मुदखेड तालुका प्रतिनिधी
मुुुदखेड ताालुक्यातील बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व स्वा.से.राजाराम बापू माध्य.शाळा बारड यांच्या वतीने २६ जानेवारी ७२ वा भारतीय गणतंत्र दिवस कोविड नियमाचे पालन करून साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य,हेमंत इंगळे व प्रमुख पाहुणे मु. अ. रामकिशन चुब्बेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख, उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन , सचिव रामेश्वर कोरबनवाड , संचालिका सौ.छायाताई संजयराव देशमुख यांच्या सह सर्व संचालक मंडळ, गावातील ज्येष्ठ नागरिक, शाळा व महाविद्याल यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आकांशा मुदखेड व सानिका दाडे यांनी केले तर आभार प्रा. एन. एल.सावंत यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा