नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दि. १४ रोजी इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथील १९९० च्या बॅचचे दहावीचे विद्यार्थी, चार- पाच वर्षांपासूनचे काही जण त्याही पेक्षा आधीपासून मित्र, दहावीनंतर मात्र सर्वांचे मार्ग बदलले, पैकी एकजण केंद्राच्या सेवेत वैज्ञानिक तर दुसरा शिक्षणक्षेत्रात सेवाव्रती हे दोघेही आज यशवंत आणि किर्तीवंतही. डॉ. मंदार देशमुख व भार्गव राजे या दोघांच्या नावे शिक्षणक्षेत्रातील शिक्षण परायण विद्यार्थी आणि विद्यार्थी परायण प्रयोगशील शिक्षक यांना दरवर्षी एक याप्रमाणे गौरविण्याचे ठरवले. त्यातूनच नुकताच विष्णुपूरी येथे एक देखणा आणि अनुकरणीय कार्यक्रम पार पडला. सिडको येथे अगोदर फक्त जिल्हा परिषदेची एकमेव शाळा होती. वास्तविक लोकसंख्याच मोजकी. पण, नंतर शारदा भवन शिक्षण संस्थेने इंदिरा गांधी हायस्कूल येथे स्थापन केली. या शाळेचे पहिले मुख्याध्यापक कै. मदनलाल शर्मा स्मृती संस्था स्थापन केली आहे. या संस्थेतर्फे डॉ. मंदार विनायकराव देशमुख शिष्यवृत्ती नांदेड
जिल्ह्यातील होतकरु व विज्ञान विषयाची आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी देण्याचे निश्चित केले. पाच हजार रुपये रोख, शाल, ग्रंथभेट असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच मागील २ दशकांपासून नांदेड येथे शिक्षण सेवाव्रती म्हणून अखंड कार्यरत असलेल्या आणि ज्यांच्यामुळे आज शेकडो विद्यार्थी देश- विदेशात वैद्यकीय, अभियांत्रिकीसह विविध क्षेत्रात किर्ती मिळविलेल्या भार्गव राजे यांच्या नावे भार्गव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. रुपये ११ हजार रुपये रोख, ग्रंथभेट आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
पहिला भार्गव उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जि.प.हा.विष्णुपूरी येथील विज्ञान विषयाचे माध्यमिक शिक्षक शिवाजी विश्वनाथ वेदपाठक यांना समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. तर अनेक विज्ञान प्रतिकृती तयार करुन त्याचे प्रयोगाच्या माध्यमातून सादरीकरण करणाऱ्या श्रध्दा नागोराव पांचाळ या इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी डॉ. मंदार विनायकराव देशमुख या पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात आले.
शिक्षकदिनाच्या महिन्यात चौदा सप्टेंबरला जि.प.हा.विष्णुपूरी येथील शाळेत हा सोहळा पार पडला. यावेळी भार्गव राजे, डॉ. मंदार देशमुख, डॉ. श्रीकांत देशपांडे, गोविंद लाठकर, सतीश भेंडेकर, सौ. कविता जोशी, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव हे उपस्थित होते.
शाळेच्यावतीने सर्व मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे समर्पक प्रास्ताविक राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार एम.ए.खदीर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, संतोष देशमुख,कृष्णा बिरादार, मारोती काकडे, पंचफुला नाईनवाड, दिनेश अमिलकंठवार, जयश्री देवशेट्टे , सुनीता सोळंके, चंद्रकला इदलगावे,नागोराव येलके व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा