जि.प.हा.विष्णुपुरी शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा




मुदखेड तालुका / प्रतिनिधी

     दि. २६ रोजी संपुर्ण भारतात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने आज विष्णुपुरी येथील प्रशालेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मितभाषी, संयमी व सुसंस्कृत मुख्याध्यापक मा.एन.एन.दिग्रसकर हे होते. 

या प्रसंगी  संविधान  प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मु.अ. दिग्रसकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे म्हणाले की, संविधान हे जगातील एकमेवाद्वितीय असा ग्रंथ असून यामध्ये सर्वधर्मसमभावचे तत्त्व पाळण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आवर्जून संविधानाचे वाचन व चिंतन करणे आवश्यक आहे.



      या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभारयुक्त मार्गदर्शन इंग्रजी विषयाचे जेष्ठ-तज्ज्ञ माध्यमिक शिक्षक एम.ए.खदिर यांनी केले. यासमयी सर्व शिक्षकांनी प्रतिमेचे पूजन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या