नांदेड दि.१५ .भारतीय जनता पार्टीचे नांदेड उत्तर जिल्ह्याचे महामंत्री नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर सदभावना विशेष संपर्क अभियानाच्या जिल्हा संयोजक पदाचा अतिरिक्त भार प्रदेश भाजपाने सोपवीला आहे.
सविस्तर वृत्त असे की, सद्या मराठवाड्यात सामाजिक वातावरण राजकीय दृष्ट्या दूषित झाले असून त्याचा फेक नरेंटिव्ह पसरून लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठी राजकीय किंमत मोजावी लागली होती, ही बाब लक्षात घेऊन सूक्ष्म मागास संघटन बांधणीच्या दृष्टीने भाजपाने आपला राजकीय मोर्चा वळवीला आहे,या अभियानात भाजपाचे प्रत्येक विधानसभा निहाय्य प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळ्या समाजाच्या भेटी घेऊन पक्षाचे ध्येय धोरणे आणि समाज उपयोगी सरकारी योजणांची आठवण बुथ पातळी पर्यंत करून देणार आहेत.
अस्या महत्वपूर्ण अभियानाच्या नांदेड उत्तर जिल्ह्याची प्रमुख जबाबदारी भाजपातील अडीच दशकाचा प्रदीर्घ असा संघटनात्मक अनुभव असलेले नेते प्रवीण गायकवाड यांच्याकडे सोपविली आहे.
या अभियान प्रमुखांच्या संपूर्ण मराठवाड्याच्या निवडी प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावणकुळे यांनी घोषित केल्या असून, नांदेड दक्षिण जिल्हा संयोजक पदी दिवंगत माजी आ.गंगारामजी ठक्करवाड, नांदेड महानगर जिल्हा अमोल कदम,छत्रपती संभाजी नगर उत्तर जिल्हा ज्ञानेश्वर मोटे,छ.सं.न.दक्षिण जिल्हा एल.जी. गायकवाड,महानगर जिल्हा जालिंदर शेंडगे,जालना ग्रा. देविदास कुचे,महानगर शिवाजी जाधव,बिड जिल्हा सर्जेराव तांदळे,धाराशिव जिल्हा दीपक अलोरे,लातूर महानगर दिग्विजय काठवते,लातूर जिल्हा भारत चामे,परभणी ग्रा. शिवाजी मोहोळ, परभणी महानगर भीमराव वायवळ,हिंगोली जिल्हा खोब्राजी नरवडे यांच्यावर गोषित जबाबदारी देण्यात आल्याचे भाजपा प्रदेश सचिव बंजारा क्रांतिद लाचे संस्थापकीय अध्यक्ष देविदास राठोड यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा