मुदखेड तालुका / प्रतिनिधी
श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने
सजीवांची उत्क्रांती वर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालय नांदेड येथील वनस्पतीशास्त्र विषयाचे डॉ. एस. एल.शिंदे होते.
या वेळी व्यासपीठावर अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. राजेश्वर कोटलवार आणि विज्ञान विभागाचे प्रभारी डॉ. उत्तम जायभाये उपस्थित होते. कार्यक्रमाचे उदघाटन देशाचे माजी पंतप्रधान श्री . राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सविता बजरंग वानखेडे यांनी केले.
'सजीवांची उत्क्रांती' या विषयावर बोलत असताना वनस्पती व प्राणी पृथ्वीतलावर कसे निर्माण झाले व सजीवांची उत्क्रांती होत असताना कोणत्या नैसर्गिक घटकांचा त्यावर परिणाम झाला. सध्या निसर्गात होत असलेला बदल आणि त्याचा होणारा सजीवावर परिणाम यासंदर्भात विचार पावर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश कदम यांनी भविष्यामध्ये रोजगाराभिमुख शिक्षणाची आवश्यकता व अशा क्षेत्राची निवड करण्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान शाखेची विद्यार्थिनी श्रेया शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन कू.साक्षी यांनी केले .
या कार्यक्रमासाठी प्रा.जायभाये, प्रा.राजू कोंडेकर ,प्रा. प्रकाश कोथळे , प्रा. दत्ताजी मेहेत्रे, प्रा. प्रशांत कदम, प्रा. माने, प्रा. आरती नरवाडे, प्रा.करंजकर, प्रा. कोल्हे हे उपस्थित होते .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री डी के डहाळे ,श्री दत्ता इंगोले ,श्री जे टी विश्वब्रह्म व श्री मुकुंद डांगे यांनी विशेष परिश्रम घेतले. ख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा