मुदखेड तालुका/प्रतिनिधी
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुदखेड तालुका अध्यक्ष पदी तालुक्यातील ईजळी गावचे भूमिपुत्र होतकरू तरुण केशव पाटील मुंगल यांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.
नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात धनंजय सूर्यवंशी यांनी केशव पाटील मुंगल यांच्यावर सदरील जबाबदारी सोपवली. केशव पाटील मुंगल यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये मुदखेड तालुका अध्यक्ष या पदावर निवड केल्या बद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेस नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री. धनंजय सूर्यवंशी यांचे आभार व्यक्त केले.
देशाचे नेते आदरणीय डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब, सन्माननीय अजितदादा पवार यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करून या देशातील बुद्ध शाहू फुले शाहू आंबेडकरी विचारधारेशी एकनिष्ठ राहून शेतकरी कष्टकरी गोरगरीब वर्गातील युवकांसाठी तथा जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी साठी सदैव कटिबद्ध राहील. पक्षश्रेष्ठी, मार्गदर्शक पदाधिकारी, सर्व माजी आणि विद्यमान कार्यकर्ते, आणि माझ्या सर्व सोबत्यांच्या सदैव ऋणात राहीन असे मत व्यक्त केले.
युवकांचे लाडके जिल्हा अध्यक्ष मा.श्री धनंजय सुर्यवंशी साहेब यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून ग्रामिण नांदेड जिल्हा सचिव पदी, राजेश नारायणराव खंदारे यांची निवड करण्यात आली. या वेळी युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील टेकाळे,युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री.रवि पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री. बाळासाहेब सोनकांबळे, युवक जिल्हा उपाध्यक्ष श्री. अंबादास पाटील, तसेच युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील धुमाळ,भोकर विधानसभा अध्यक्ष अत्माराव कपाटे साहेब, जिल्हा सरचिटणीस बालाजी पाटील व गजानन पाटील जोगदंड, मुदखेड माजी तालुका अध्यक्ष टिपरसे साहेब, युसुफ कुरेशी मुदखेडकर, तसेच मुदखेड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री बालाजी गोपिनाथराव बळे, मुदखेड शहर उपाध्यक्ष शेख मुखिद, शेख जानिमीया, शहर उपाध्यक्ष, पपु भाऊ बळे, गोविंद वाघमारे, एस. के. अहमद भाई, पिराजी बळे, पवन पंजाबराव पाटील, रामेश्वर किशनराव मुंगल, मुना सूर्यभान मुंगल, कवीराज मुंगल, बापुराव गंगाधर मुंगल, प्रदीप अर्जुन पाटील, गुलाब नामदेवराव पाटील, गजानन वामनराव पाटील, अमोल सुर्यशराव मुंगल, दत्ता पाटील कळणे, चक्रधर शिवाजी मुंगल, उद्धव थोरात खांबाळकर, ऋषिकेश अर्मता ढगे, भायेस्वर व्यांकटराव मुंगल, विजय चक्रधर मुंगल, परसराम पद्माकर पाटील, अजय सुधाकर मुंगल, चक्रधर मारोतराव मुंगल, अमोल दलित हाटकर, कपिल सोपानराव हाटकर, गौतम सुभाषराव हाटकर, गजानन जाधव ईजळिकर, प्रताप किशनराव शिंदे, कामाजी भगवानराव मुंगल, हरिपाळ, नागोराव मुंगल, योगेश अपाराव मुंगल, ऋषीकेश चांदी हिने, वैभव प्रभाकर मुंगल, सचिन अशोकराव मुंगल, जि. एच. पांचाळ मुगटकर, वैभव गजीले मुगटकर, विलास घोरपे मुगटकर, ओम पाटील निवघेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा