शिक्षक आमदार यांनी लक्ष घालण्याची मागणी !...
संपादक आशिष मुगटकर
मुदखेड तालुका / प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडून राज्यातील प्राथमिक,माध्यमिक,उच्चमाध्यमिक वअध्यापक विद्यालयातील सर्व पात्र शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या आयोजनाची प्रक्रीया सुरुवात झाली या प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांकडुन प्रत्येकी दोन हजार रु. प्रशिक्षण शुल्क सक्तीने आकारल्या जात आहे त्यामुळे हे प्रशिक्षण परिषद आहे का सक्त वसुली संचालनालय आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शिक्षकांमधुन उमटत असुन या प्रकरणी शिक्षक आमदार यांनी लक्ष घालण्याची मागणी बहुजन शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्यांनी एका निवेदनाद्ववारे केली आहे.
राज्यातील ज्या शिक्षकांची सेवा १२वर्ष २४ वर्ष सलग झाली आहे अशा पात्र शिक्षकांसाठी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून वरिष्ठ व निवड वेतनश्रणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी आँनलाइन नोंदणी सुरुवात केली आहे.मागील ५ ते ६ वर्षापासून हे प्रशिक्षण घेणे बंद केले होते. त्यामूळे अनेक शिक्षक या श्रेणीपासून वंचीत आहेत म्हणुन अनेक शिक्षक संटनेकडुन शिक्षक आमदार व पदविधर आमदार यांना वेळोवेळी निवेदने देवुन प्रशिक्षण घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा अशी विनंती केली होती.त्यामूळे शिक्षक आमदार विक्रम काळे व पदविधर आमदार सतिश चव्हाण यांनी सर्वच संघटनेच्या निवेदनाचा स्विकार करुण या प्रकरणी लक्षदेवून प्रशिक्षण घेण्यासाठी शासना कडे पाठपुरावा केला.त्याचाच परीणाम की काय राज्य प्रशिक्षण परिषदेने २२ नोव्हेंबरला एक पत्रक काढून पात्र शिक्षकांची नोदणी सुरु केली आहे.
मात्र पत्रातील मूद्दा क्र.१४ नुसार ज्यांना प्रशिक्षण घ्यावयाचे आहे त्या पात्र शिक्षकांनी प्रत्येकी २००० रु. आँनलाईन परिषदेकडे जमा करण्याची अट टाकली आहे.या अटीमुळे राज्यातील शिक्षक मात्र अचंबीत झाले असुन शासनप्रती आपला रोष प्रगट करत आहेत कारण या पुर्वी याच श्रेणीचे प्रशिक्षण राज्यमंडळ जिल्हास्तरावर अगदी निशुल्क घेत होते शिक्षकांकडून कोणतीच फी आकारत नव्हते मग प्रशिक्षण परिषदेला काय गरीबी आली की शिक्षकांकडून सरसगट २००० रु सक्तीने वसुल करत आहे.मग हे काय प्रशिक्षण केंद्र आहे का सक्तवसुली संचालनालय आहे हाच प्रश्न राज्यातील शिक्षकांना पडला आहे व शासनप्रती रोष निर्माण होत आहे म्हणुन हे प्रशिक्षण निशुल्क घेण्याच्या मागणीचे निवेदन राज्य शासन,आमदार विक्रम काळे व पदविधर आमदार सतिश चव्हाण यांना दिल्याचीमाहीती माजी मंडळ सदस्य यशवंत कांबळे यानी दिली आहे.या निवेदनावर बहुजन शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रोहीदास कांबळे,टि पी वाघमारे,वसंत दिग्रसकर शंकरराव हानमंते,शेख नजिर,अरविंद काळे,नागोराव ढवळे व इतर पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा