निवघा येथे सार्वजनिक खुली व्यायाम शाळा मंजूर प्रा. संदिप पवार निवघेकर यांच्या पाठपुराव्याला यश.

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड तालुका प्रतिनिधी 

            मुदखेड तालुक्यातील निवघा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शिफारसीने व्यायाम शाळा विकास अनुदान योजने अंतर्गत जिल्हा क्रिडा विभागामार्फत खुली व्यायाम शाळा उभारणीस मंजूरी देण्यात आली असून यामुळे निवघा व परिसरातील नागरिकांना फायदा होणार आहे.

     निवघा येथे शिक्षणासाठी खांबाळा,सरेगाव, धनज आदि गावचे विद्यार्थी येत असून शेतकरी व कष्टकरी जनतेच्या मुला-मुलींना पोलीस भरती, शारीरिक तयारीसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रा. संदिप पवार निवघेकर यांनी खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांना निवेदन देऊन वेळोवेळी जिल्हा क्रिडा कार्यालयाकडे पाठपुरावा करून गावहितासाठी ही खुली व्यायाम शाळा मंजूर करून आणल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत असून भविष्यात मुदखेड तालुक्यातील गावागावात खुली व्यायाम शाळा उभारणीसाठी सहकार्य करू त्यासाठी प्रत्येक गावातील तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा. संदिप पवार निवघेकर यांनी केले.

     गावात खुली व्यायाम शाळा मंजूर केल्याबद्दल खासदार अशोकराव चव्हाण साहेब व प्रा. संदिप पवार यांचे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्रदादा चव्हाण,भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर,कैलास दाड, बाळासाहेब देशमुख बारडकर, दत्तू देशमुख, लक्ष्मण जाधव जवळेकर, निलेश देशमुख, उद्धवराव पवार,उत्तमराव लोमटे,कैलास आवातीरक, म्हैसाजी भांगे, निवघ्याच्या सरपंच गोदावरीबाई थोरात,माजी सरपंच मनिषा एडके,पुंडलिक पवार, सुभाषराव पवार,अशोकराव पवार,देविदास कांचनगिरे, लखन कारले,हनुमंत पवार, नारायण नरडेले, बालाप्रसाद पवार, शंकर बापुराव पवार, कामाजी पवार, संभाजी टेकाळे, कल्याण पवार,शेख निझाम,गंगाधर राजेवार,मारोतराव गंगातीरे, मारोतराव पवार, ओमप्रकाश पवार यासह ग्रामस्थांनी कौतुक करून आभार मानले.

पीएम श्री जि. प. हा. विष्णुपुरी येथे एनडीआर तर्फे आपत्ती व्यवस्थापन विषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

 संपादक आशिष मुगटकर

 नांदेड जिल्हा प्रतिनिधी 

                आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआर एफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स चा टिमने प्रत्यक्ष डेमो घेऊन प्रत्याक्षीक ६ ऑक्टोबर रोजी शाळेच्या प्रांगणात सादर केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये लातूर विभागात शैक्षणिक वर्ष २०२५ मध्ये प्रथम आलेली शाळा असून, नेहमीच विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम या शाळेमध्ये राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत आज दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नांदेड, किशोर कोरे  व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ गौरव तिवारी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या प्रयत्नाने प्रस्तुत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स च्या माध्यमातून बटालियन नंबर ८ चैका टीमने त्यांचे टीम प्रमुख  राजेंद्र कांबळे  या टीमचे यांच्या पि.आय. मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावीच्या दहावीच्या  जवळपास बाराशे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात प्रत्यक्ष डेमो घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. भारत सरकारने २००६ यावर्षी एन डी आर एफ नावाची एक स्वतंत्र यंत्रणा उभा करून याचे आठ बटालियन स्थापन केले होते. नंतर याचा विस्तार करून १६ बटालियन करण्यात आले, प्रत्येक बटालियनचे स्वतंत्र १८ टीम असतात आणि यांच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये ज्या ठिकाणी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी या उद्देशाने एनडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे काम केले जाते. 

     भूकंप, पूर परिस्थिती, इत्यादी काळामध्ये नागरिकांना मदत करण्याचे काम यांच्या माध्यमातून केले जाते. पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी या ठिकाणी बटालियन नंबर ५ टीमने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना जवळपास दोन तास याची प्रशिक्षण देऊन या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने स्वतःला सुरक्षित ठेवता येते आणि इतरांचे जीव कसा वाचवता येते या संदर्भामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवले. 

              या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजूभाऊ हंबर्डे, माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबरावजी हंबर्डे,गोविंदराव हंबर्डे,विश्वनाथरावजी हंबर्डे,माधोजी भारती,माणिकरावजी हंबर्डे, भगवानराव हंबर्डे,राजेश हंबर्डे,व ग्रामसेवक संजय कानोडे,मंडळ अधिकारी कानोडे ,यांची विशेष उपस्थिती होती,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.खदीर यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वलाताई जाधव ,यांनी करून या टीमचे विशेष आभार मानले.

लोकप्रिय बातम्या