नांदेड जिल्हा प्रतिनीधी
खेल व युवा मंत्रालय भारत सरकारच्या वतीने यावर्षी घेतल्या गेलेल्या राज्यस्तरीय युवा संसद या राष्ट्रव्यापी कार्यक्रमात निवड झाली. महाराष्ट्रातून विविध विद्यापीठातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
या स्पर्धेतून पुढे राष्ट्रीय स्तरावर निवड केली जाणार आहे. त्याकरिता इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील बीएससी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु ऐश्वर्या नांदेडकर या विद्यार्थिनीने मुंबई विद्यापीठातील मराठी भाषा भवन येथे संपन्न झालेल्या राज्यघटना हक्क कर्तव्य आणि प्रगती या विषयावर आपले परखड मते मांडून उपस्थित आमची मने जिंकली आहेत.
त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दुर्गेश रवंदे तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ भागवत पस्तापुरे विशाल मस्के व सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे या यशाबद्दल कौतुक केले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा