मुदखेड तालुका / प्रतिनिधी
मौल्यवान वस्तू व्यवहारात नियमाची कडक अंमलबजावणी मुदखेड तहसील मध्ये दिनांक २७ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करणयात आला .कार्यकमा च्या अध्यक्ष स्थानी नायब तहसीलदार संजय नागमवाड हे होते.
प्रस्तावना कक्षाचे महेश गाजुलवाड यांनी मांडली .या प्रसंगी ग्राहक संरक्षण समिती चे मनोज कमटे व माजी उप प्राचार्य सरलाताई भुतडा यांनी आपले विचार मांडले. मौल्यवान सोने चांदी आदी वस्तू व्यवहारात
ग्राहकांची फसवणूक होवु नये या साठी च्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी अशी भुमीका ठरवली. आठवडी बाजार सह मार्केट मधील विक्री दुकानात शासनाने वजन माप योग्य आहेत का ? तसेच दाळ आदी अन्न धान्ये शुद्ध आहेत का ? या कडे शासकीय यंत्रणा चे सतत लक्ष पाहिजे अशी मागणी आली. मुदखेड तालुका पुरवठा विभाग प्रमुख नायब तहसीलदार जोगदंड यांनी ग्राहक हित साठी व संरक्षण साठी तळमळीने कार्य करणारे यांच्या मागणी कडे शासकीय यंत्रणा लक्ष देते.वरिष्ठ पातळीवर आज च्या कार्यक्रम चा अहवाल पाठवु आणि ग्राहक हित ठेवले जाईल असे स्पष्ट केले. आभार मानले.
मंडळ अधिकारी कऱ्हाळे पाटील, बारडचे लाठकर , पुयड पाटील मुगटकर , तलाठी मगरे , हैबते मॅडम आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा