मुदखेड तालुका प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित, स्वातंत्र्य सेनानी राजाराम बापू माध्यमिक शाळा व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मराठवाड्याचे जलप्रणेते,भाग्यविधाते, भारताचे माजी गृहमंत्री कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त गुणांनुक्रमे प्रथम व द्वितीय आलेल्या इयत्ता ५ वी ते १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासमित गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री संजय शंकररावजी देशमुख बारडकर ,उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन ,सचिव रामेश्वर कोरबनवाड, सहसचिव अशोक पाटील गव्हाणे ,भगवान पाटील कांजाळे ,दिलीप मुलंगे, गौतम आठवले ,प्रभाकर आठवले व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक, प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाड्याचे भाग्यविधाते कै.डॉ शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना संस्थेचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन यांनी 'विद्यार्थ्यांनी केवळ शाळेत पहिला किंवा दुसरा येण्यासाठी अभ्यास नकरता जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास करावा असे विचार व्यक्त केले' असा मार्गदर्शन पर सल्ला दिला
कार्यक्रमाचा शेवट अध्यक्षाच्या हस्ते शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.विना कदम मॅडम यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. प्रीती नादरे, श्रुति देवठाणकर, आदिती कल्याणकर या विद्यार्थीनी तर कार्यक्रमाची सांगता प्रा ओसावार यांच्या आभार प्रदर्शनानी झाली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा