शहरात घरकुल योजनेतून३८लाख४०हजार रुपयाचे लाभार्थ्यांना वितरण
![]() |
मुदखेड/शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
मुदखेड येथील रेल्वे अंडर ब्रीज चा प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नाने जागा मावेजा साठी १ कोटी ८४ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. अमर राजूरकर यांनी नगरपरिषद येथे धनादेश वाटप कार्यक्रमात बोलत असताना व्यक्त केली आहे.यावेळी शहरातील घरकुल योजनेचे ३८लाख४०हजार रुपयाचे लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रमुख मुदखेड काँग्रेस शहराध्यक्ष माधव पाटील कदम, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जहागीरदार, मुख्याधिकारी रामराजे कापरे ,लक्ष्मण देवदे, संदीप सोनकांबळे करीम खानसाब,बबलू सेठ किराणावाले,विशाल चौदंते, किशोर पारवेकर, संजय आऊलवाड,चांदू चमकूरे,श्याम चंद्रे,रावसाहेब चौदंते, इम्रान मच्छीवाले, उत्तम चव्हाण, जयप्रकाश चौदंते,
पत्रकार संजय कोलते, पत्रकार गंगाधर पाटील डांगे, काँग्रेस अल्प संख्याक विभागाचे साजिद कुरेशी, संचालक मुन्ना चौधरी,रफीक मासालेवाले, इक्बाल कुरेशी, लेखापाल रामेश्वर वाघमारे, नगर अभियंता मोरे, सिद्दीकी, नितीन चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे राजूरकर म्हणाले शहरातील पाणी पुरवठा आराखड्यासाठी ४३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. शहरातील बुद्धविहाराचे काम मार्गी लागले असून १ कोटी रुपयांच्या निधीत विहार उभारणी करण्यात येणार आहे. शहरातील अंतर्गत विकासासाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत खासदार च्या हाती काही नसून निधी देण्याचा पावर नसल्याने मुदखेड वाल्याचा फुकटच्या चहा पीत आहेत हे काही देऊ शकत नाहीत असा खरपूस समाचार भाजप खासदारावर यावेळी राजूरकर यांनी घेतला आहे तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील ५२१ घरकुल साठी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे शहरातील नवीन वस्ती मध्ये विकास कामे करण्याची गरज असल्याने त्यानुसार कार्यकर्त्यांनी शहरातील नवीन वस्त्यांच्या विकासासाठी कार्यशील राहावे तर अधिकाऱ्यांनी आपले अधिकार वापरून शहरातील विकास कामासाठी अडवणाऱ्या वर घाबरून नजाता विकासासाठी प्राधान्य द्यावे असे यावेळी सांगितले.
शहरातील गरजू व जास्तीत जास्त लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेत एकजुटीने काम करत असून शहरात जास्तीत जास्त विकास कामाला प्राधान्य देत असल्याची माहिती यावेळी शहराध्यक्ष माधव कदम यांनी यावेळी सांगितले आहे
तर प्रास्ताविकात नगराध्यक्ष मुजीब अन्सारी जागीरदार यांनी नगरपालिका अंतर्गत विकास कामे सांगितले असून ५२१ घरकुल ची मंजुरी शासनाकडे प्रलंबित असून त्यासाठी प्रयत्न करत असून शहर विकासासाठी निधीची कुठलीच कमतरता नसून प्रभागात विविध विकास कामे करण्यात येत आहेत सहा महिन्यात उर्वरित सर्व कामे पूर्ण करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्र संचालन संजय कोलते यांनी तर उपस्थित नागरिकांना शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी वचन संकल्प पाठन नगर पालिकेचे लेखापाल रामेश्वर वाघमारे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा