जि.प.हा.विष्णुपूरी शाळेत चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न.
नांदेड जिल्हा / प्रतिनिधी
दि.१८ रोजी जि.प.हा.विष्णुपूरी प्रशालेत अत्यंत उत्साहाने आझादी का अमृत महोत्सव निमित्त चित्रकला व निबंध स्पर्धा संपन्न झाल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मुख्याध्यापक मा.एन.एन.दिग्रसकर तर प्रमुख अतिथी म्हणून मा.उदय हंबर्डे हे होते.तसेच मा.शैलजा बुरसे,मा.देवशेट्टे,मा.वैशाली कुलकर्णी, मा.पटवे,मा.जयश्री शिंदे, मा.उज्ज्वला जाधव, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी,विकास दिग्रसकर,मा.पंचफुला नाईनवाड,पद्माकर देशमुख व सर्व शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी मा.मु.अ.यांचे स्वागत उदय हंबर्डे यांनी पुष्पगुच्छ देवून केले. हंबर्डे यांनी प्रास्ताविक मार्गदर्शनातून आझादी का अमृत महोत्सव विषयी प्रकाश टाकला व स्पर्धेचे विषय,नियम याबाबी स्पष्ट केल्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेश कुलकर्णी यांनी केले तर आभार शैलजा बुरसे यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेत शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग नोंदविला.राष्टगाणाने सांगता करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा