मुदखेड तालुक्यात राजकीय पक्षांच्या अजब कार्यकर्त्यांचा गजब प्रताप कॉंग्रेस सोबत भाजपाचा घरोबा?

 भोकर विधानसभा मतदारसंघातिल तालुक्यातील चित्र


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक राजकिय पक्षाला तळाच्या कार्यकर्त्या पर्यंत पोहचून पक्षाची जाळ मुळ खोलवर रोवन्याची नामी संधी असते.ही संधी म्हणून स्वीकारण्याचे धाडस जे पक्ष संघटन करते त्या संघटनेस उद्याचे राजकिय भविष्य असते हे त्रिकाल बाधित सत्य आहे.हे सत्य जे संघटन समजून घेऊन  आपली विवरचना करेल तेच संघटन उद्याच्या काळी यशवंत ठरेल असेच म्हणावे लागेल.

हा खटाटोप करण्यामागे शुद्ध हेतू हाच की,देशाच्या पातळीवर कॉंग्रेस मुक्त भारताच्या दिशेने भाजपाचे नेतृत्व पराकोटीची मेहनत करत आहे.तर भोकर विधानसभा मतदार संघातिल मुदखेड तालुक्यात मात्र या उलट चित्र सद्याच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जाहीरपणे पहावयास मिळत आहे.

काही लोक स्वत:ला समाज माध्यमांवर स्वंघोषीत भावी आमदार म्हणून घेण्यात येरवी मश्गुल झालेले सर्वश्रूत आहेत.मात्र १५हजार लोक वस्तीच्या गावात,स्वत:कडे भोकर  विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आहे.हे विसरुन होम स्पिचवर आपल्या पक्षाची धुरा सांभाळणे उचित असताना जाहिर पणे पक्ष विरोधी बिगुल वाजवताना दिसून येत आहेत.

 मुदखेड तालुक्यात बारड, मुगट, माळकौठा, निवघा, रोहिपिंपळगाव, डोनगाव,मेंडका,शेंबोली या ग्रामपंचायती उद्याच्या राजकीय आखाड्याच्या शिल्पकार ठरतात.या पैकी बारड ही जवळपास पंधरा हजार लोक वस्तीचे गाव सर्वात जास्त सतरा सदस्य आसलेली ग्रामपंचायत याच ठिकाणी देशात ३०३खासदार राज्यात १०५आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपा विधानसभा अध्यक्षाच्या होम स्पिचवर भाजपा स्वत:चे पॅनल तयार करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे.येवढ्यावरच  न थांबता बंधु प्रेमापोटी कॉंग्रेसच्या पॅनलची धुरा जाहिरपणे खांद्यावर घेण्याची किमया देखील केली आहे.जी व्यक्ती ग्रामपंचायतीचे पॅनल करु शकत नाही.त्या व्यक्तीस भोकर विधानसभचे नेतृत्व कसे पेलावेल?हा प्रश्न जानत्यांना निरुत्तरीत करणाराच नाही का? बाकी गावं यास अपवाद कसे?हा भाजपाच्या अजब कार्यकर्त्यांचा गजब प्रताप आहे असे म्हंटले तर नवल कसले?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या