मुगट वार्ताहर
मुदखेड तालुक्यातील मुगट येथील गुरुद्वारा माता साहेब देवांची या धार्मिक स्थळावर येऊन स्वयंघोषित शिरोमणी समिती प्रमुख बलबीर सिंघ व त्यांचे सहकारी घातपात करण्याच्या उद्देशाने पुढील महिन्यातील दि. ८/१०/२४ रोजी नांदेड येथे येणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे विविध अग्नि शस्त्र असून त्याचे वैध , अवैध परवाने त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या ताफ्यात विविध शस्त्रधारी लोक असून त्यांच्यावर न्यायालयात विविध खोटे व बनावटीची दिवाणी व फौजदारी खटले दाखल आहेत.
बुढादल चे 13 वे जत्थेदार बाबा संता सिंघजी यांच्या निधनानंतर १४ वे जत्थेदार बाबा सुरजित सिंघजी यांची जत्थेदार पदी धार्मिक विधी द्वारे निवड करण्यात आली होती पण पंजाब येथील बलबीर सिंघ हे शिरोमणी समिती सोबत राहून खोटी व बनावटीचे दस्तावेज तयार करून स्वतःला निहंगसिंघ बुढा दलाचे १४ वे वारस असल्याचे दाखवत आहे. त्यांच्या या ढोंगीपणामुळे या बुढादल मध्ये दोन गट अनेक वर्षापासून पडले आहे. या गटाने येथील आमच्या सहकार्यावर पंजाब, हरियाणा व इतर राज्यांमध्ये अनेक प्राणघातक हल्ले सुद्धा केले आहेत. सध्या त्यांचे काही सहकारी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट या ठिकाणी दुरुन पाळत ठेवून आहेत. दि.१४ ते १६ ऑक्टोंबर रोजी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट येथे माता साहिब देवांजी यांच्या ३४३ वा जन्म शताब्दी सोहळा धार्मिक कार्यक्रम साजरा होणार आहे. या कार्यक्रमात धार्मिक स्थळावर त्यांच्याकडून मोठ्या घात पात करण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून बलबीर सिंघ व त्यांचे सहकारी याना नांदेड जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात यावी व तसेच त्यांची कसून चौकशी करून त्यांचा चोखबंदोबस्त करावा. तसेच यापुर्वी गुरुद्वारा माता साहेब देवांजी मुगट या धार्मिक स्थळावर पोलीसांचा बंदोबस्त देण्यात यावा.
अशा मागणीचे निवेदन नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक तथा जिल्हाधिकारी नांदेड यांना गुरुद्वारा माता साहेब देवांजी येथील जत्थेदार बाबा तेजा सिंघजी गुरुद्वारा माता साहेब देवांजी बुढादल मुगट यांनी दिले आहे.
यावेळी नांदेड येथील संत बाबा बलविंदर सिंघजी, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, स. गुलाब सिंघ सरदार, स. मनप्रीत सिंघ कुंजीवाले, स. गुरमीत सिंघ बेदी, स. राजिन्दर सिंघ पुजारी, पत्रकार रविंदर सिंघ मोदी, अड. स. सुरिंदर सिंघ लोनीवाले, स. मनिंदर सिंघ रामगडीया, स. भारत सिंघ खालसा, विरा महाजन व स. गगनदीप सिंघ जहागीरदार हे उपस्थित होते.
.jpg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा