नांदेड जिल्हा प्रतिनीधी
लोकसभा पोट निवडणूक तथा ०८७ नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आज दि.२७ रोजी इतर मतदान अधिकारी यांचे नागार्जुना पब्लिक स्कुलमध्ये दुसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण आयोजित केले होते. यासाठी प्रशिक्षण कक्षाच्यावतीने एकूण दहा कक्षात पिपिटीद्वारे मर्यादित गटास परिणामकारक प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
याचा प्रत्यक्ष अनुभव अभिजीत राऊत, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी घेतला. प्रत्येक कक्षात जावून स्वतः प्रशिक्षणार्थी होवून राऊत यांनी प्रशिक्षणाचा अनुभव घेतल्यामुळे इतर प्रशिक्षणार्थींचा उत्साह द्विगुणित झाला. प्रशिक्षण देणाऱ्या मास्टर ट्रेनरला कांही शंका विचारुन शंकेचे समाधान करुन घेतले.यावेळी राऊत याच्यासह डॉ सचिन खल्लाळ, निवडणूक निर्णय अधिकारी, नांदेड दक्षिण, तहसीलदार प्रविण पांडे,नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू,प्रशिक्षण टिममधील संजय भालके,मुख्याध्यापक सुनील दाचावार, प्रा.राजेश कुलकर्णी, हनुमंत राठोड, पेशकार राजकुमार कोटुरवार यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा