नांदेड जिल्हा प्रतिनीधी
दि.१८ रोजी मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अभियानांतर्गत महाराष्ट्र शासन घोषित डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श प्रशाला जिल्हा परिषद हायस्कूल, विष्णुपूरी येथे विभागस्तरीय समितीने तपासणी केली.
या समितीमध्ये *लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती, नांदेडचे शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, नांदेड डायटचे प्राध्यापक एस.एस.साखरे* यांचा समावेश होता. सर्वप्रथम समितीचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास आबासाहेब देशमुख हंबर्डे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजी शिंदे, मुख्याध्यापिका उज्ज्वला जाधव व ग्राम विकास अधिकारी संजय कानोडे यांनी ग्रंथ भेट देवून केले. समितीने शाळेची काटेकोरपणे तपासणी केली.
यामध्ये शालेय परिसरातील वृक्षारोपण,परसबाग, सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प, शालेय पोषण आहार स्वयंपाक खोली, विज्ञान-गणित प्रयोगशाळा, ग्रंथालय, सि.एस.आर.फंडातून प्राप्त झालेला शुध्द पेयजल प्रकल्प, पाऊसाद्वारे होणारा जल पुर्नभरण प्रकल्प, ज्या सोलार प्लान्टमुळे शाळेचे विद्युत बील शून्य झाले आहे,तो सोलार प्रकल्प, डिजिटल क्लासरुम,स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गातील तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष विद्यार्थी कसे करतात, याचे परीक्षण, मुला मुलींचे स्वच्छता गृह,शिक्षक-शिक्षिका-कर्मचारी स्टाफरुम, तक्रार पेटी,परीक्षा विभाग, कार्यालयीन दस्तावेज, प्रत्येक वर्गात विविध विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणी केली. शाळेची परिपूर्ण तयारी पाहून समितीने समाधान व्यक्त केले. यासोबतच प्रत्येक झाडास क्यु आर कोड लावणे, सिक्स बंडल दस्तावेज, झाडांना शैक्षणिक साहित्याचे तोरणे बांधणे, स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाची टक्केवारी वाढवणे, टाकावू पासून खत करण्याच्या प्रकल्पास अधिक परिणामकारक पध्दतीने तयार करणे अशा मौलिक सूचना समितीने केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हंबर्डे, संतोष देशमुख, कृष्णा बिरादार,आनंद वळगे, पर्यवेक्षक शिवाजी वेदपाठक, आर.जी.कुलकर्णी, तंत्रस्नेही शिक्षक दत्ता केंद्रे, कांचनमाला पटवे, सुनीता सोळंके, दिनेश अमिलकंठवार व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा