बारड / प्रतिनिधी
दि. २६ रोजी मुदखेड तालुक्यातील बारड येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असणा-या आपल्या भारत देशात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली.अनेेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधान स्वीकारून ते देशाला अर्पण केले. ३९५ कलमे, २२ भाग,८ परिशिष्ट असलेल्या भारतीय संविधान या राष्ट्रीय ग्रंथाची अंमलबजावनी २६ जानेवारी १९५० पासुन करण्यात आली.
भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक आहे.जे आपल्याला आर्थिक आणि वैयक्तिकरित्या मजबुत बनवते.देशाला एकता आणि विकास क्षमता प्रदान करते.संविधानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे.भारत देशाला धर्मनिरपेक्ष गणराज्य म्हणुन घोषित करण्यात आले आहे.
भारतीय संविधान आणि घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणुन साजरा केला जातो.
याप्रमाणे आज दि २६ नोव्हेंबर २०२१ शुक्रवार रोजी श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, बारड येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी प्राचार्य हेमंत इंगळे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधान प्रतीमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक डॉ पंजाबराव शिंदे, प्रा माने पी पी, प्रा सावंत एन एल, प्रा कैलाश कपाटे, प्रा कैलाश खानसोळे, प्रा मारोती पवार, प्रा मनोहर ओसावर, प्रा बापू केंद्रे, प्रा गोकुळ चव्हाण, प्रा संभाजी रावते,प्रा प्रशांत कपाळे, प्रा सौ ज्योत्स्ना पवार, संतोष पवार, प्रकाश फाजगे,कमलबाई बुकतरे आदी उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा