मुदखेड /शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
मुदखेड शहरातील महादेव गल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र याठिकाणी प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला असून ज्येष्ठ नागरिक शंकराव पिन्नलवार यांच्या हस्ते सकाळी ७:४५ वाजता ध्वजारोहण करण्यात आले आहे.
येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात महिलांसाठी शिवण क्लासेस तसेच लहान मुलांची बालवाडी कामगार कल्याण केंद्र चे उपसंचालिका सौ. संध्या आडगावकर , केंद्राचे संचालक व्ही बी मेडके, लहान मुलाची शिक्षिका अरुणा महिनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र चालत आहे.
कोरोना चे नियम पाळत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी जेष्ठ नागरिक शंकरराव पिन्नलवार, केंद्रीय राखीव पोलीस बलाचे आनिरुद्र स्वामी, बालवाडी कामगार कल्याण केंद्र चे उपसंचालिका सौ. संध्या आडगावकर , केंद्राचे संचालक व्ही. बी. मेडके, शिक्षिका अरुणा महिनाळे, कर्मचारी एम. एस. राजभोज यांच्यासह आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा