संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधानाचे वितरण

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

 भारतीय राज्यघटनेस पंचाहत्तर वर्षे पूर्ण होवून या प्रजासत्ताक दिनी शहात्तरावे वर्ष पूर्ण झाले. जगातील लोकशाही देशामध्ये भारतीय लोकशाही अबाधित ठेवण्याचे बहुमूल्य योगदान भारतीय संविधानाने केले आहे. हे संविधान प्रत्येक भारतीयांच्या उर्जेचा स्त्रोत आहे. या स्त्रोतास घरोघरी पोहचविण्यासाठी आणि संविधान प्रत्येक घरात असावे म्हणून विष्णुपूरी शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे यांनी या प्रजासत्ताक दिनी मान्यवरांसह सामान्यजनास सुध्दा राज्यघटनेची प्रत स्व-खर्चातून भेट म्हणून प्रदान केली आहे.

     या संविधान वितरण कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ मनेश बी.कोकरे,संचालक एस.जी.एस.अभियांत्रिकी महाविद्यालय यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ संत बाबा हरजिंदरसिंगजी,मा.आ.मोहनराव हंबर्डे,भार्गव करिअर अकँडमिचे भार्गव विजयकुमार राजे,  विष्णुपूरीच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती संध्या विलासराव देशमुख हंबर्डे,उपसरपंच अर्चना हंबर्डे,डॉ संजय देठे,डॉ अभिजीत नांदेडकर,साहेबराव हंबर्डे,माणिक हंबर्डे, रामचंद्र शेंबोले,माजी सरपंच के.डी.देशमुख,बाबाराव हंबर्डे, केशव ठाकूर विश्वनाथ हंबर्डे, संतोष बारसे,मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांची उपस्थिती लाभली होती.

         सुरुवातीस विलास हंबर्डे यांनी संविधानाचे महत्त्व विशद करुन उपस्थितांना राज्यघटनेची प्रत देवून सन्मान केला. यावेळी डॉ कोकरे यांनी संविधान निर्मिती प्रक्रियेची उपयुक्त माहिती देत संविधानाची आवश्यकता पटवून दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.खदीर यांनी केले तर आभार उज्ज्वला जाधव यांनी व्यक्त केले. राज्यघटनेच्या अमृत महोत्सवाचा योग साधत हा अभिनव उपक्रम राबविल्याबाबत विलास हंबर्डे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडून शैक्षणिक सहलीचे आयोजन

 संपादक आशिष मुगटकर

                   पुण्याकडे रवाना झाले ७५ विद्यार्थी

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

दि.२१ रोजी राष्ट्रीय अविष्कार योजने अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षण विभाग, नांदेडच्यावतीने विविध  स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी ठरलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय, एनएमएमएस, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत यश मिळवलेल्या ७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सहलीस आज  मंगळवार दिनांक २१ जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी शुभेच्छा देत सहल रवाना केली आहे.

       मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना सहलीचा आनंद घेत शिक्षणाचा नवा अनुभव घेण्याचा संदेश दिला. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याचे आवाहन केले. तसेच अशा शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग भविष्यात कसा होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केले.

        सहलीचे नियोजन श्री समर्थ हॉलिडेचे अजयकुमार शहाणे, युवराज व वैभव यांनी केले असून या सहलीत पिंपरीचा सायन्स पार्क, ऐतिहासिक शनिवारवाडा, लाल महाल यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी प्रविणा मांदाळे, बाबुराव जाधव, संजय भालके, सुवर्णा बामनपल्ले, आशालता स्वामी, संजय गुजरवाड, आकाश गाडगेराव, प्रविण सूर्यवंशी व संतोष पांचाळ यांनी घेतली आहे.

        विद्यार्थ्यांना दररोजच्या सहलीची दैनंदिनी लिहून निबंधवजा अहवाल तयार करण्याचे मार्गदर्शनही देण्यात आले आहे. ही सहल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

नागार्जुना पब्लिक स्कुलचा गौरव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भरीव सहकार्य

 संपादक आशिष मुगटकर

नांदेड जिल्हा प्रतिनीधी 

दि.१६ रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व ०८७ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये संपन्न झालेल्या निवडणूक काळात जिल्हाप्रशासनास नागार्जुना पब्लिक स्कुल ,कौठा,नांदेड या शाळेने निवडणूकीच्या प्रक्रियेसाठी तथा मतदान अधिकारी-कर्मचारी यांच्या संपूर्ण प्रशिक्षणासाठी शाळेची इमारत, परिसर,सर्व सुविधा, साधनसामग्री, डिजिटल व्यवस्था आणि मनुष्यबळ पुरविले होते. 

   अशा सर्व बाबींचे भरीव सहकार्य केल्यामुळे शाळेस गौरव सन्मानपत्र देवून अभिजीत राऊत, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या हस्ते नुकतेच जिल्हाप्रशासन कार्यालयात सन्मानित करण्यात आले. डॉ सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी ०८७ विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, नांदेड यांच्या संकल्पनेतून नितेशकुमार बोलोलू,नायब तहसीलदार यांनी लेखन केलेले सुबक गौरव सन्मानपत्र तयार करण्यात आले होते. यावेळी अभिजीत राऊत यांनी असा उपक्रम राबविल्याबद्दल अभिनंदन करुन शाळेचे कौतुक करुन आभार व्यक्त केले आणि भविष्यात असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले. 

        सदरील गौरव सन्मानपत्र नागार्जुना शाळेचे सचिव  केशव गड्डम,प्रिसिंपाँल प्रा.शैला आर. पवार, लेखाविभाग प्रदीप पवार, सहसचिव श्रीकांत गड्डम,संचालिका श्रीमती दुर्गा श्रीकांत गड्डम,प्रशासनिक कार्यवाह मनोज महाराज, सुशील माळवतकर व मोईन खान यांनी स्विकारले. यावेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलोलू,प्रशिक्षण कक्ष सदस्य संजय भालके,राजेश कुलकर्णी व मकरंद भालेराव यांची उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सेवानिवृत्त राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक आर.जी.कुलकर्णी यांनी केले तर आभार एस.व्हि.भालके यांनी व्यक्त केले.

मोफत आरोग्य रोगनिदान शिबिरात सातशे रुग्नांची तपासणी

 संपादक आशिष मुगटकर

मोफत पाचशे चश्मे व औषधी वाटप : गोडसे परिवाराचा अभिनव उपक्रम

मुदखेड प्रतिनिधी 

            मुदखेड नगरीत  स्व. राजमनीबाई विश्वनाथराव गोडसे  यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य रोगनिदान  शिबिरात सातशे रुग्णांची तपासणी करण्यात आली असून पाचशे रुग्नांना मोफत चष्म्यांचे तसेच औषधींचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून गोडसे परिवाराच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा अभिनव उपक्रम राबविला जात असून कौतुकास्पद ठरला आहे 

            माजी उपनगराध्यक्ष बालाजी गोडसे, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कैलास गोडसे, सुरेश गोडसे या भावंडांच्या संकल्पनेतून शहरातील तसेच ग्रामीण भागातील विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक उपक्रम राबविले जातात. स्व. राजमनीबाई गोडसे  यांच्या स्मृतिदिनानिमित्त  दि. 4( शनिवार) महाआरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोडसे परिवाच्या वतीने प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सामूहिक अभिवादन करण्यात आले आहे. काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर, काँग्रेस कमिटीचे तालुका कार्याध्यक्ष मोहम्मद गौस, धोरन व संशोधन विभागाचे अध्यक्ष माधव हामंद, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव देवदे, शेख करीम खाँ साहब, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष  मुजीब पठाण, सूर्यकांत चौदंते, अविनाश चौदंते, गोविंद कालनी, शंकर राठी, केशवराव कदम, अतिक अहमद, आकाश सोनटक्क, संजय बोकेफोड, वेदांत शेवटे, बाळुतार शेट्टे, सुमित गोडसे, साई गोडसे, गणेश गोडसे, इमरान मच्छिवाले, गोविंद गोडसे, लक्ष्मण शहाने, शिवानंद देवके, यशवंत रनखांबे, गोविंद माळकोठे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

       ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ वैशाली एमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली   महाआरोग्य रोगनिदान शिबिरात नेत्ररोग, मधुमेह, रक्तदाब आदी रुग्णांची तपासणी करण्यात आली. हिंद लॅब यांच्याकडून रुग्णांचे रक्त तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नागशेट्टीवार, डॉ प्रदीप उमनवार, डॉ गोवर्धन तातेवर, शुभम कांबळे, प्रदीप कांबळे  यांनी रुग्णांची तपासणी केली. अशोक मामीडवार, राम पाचपोळे, विशाखा कनकुटे, साहेबराव खंडेलोटे, दीक्षा कांबळे, गजानन गोरे या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. 

गोडसे परिवाराने दरवर्षी लोकसेवेचा दृष्टीकोन समोर ठेवून विविध उपक्रम राबविले असून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या उपक्रमास शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.-  कैलास गोडसे( काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मुदखेड )

लोकप्रिय बातम्या