मुदखेड तालुका प्रतिनिधी (कैलास पाटील )
स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना स्तर २ विभागाकडून आज भारतीय संविधान निर्मिती ला ७५ वर्ष निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड २६नोव्हेंबर संविधान दिनानिमित्य संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन हा कार्यक्रम उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे या उद्देशाने आज दि.२८ नोव्हेंबर रोजी कॉलेजच्या प्रांगणात नारळ वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी स्वा.से राजाराम बापू माध्यमिक शाळा बारड चे मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.परशुराम बळीराम माने,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.मनोहर ओसावार,परीक्षा विभाग प्रमुख प्रा. कैलाश कपाटे, प्रा.कैलाश खानसोळे प्रा सौ ज्योत्स्ना बोरिवाले,प्रयोगशाळा सहाय्यक संतोष पवार , शिल्पाबाई आठवले सर्व उपस्थित शिक्षकासह विद्यार्थ्यांनी वृक्षरोपण केले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा