शिवसेना कार्यकर्ते बारड सर्कल कडून पोलीस निरीक्षक बारड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली मागणी.
बारड/प्रतिनिधी
बारड : दिवशी बु.ता.भोकर येथील आदिवासी मन्नेरवारलु समाजातील ५ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार खून करणाऱ्या आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा द्या. या मागणीचे निवेदन शिवसेना कार्यकर्ते सर्कल प्रमुख विजय देशमुख यांनी बारड पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी.नांदगावकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या महाभयंकर घटनेचा निषेध युवा संघटना,विविध पक्ष कार्यकर्त्यांन कडून निषेध नोंदवण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना सर्कल प्रमुख विजय देशमुख, ग्रा पं सदस्य प्रतिनिधी शरद कवळे ,युवा कार्यकर्ते सचिन बने, पवन टिप्परसे, दिनेश गुंडे, मनसे सर्कल प्रमुख रूपेश वाघमारे, योगेश सुर्यवंशी, माधव बने,गजानन देशमुख, संभाजी पानबुडे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा