दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीला मोठे भगदाड कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
संपादक आशिष मुगटकर
![]() |
| नालीचे काम निकृष्ट :- बारड येथे होत असलेल्या नाली बांधकामला दोनच दिवसात भगदाड पडलेले पाहताना बारडचे गावकरी. |
मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीख अहेमद
बारड-भोकर राष्ट्रीय महामार्ग वरील नाली बांधकामाचे पितळ उघडे पडले असून बारड बस स्टँड परिसरात असलेल्या मुख्य मार्केट समोरील दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नाली काम निकृष्ट झाल्याने नाली वरील स्लँपला मोठे भगदाड पडल्याने काम मोठ्या प्रमाणात निकृष्ट केल्या जात असल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत निकृष्ट कामाची पाहणी करून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यातील दोषी अधिकारी व कंट्रक्शन वर कारवाई करण्याची मागणी यावेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे
गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रीय महामार्ग वरील कामे संथ गतीने सुरू असून अत्यंत निकृष्ट पणे कामे होत आहेत बारड परिसरात रस्त्यावरील दोन किलोमीटरचे नाली कामे सुरू असून नाली कामावर अल्प गजाळी सिमेंटचा वापर कमी करून पाण्याची क्युरिंग न करता बोगस पणे नाली काम सुरू असल्याने या कामावर लगेच तडे पडत असल्याचे दिसून येत आहे तर रंगीत अधिकाऱ्याला पाठीशी घेत या निकृष्ट कामाची बिले पण लगेच सादर करण्यात येत असल्याचे समजले आहे.
तर चक्क बस स्थानक परिसरातील बाजार पेठेत दोन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या नालीवरिल स्लँपला मोठे भगदाड पडल्याने कामावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी अरुंद रस्ता तसेच निकृष्ट होणाऱ्या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट देऊन याबाबत तक्रार व्यक्त केली होती त्यांच्या सुचनेनुसार त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी कामाला भेट देऊन काम दर्जेदार तसेच ग्रामस्थाच्या म्हणण्यानुसार करणार असल्याचे आश्वासन दिले होते परंतु संबंधित अधिकारी आणि कंट्रक्शन यामध्ये साटेलोटे असल्याचे बोलले जात असून निकृष्ट कामाकडे काना डोळा करण्यात येत असून पुढे पाठ मागे सपाट म्हणण्याची वेळ राष्ट्रीय महामार्गावरिल होणाऱ्या नाली कामाबाबत म्हणण्याची वेळ आली आहे.
यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या भगदाडाबाबत काँग्रेस जिल्हा कर सल्लागार उत्तमराव लोमटे सामाजिक कार्यकर्ते नरसिंग आठवले,यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे केलेल्या निकृष्ठ कामाची तक्रार केली असुन कोटी रुपये खर्च करण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील कामावर शासनाच्या तिजोरीतील कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत परंतु या ठिकाणी बोगस रित्या काम करून अक्षरशा शासनाच्या दर्जेदार कामाला शह देत कोटी रुपयांची कामे बोगस रित्या होत असल्याने या राष्ट्रीय महामार्गावरील होणाऱ्या बोगस कामाची चौकशी करून संबंधित कंट्रक्शन व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी याची चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. निकृष्ट होत असलेल्या कामाबाबत तसेच बोगस रित्या सुरु असलेल्या कामावर संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा