मुगट वार्ताहार
दि.३१ रोजी येथील स्वर्गीय महाजन जीवनाजी पाटील कल्याणे यांच्या नवव्या पुण्यस्मरणार्थ मुगट येथील संत श्री आत्माराम महाराज बोधिमठ येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कथेची सुरुवात दि. २५जुलै रोजी करण्यात आली होती तर सांगता दि.३१ रोजी संपन्न झाली. भागवतकार ,कीर्तनकार श्री दत्तरामजी महाराज पांचाळ मुगटकर यांच्या सुमधुर वाणीतून ही भागवत कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्या संपन्न झाला.
ही भागवत कथा श्रावण मासात सुरू झाल्यामुळे भक्तमंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन बळीराम पाटील कल्याणे व किशनराव पाटील कल्याणे यांनी केले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा