युवा पत्रकार सचीनकुमार कांबळे यांचे दुःखद निधन

मुदखेड पत्रकारितेतील उगवला तारा काळाच्या पडद्याआड!

संपादक आशिष मुगटकर


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड येथील युवा पत्रकार सचिन कुमार कांबळे यांचे आज सकाळी हृदय विकारांचा झटक्याने निधन झाले. एक युवा पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

'केसरी' या दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले.पत्रकारिता क्षेत्रात त्यांना आवड होती.त्यांनी याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले.त्यांनी बीजे,एमजे.पर्यत पत्रकारीतेचे शिक्षण नांदेड येथे घेतले.कमी कालावधीत त्यांची ओळख लेखनीतुन दिसून आली.मुदखेड तालुक्यातील निर्भिड पत्रकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली.त्यांनी मुदखेड पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष पद भुषवले.

 त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचे अनेकांशी मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या या अचानक जाण्यामुळे मुदखेड तालुक्यातील पत्रकारात त्यांची उनिव भरुन न निघणारी आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आसुन या दुःखाला सामोरे जाण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो. मुदखेड तालुक्यातील पत्रकार संघा कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या