नांदेड प्रतिनीधी
----------------------------------
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोट निवडणूकीसाठी ०८७ नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ रोजी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीत विविध पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक अनुषंगिक कामाचा आढावा घेतांना यातील अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी गांभीर्य लक्षात न घेता अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले. विशेषतः जी.एस.टी.विभाग, बि.एल.ओ. तथा पर्यवेक्षक यांची अनुपस्थिती प्रकर्षाने निदर्शनास आली.
अशा सर्व अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील कलम १३४ मध्ये असलेल्या तरतुदीनुसार तात्काळ गुन्हे नोंदविण्याची कार्यवाही सुरु करण्याचे सक्त निर्देश डॉ खल्लाळ यांनी दिले.यामुळे अनुपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या बैठकीस तहसीलदार प्रविण पांडे , नितेशकुमार बोलेलू, नायब तहसीलदार हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा