मुगट ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार देवा दारी

 (नारळ फोडून केला प्रचाराचा श्रीगणेशा)



मुगट/ प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणूक २०२१ जसजशी जवळ येत आहे तसा तसा या निवडणुकीच्या प्रचाराचा रंग चांगलाच दिसून येत आहे. मुगट येथील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात तीन पॅनल उतरले आहेत. त्यात दोन पॅनल काँग्रेसच्या गटाचे तर एक पॅनल भाजपाच्या युवा चेहऱ्याचे आहे. काँग्रेसच्या मुगटच्या माझी सभापती सौ. शोभाताई मुंगल यांचे पती श्री गोपीनाथराव मुंगल हे शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख आहेत तर नांदेड जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे यांचे पती श्री भीमराव कल्याणे हे ग्राम विकास पॅनलचे प्रमुख आहेत. गावातील भाजपाचा युवा चेहरा श्री. विलासराव कल्याणे यांच्या नेतृत्वाखाली श्री. आत्माराम महाराज ग्राम विकास पॅनल तयार करण्यात आले आहे. तर अनेक वार्डात अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावून पाहणार  आहेत. 
वार्ड क्रं.३ मधील अपक्ष उमेदवार रामेश्वर कल्याणे या युवा चेहऱ्याला मतदारांचा कौल अधिक दिसून येत आहे.
गावं निवडणूकीच्या रंगात चांगले रंगत आहे. गावात रात्रीला अनेक ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे.निवडणूकीचा अधिक फायदा गावातील तळीरामांना अधिक दिसून येत आहे. तळीरामाना आता गावात चांगले दिवस झाले आहे.
गावातील पॅनल कडून ढोल ताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन दाखवत प्रचाराचा श्रीगणेशा गावातील अनेक मंदिरांना नारळ फोडून प्रचार सुरू करण्यात आला आहे.
 उमेदवार आपल्या वार्डातील मतदारांच्या घरोघरी भेटी देण्यास सुरुवात केली आहे.मतदारांना अनेक आश्वासने दिली जात आहे.
या निवडणुकीत गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच पुन्हा एकदा आमने-सामने निवडणूकीच्या फडात उतरले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या दोन्ही गटाने पॅनल उभे केले तरी सुद्धा गावातील ही निवडणुक भाजपा विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या