मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
मुदखेड शहरातील मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्रातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेच्या क्वार्टर गार्डला आज अभिवादनानंतर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना ध्वजारोहण, केंद्रीय प्रशिक्षण संस्थेचे कमांडंट लीलाधर महरणीया शुभेच्छा दिल्या, राज्यघटनेचे महत्त्व सर्वांना माहिती करून दिली आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशात सर्व अधिक पदके देऊन सन्मानित केल्याची माहिती दिली
केंद्रीय प्रशिक्षण दलाला सर्वाधिक पदके देण्यात आली ज्यात कीर्ती चक्र ०४, पीपीएमजी ०१, पीएमजी ६८ अशी मेडल सरकार ने दिली अशी पुरस्कृत माहिती दिली.
पुढे म्हणत, देशातील विविध राज्यांत तैनात असलेले पोलिस कर्मचारी आणि प्रजासत्ताक दिनी कीर्ती चक्र, पीपीएमजी, पीएमजी पदके प्रदान केलेल्या केंद्रीय अर्धसैनिक दलातील शूर अधिकारी आणि जवानांची नावे वाचून दाखविली
यासह, प्रशिक्षण संबंधित उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन २०१९-२०२० या वर्षात या संस्थेत तैनात असलेले कमांडंट बी वीर राजू, उप-कमांडंट कपिल बेनीवाल आणि उपनिरीक्षक जीडी नरखेडे दत्तात्रय यांना गृहमंत्री उत्कृष्ट प्रशिक्षण पदके प्रदान करण्यात आली असल्याची माहिती आणि शुभेच्छा दिल्या व पदक मिळवल्या बदल अभिनंदन केले
वरील कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व अधिकारी, अधीनस्थ अधिकारी, इतर सैनिक व प्रशिक्षणार्थी यांना मिठाई वाटप करण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा