कळमनुरी तालुका प्रतिनीधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेगाव, केंद्र जवळा पांचाळ, तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील गणित व विज्ञान विषय शिक्षक अतुल कुलकर्णी यांची निवड बालभारती गणित विषय पाठयपुस्तक समीक्षकपदी झाली आहे.
पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम २०२४ वर आधारित इयत्ता १ लीच्या गणित पाठयपुस्तक निंर्मितीचे काम बालभारती पाठयपुस्तक मंडळाने हाती घेतले आहे. या पुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्याचे समीक्षण होणे अनिवार्य आहे. याकरिता अतुल कुलकर्णी यांची गणित पाठयपुस्तक समीक्षक म्हणून निवड झाली आहे. अतुल कुलकर्णी यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत डायट नांदेड येथे गणित विषय सहाय्यक म्हणून ५ वर्षे सेवा दिली आहे तसेच विविध राष्ट्रस्तरीय आणि राज्यस्तरीय गणित कार्यशाळांमध्ये सुलभक म्हणून आणि विविध गणित प्रशिक्षण संच निर्मितीमध्ये कार्य केले आहे.
या निवडीसाठी विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा