातम्या