मुदखेड तालुका / प्रतिनिधी
दि.६ रोजी मुदखेड येथील लूंबिनी नगर स्थित लूंबिनी बौध्द विहारात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरी निर्वाण दिनाच्या निमित्ताने येथील महिलांनी आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या वेळी भाजपच्या महिला आघाडी जिल्हा सरचिटणीस केतकी चौधरी,बहुजन वंचित आघाडीच्या जिजाबाई चौदंते,अशाताई चौदंते, सरपंच अर्चना हौसरे,गंगासागर बाई चौदंते,अरुणा प्रवीण गायकवाड,प्रियंका कमलेश चौदंते,स्नेहा चौदंते,तक्षशीला चौदंते, सोनी जोंधळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी केतकी चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितलं की,६ डिसेंबर हा दिवस म्हणजे सबंद मानव जातीला दुःखात लोटाणारा दिवस आहे. या दिवशी आपण एका रत्नाला मुकलो आहोत. म्हणून या दिवशी आपण महापरिनिर्वाण दिवस पाळतो असे सांगितले.
या वेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना पुष्प व पुष्प माल्या अर्पण करून दीप आणि धूप प्रज्वलीत करून समुदाईक रित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दोन मिनिटाची मौनांजली वाहून, अमर रहे!अमर रहे!!डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!च्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा