जयंतीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला मुगट सर्कल पासून सुरुवात.
मुगट/वार्ताहार
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दि. २३रोजी हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या९५व्या जयंती निमित्य भोकर विधानसभेतील मुदखेड तालुक्यातील मुगट सर्कल पासून शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
मुगट येथील मुख्य रस्त्यावर गावातील युवा सेना व शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती बरोबरच शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाला सुद्धा सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पा.तिडके बोंढारकर, भोकर विधानसभा शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, सिताराम महाराज, मोतीगीर महाराज यांच्या हस्ते स्व.बाळासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब देशमुख यांनी जमलेल्या युवा सैनिकांना मार्गदर्शन केले.शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पा. तिडके व नेते बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला या वेळी सुरुवात करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजित शिवसेना सभासद नोंदणी अभियानाला मुगट व परिसरातून आलेल्या युवा शिवसेनी का कडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून सायंकाळ पर्यंत 1000 च्या वर शिवसेना सभासद नोंदणी या ठिकाणी झाली असे शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना भोकर विधानसभा प्रमुख विश्वंभर पाटील पवार निवघेकर, मुदखेड शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील कुरे, मा.तालुका प्रमुख माणिक लोमटे, मुदखेड पंचायत समिती सदस्य पिंटू पाटील वासरीकर, मुदखेड शहर प्रमुख सचिन माने- सचिन चंद्रे माजी शहरप्रमुख अविनाश झमगडे, संजय पा. गाडे, भीमराव पा. कल्याणे, माधवराव पा. कल्याणे, धाराजी पा. पवार , दादा पाटील, रामजी पा.कल्याणे,उप तालुका प्रमुख , गोविंदराव शिंदे, गुलाबराव देशमुख, आनंदराव देवापूरकर, उत्तम खवास, बालाजी पा. शिंदे, शिवसेना शाखाप्रमुख मंचीकराव पा.कल्याणे, शिवसेना तालुका संघटक विलास पा. कल्याणे, रमेश पा.कल्याणे, गणपतराव पा. कल्याणे, शामराव पा.कल्याणे, प्रशांत पा. कल्याणे, विकास पा. कल्याणे, एकनाथ पा.कल्याणे, सतीश पा. कल्याणे, राम पा.कल्याणे, मयुर पा. कल्याणे, शिवानंद कल्याणे,माधव पा. कल्याणे,शुभम,पा.कल्याणे, तुकाराम हाटकर, धनंजय जोशी, ज्ञानेश्वर गजेले, तसेच अनेक गावातील व परिसरातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा