बारड / प्रतिनिधी
दि.११ रोजी केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात जनजागरण अभियानाची व सभासद नोंदणी कार्यक्रमाची सुरुवात बारड येथे करण्यात आली.
त्याप्रसंगी मुदखेड तालुका जनजागरण प्रभारी तिरुपती पा. कोंढेकर, नांदेड जिल्हा ओबीसी विभाग अध्यक्ष रोहिदास जाधव, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उद्धवराव पवार निवघेकर, मुगट जि.प. सदस्या प्रतिनिधी तथा संचालक भीमराव पा. कल्याने, मुदखेड पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव गादीलवाड, भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मारोती किरकण, मुदखेड शहराध्यक्ष माधवराव कदम, प्रमुख वक्ते बालाजीराव गाढे, महाराष्ट्र ओबीसी सेलचे सरचिटणीस लक्ष्मणराव जाधव, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील वैजापूरकर, दत्तराव अवातिरक, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामराव खांडरे डोणगावकर, मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते संदीप पवार, विलासराव गव्हाणे माजी सरपंच, जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, माजी उपसभापती सुनीलराव देशमुख, किशोरराव देशमुख, प्रतापराव देशमुख, बारड जि.प. सदस्या प्रतिनिधी संतोष वारकड, प्रभाकर भीमेवार, दिलीपराव कोरे,संजयराव मुलंगे, पत्रकार नामदेव बिचेवार, नरसिंग आठवले, अशोकराव देशमुख, डॉ. चंद्रप्रकाश शिंदे, बंटी कांबळे, भोकर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष धबडगे, राजेंद्र खटिंग, अशोकराव मुंगल, संभाजी लोकरे, दादाराव पुयड, दत्तराव हामदे, विश्वंभर पुयड, श्रीनिवास महादवाड, बारड गणातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकारच्या महागाईविरोधात प्रमुख मान्यवर मंडळीने मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक किशोर देशमुख व आभार प्रदर्शन प्रतापराव देशमुख, सूत्रसंचालन संदीप पवार यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा