मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील
दि.३१ मुदखेड तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचा वावर वाढला आहे.त्यामुळे तालुक्यातील अनेक गावात लोकांनी पाहिला आहे तर अनेक जनावरे बिबट्याचा शिकार झाले आहेत. तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असताना सुद्धा वन विभाग मात्र निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे. बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कामळज येथील शेतकरी अशोक आबाजी खानसोळे, साहेबराव दत्ता खानसोळे, प्रभाकर भोजू खानसोळे, बालाजी तानाजी खानसोळे,नागोराव मारोती खानसोळे, प्रकाश शंकरराव खानसोळे, यांनी आपल्या शिवारात बिबट्याचा अनेक दिवसापासून मुक्त संचार करीत असुन गावातील अनेकांच्या शेतात बिबटयाचे ठसे आढळून आले आहेत. शेतकरी साहेबराव खानसोळे ,अशोक खानसोळे यांच्या शेतातील म्हशीचे वगार बिबट्याने खाल्ले असुन वनविभागाला या घटनेची माहिती दिल्यास वन अधिकारी कोणतीच कारवाई न करता उडते उडते उत्तर देत असल्याने शेतकरी म्हणत आहेत.
शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष या भागात बिबट्या पाहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भिती वाटत आहे सद् याची शेती पंपाच्या लाईट ची पाळी रात्रीची असल्यामुळे जीव मुठीत धरून शेतात काम करीत आहेत.
वनविभागाने तत्परतेने कारवाई करून बिबटयाला आवर घालावा अशी मागणी कामळज गावातील व परिसरातील शेतकरी करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा