श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारडची शैक्षणिक सहल :ऐतिहासिक स्थळांना भेट

 संपादक आशिष मुगटकर


मुदखेड प्रतिनिधी / कैलास पाटील 

    मुदखेड तालुक्यातील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बारड येथील विद्यार्थ्यांची नुकतीच एका शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत सहभाग घेतला. 

        या सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष ठिकाणांना भेट देऊन भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती मिळवून देणे हा होता.सहलीची सुरुवात दिः०२ जानेवारी शुक्रवार रोजी सायं ९ः०० वाजता झाली. सर्वात प्रथम विद्यार्थी वेरूळ येथे पोहोचले, जिथे त्यांना वेरूळचे जगप्रसिद्ध असलेले कैलास लेने, त्यातील वास्तुकला, शिल्पकला  याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली व तेथील १७ लेण्या पाहिला त्यानंतर, विद्यार्थ्यांनी भद्रा मारोती मंदिर व श्री घृष्णेश्वर मंदिर भेट देवून दर्शन घेतले, त्यानंतर यादवाच्या काळातला जागतिक वैभवसंपन्नता असलेला देवगीरीचा (दौलताबाद) किल्ला पायी चढत वेगवेगळ्या ठिकाणच्या तोफा,अंधारी रस्ता ते थेट दुर्गा तोफ पर्यंत प्रवास केला यामध्ये विद्यार्थ्यांना यादव काळातील वैभव संपन्नता,अल्लाउद्दीन खिलजी ने केलेली स्वारी,महंमद तूघलकांच्या काळात भारताची राजधानी,अशा अनेक पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा सांगणारा किल्ला विद्यार्थ्यांनी अभ्यासला.

           शासनाच्या नवीन नियमांनुसार, ही सहल खाजगी वाहनांऐवजी एसटी महामंडळाच्या बसेसने (लालपरी) आयोजित करण्यात आली होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी झाला .

          शेवटी छत्रपती संभाजीनगर मधील बीबीका मकबर पर्यटन स्थळ पाहूनआनंद घेतला. संध्याकाळी सर्व विद्यार्थी सुरक्षितपणे कॉलेजकडे परतीचा प्रवास केला दिः४/०१/२०२६ रविवार रोजी पहाटे पाच वाजता घरी पोहोचले या सहलीस  संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख बारडकर व कार्यकारी मंडळाने शुभेच्छा दिल्या.'या सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकोपा, शिस्त आणि निरीक्षणशक्ती वाढण्यास मदत झाली,' अशी प्रतिक्रिया प्राचार्य हेमंत इंगळे यांनी दिली.

या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील प्रा. कैलाश खानसोळे, प्रा. कैलाश कपाटे, प्रा. मारोती पवार, प्रा. बापुसराव केंदे, प्रा सौ. जोस्ना बोरीवाले यांनी विशेष मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या